Suicide awareness

Table of Contents

आपल्या मित्राने, परिवारातील सदस्याने किंवा एखाद्या सेलेब्रिटी ने आत्महत्या का केली हे कायम न सुटलेले कोडे असते, नेमका त्यांच्या मनात काय विचार सुरू होता, अशी काय परिस्थिती होती जे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला हे सर्व विचार आपल्याला भंडावून सोडतात. कोणत्या warning साइन कडे आपण दुर्लक्ष केले किंवा कोणते क्लू आपल्या लक्षातच नाही आले असे विचार सतत डोक्यात फिरत असतात. बरेचदा आत्महत्येसाठी अनेक कारणे कारणीभूत असतात.

मानसिक आजार

आत्महत्येचा निर्णय हा प्लॅनिंग करून नाही तर विचारांच्या आवेगात घेतलेला असतो. व्यक्तीचे impulsive वागणे हे मोठे कारण असते. मानसिक आजारात सर्वात जास्त आत्महत्या या डिप्रेशन असणारे व्यक्ती करतात. डिप्रेशन मुळे व्यक्ती स्वतःला भावनात्मक दृष्टया कमकुवत होते आणि निराश जीवन जगू लागते, त्यांना आपले दुःख कमी करण्यासाठी जीवन संपवणे सोडून कोणताच मार्ग दिसत नाही. त्याच बरोबर Bipolar disorder, Borderline personality disorder (BPD), Eating disorders, Schizophrenia ह्या आजारात सुद्धा आत्महत्येचा धोका अधिक असतो.

Traumatic Stress

ज्यांनी कोणत्याही प्रकारचा ट्रॉमा अनुभवला आहे, उदा. लैंगिक छळ, बलात्कार, शारीरिक हिंसा, war ट्रॉमा असे व्यक्ती हे PTSD म्हणजेच post-traumatic stress disorder चा शिकार होतात, यांना सतत होपलेस वाटू लागते, शक्यतो डिप्रेशन मध्ये ही जातात आणि मग मनात आत्महत्येचे विचार येऊ लागतात.

Substance Use and Impulsivity

मादक पदार्थांचे सेवन, ड्रग्स आणि दारू / अल्कोहोल यांमुळे तात्पुरते जरी आपले टेन्शन विसरण्यास मदत होत असली तरीही त्यांच्या नशेत असताना व्यक्तीचे impulsive बेहेवियर ट्रिगर होते आणि मनात येणाऱ्या विक्षिप्त कल्पना सत्यात आणण्याची इच्छा होते. नोकरी गमावलेले किंवा नुकतेच ब्रेकअप / घटस्फोट झालेले लोक शक्यतो नशेत आत्महत्या करायचा विचार करतात. ज्यांना मुळात डिप्रेशन किंवा कोणताही personality disorder आहे त्यांच्यात व्यसनाचे प्रमाण अनियंत्रित होते आणि आत्महत्येचा धोका वाढतो.

Loss or Fear of Loss

एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार करते तेव्हा शक्यतो त्यांना भीती सतावत असते. एखादे नुकसान किंवा नुकसानाची भीती हे सुद्धा आत्महत्येसाठी मोठे कारण सिद्ध झाले आहे.
याची काही उदाहरणे
 • शिक्षणात नापास/ अपयशी होणे.
 • काही कारणास्तव अटक होणे, जेल मध्ये जावे लागणे.
 • दादागिरीचा शिकार होणे, सतत लोकांकडून व्यंग केले जाणे ( रंग, आकार यांवर judge केले जाणे.)
 • आर्थिक नुकसान आणि अडचणी.
 • खूप जुन्या मैत्री अथवा नात्याचा अंत.
 • सामाजिक स्थान गमावणे.
 • नोकरी जाणे किंवा कंपनी बंद पडणे.

Hopelessness

नैराश्य हे शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म दोन्ही प्रकारचे असते, पण अनेक संशोधने असे सिद्ध करतात की नैराश्य हे आत्महत्येच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. नैराश्य असलेली व्यक्ती ही कोणत्याही प्रकारच्या समस्येत आशावादी नसते, त्यांना सतत वाटत असते की ही परिस्थिती कधीच बदलणार नाही, यामुळे ते आयुष्यातील सर्व सकारात्मक गोष्टींकडे सुद्धा दुर्लक्ष करतात.
आपण त्रयस्थ म्हणून परिस्थिती कडे बघतो तेव्हा आपल्याला ती नेहमी सहज वाटत असते पण नैराश्यातून जाणाऱ्या व्यक्तीला त्या परिस्थिती मध्ये कोप करणे खूप कठीण जाते, त्यांना यावर फक्त एकच उपाय दिसतो तो म्हणजे आत्महत्या.

Chronic Pain and Illness

एखादी व्यक्ती सतत आजारी असली की मग तिला स्वतःची चीड येऊ लागते, आपले अस्तित्व दुसऱ्यांसाठी त्रासदायक आहे असा तिचा समज होतो. मग आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको म्हणून ती व्यक्ती आत्महत्येचा पर्याय निवडते. शक्यतो बरे न होणारे आजार किंवा रोग असलेले व्यक्ती ह्या मार्गाकडे वळतात. 2015 मधील एका रिसर्च नुसार जर व्यक्तीला क्रॉनिक पेन असेल तर त्यांना स्ट्रेस आणि डिप्रेशन चा धोका जास्त असतो.
एका रिपोर्ट नुसार खालील आजार असणारे व्यक्ती आत्महत्येचा विचार जास्त करतात –
 • अस्थमा/ दमा
 • कॅन्सर
 • ब्रेन ट्यूमर
 • पार्किन्सन
 • हृदयरोग
या प्रकारात आपल्यामुळे आपल्या प्रियजनांना त्रास होतोय आणि आपण नसलो तर त्यांचे आयुष्य अधिक सुखकर होईल असा विचार ही मोठी warning साइन असते.

Social Isolation

अनेक कारणांमुळे व्यक्ती समाजापासून दूर एकटे राहणे पसंत करते, आपल्या प्रिय लोकांचे निधन, घटस्फोट, ब्रेकअप, नवीन जागी शिफ्ट होणे या किंवा अशा अनेक कारणांमुळे लोक नवीन व्यक्तींसोबत बोलणे/ मिसळणे टाळायला लागतात आणि मग नंतर एकटे होतात. शक्यतो व्यसने करू लागतात आणि मग नशेत स्वतःला दोष देणे आणि हे जीवन निरर्थक आहे असा समज करून ते संपवायचा प्रयत्न करतात.

Cry for Help

अनेकदा लोक आत्महत्या करायचा प्रयत्न करतात कारण त्यांना मदत कशी आणि कुणाकडे मागावी हेच कळत नाही, आत्महत्येचे प्रयत्न हे attention साठी नसून मदत मागण्यासाठी असतात. आपण किती दुखावले आहोