खरतर डिप्रेशन हा एक सर्वात कॉमन आणि treatable मानसिक आजार आहे. सतत निराश किंवा उदास फील करणे, रोजच्या कामांमध्ये आणि आवडणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा असलेली आवड कमी होणे आणि पुढे मानसिक आणि शारीरिक समस्या असा त्याचा प्रवास असतो.
डिप्रेशन चे काही symptoms
( हे काही कॉमन symptoms आहेत, प्रमाण कमी जास्त असू शकते)
1. सतत उदास किंवा निराश वाटणे.
2. ज्या गोष्टी तुम्ही आनंदाने करायचा त्याची पण आवड कमी होणे, नीरस वाटणे.
3. खाण्याची सवय बदलणे – वजन अचानक कमी होणे किंवा वाढणे
4. झोप कमी होणे किंवा खूप वाढणे
5. एनर्जी नाहीये असे वाटणे, आळस येणे
6. निरर्थक शारीरिक हालचाली वाढणे – एका जागी नीट न बसता येणे, हस्ताक्षर खराब होणे, बोलताना अडखळणे (दुसऱ्यांच्या लक्षात येतील इथपर्यंत)
7. Worthless फील करणे
8. निर्णय घेता न येणे
9. एकाग्रता कमी होणे
10. सतत गिल्टी वाटणे
11. जगण्याला काही अर्थ नाही, आत्महत्या हाच उपाय आहे असे वाटणे
यापैकी कोणतेही विचार जर 2 अठवड्यापेक्षा जास्त असतील तर डिप्रेशन आहे असे म्हणू शकतो.
कधी कधी व्हिटॅमिन ची कमतरता, थायरॉईड ग्रंथीचे आजार, ब्रेन ट्युमर अशा आजारात पण वरील काही symptoms दिसतात त्यामुळे आधी साध्या dr कडून तपासणी करून घ्यावी.
डिप्रेशन चा शिकार साधारण 21 ते 24 या वयोगटातील लोक होतात. काही स्टडी असे पण दाखवतात की हा एक आनुवंशिक आजार आहे.
दुःख आणि डिप्रेशन यात असलेला फरक
1. नोकरी गेली, घरात कुणाचा मृत्यू झाला किंवा नाते तुटले तर आपल्याला प्रचंड दुःख होते. सगळ्यात असलेला रस कमी होतो, त्या व्यक्तीच्या / जागेच्या चांगल्या आठवणी आणि झालेला प्रसंग यांचा एकत्र अनुभव यातून आपण उदास होतो. पण डिप्रेशन मध्ये मूड उदास असणे किंवा नीरस वाटणे यांचे कारण कळत नाही आणि ते जास्त काळ असते.
2. दुःखात असताना आत्महत्या करण्याचे विचार शक्यतो गेलेल्या व्यक्तीच्या सोबत जावे म्हणून येतात तर डिप्रेशन मध्ये आपले जगणे worthless आहे / आपण हे आयुष्य deserve करत नाही म्हणून आत्महत्या करावी वाटते
3. दुःखात आपली सेल्फ esteem शाबूत असते पण डिप्रेशन मध्ये आपण ती गमावून बसतो.
काही व्यक्तींमध्ये दोन्ही गोष्टी एकच वेळी सुद्धा असतात. या दोघांमधला फरक कळला तर आपल्याला ट्रीटमेंट घेणे सोपे होते.
डिप्रेशन चा शिकार अगदी कुणीही होऊ शकत, जे लोक आपल्याला खूप सेटल आणि stable दिसत असतील ते सुद्धा डिप्रेस्ड असू शकतात.
डिप्रेशन का येते
1. केमिकल लोचा – मेंदू मध्ये असलेले हार्मोन यांचा balance बिघडला की
2. व्यक्तिमत्व – ज्यांना सतत स्ट्रेस घ्यायची सवय असते किंवा ज्यांची सेल्फ esteem खूप कमी असते असे लोक डिप्रेशन मध्ये सहज जातात. Pessimism सुद्धा डिप्रेशन साठी मोठे कारण आहे.
3. जेनेटिक्स – हो, वर सांगितल्या प्रमाणे हा आजार आनुवंशिक आहे, आपल्या जीन्स द्वारे हा पुढे जातो
4. आजूबाजूची परिस्थिती -. सतत हिंसा, अती गरिबी, शारीरिक किंवा मानसिक हिंसा , घरात neglet केले जाणे, सतत हिंसक व्हिडिओ गेम यांनी पण डिप्रेशन येते
डिप्रेशन कसे दूर करावे ?
पहिले तर एक ट्रेण्ड आला होता त्याला हायलाईट करतो.
काय तर थेरपी is too expensive so I do bla. Bla.. किंवा डिप्रेस असाल तर शिवाजी महाराजांचे चरित्र वाचा. असे काही नसते उगाच कुणाचं काही फॉलो करू नका.
डिप्रेशन एक साधा आजार आहे जो सहज ठीक होतो. जगात 90 % डिप्रेस्ड लोक उपचारांना छान प्रतिसाद देतात.
एका तज्ज्ञाकडे गेल्यावर तो तुमच्याशी बोलेल, काही बेसिक चर्चे नंतर मेडिकल टेस्ट पण केल्या जातील जेणे करून डिप्रेशन आहे की मेडिकल कंडीशन हे कळेल मग उपाय शोधणे सोपे होईल.
1. औषधे – अँटी डेप्रेसेंट गोळ्या देऊन मेंदू मधील केमिकल / हार्मोन बॅलन्स केले जातात, साधारण 6 महिन्याचा हा कोर्स असतो. अती झोप येणे आणि पोट खराब होणे असे थोडे दुष्परिणाम असतात याचे. यासाठी psychiatrist ला भेटावे लागते.
2. सायकोथेरपी – गोळ्या आणि / किंवा सीबीटी म्हणजेच cognitive behavioral therapy या टॉक थेरपी चा वापर करून यावर मात मिळवली जाते. आधी 1 to 1 आणि गरज पडली तर परिवार किंवा प्रिय जनांना सोबत घेऊन कॉन्सेलिंग केले जाते. ग्रुप नुसार सुद्धा कशी सेशन असतात हे व्यक्तीच्या डिप्रेशन नुसार ठरते.
3. समजा वरील दोन्ही मार्गात जर पेशंट ठीक झाला नाही तर मग मेडिकल शॉक / इलेक्ट्रिकल शॉक दिले जातात. पेशंट ला भुल देऊन मग आठवड्यातून 2 ते 3 वेळा शॉक दिले जातात. पण हा मार्ग एकदम शेवटचा असतो.
Preventive गाईड
असे काही symptoms दिसायला लागले की मग आपण डिप्रेशन मध्ये जाऊच नये म्हणून काय करावे ?
1. छान पूर्ण झोप घेणे
2. पाणी पिणे
3. सेल्फ टॉक आणि सेल्फ affirmation
4. सुगंध – नैसर्गिक सुगंध असणाऱ्या वस्तू जवळ ठेवणे
5. Meditation
6. Avoid alcohol and smoking
7. Balance फूड घेणे
8. दिवसातून एकदा उन्हात जाणे. ( शक्यतो कोवळ्या उन्हात)
9. Coffee पिणे
10. व्यायाम करणे
11. रूम मध्ये गाणी लावून मनसोक्त नाचणे
12. गाणी गाणे
डिप्रेशन एक मानसिक अवस्था आहे आणि ती खरंच exist करते. त्यामुळे असे काही वाटल्यास मित्र किंवा परिवाराचा सल्ला घ्या आणि थेरपी सुरू करा.




3 thoughts on “डिप्रेशन म्हणजे काय ?”
Pingback: Reiki - Divya Abhivyakti
Pingback: Obsessive-Compulsive Disorder (OCD) - Divya Abhivyakti
Pingback: Dissociative Identity Disorder (Multiple Personality Disorder) - Abhivyakti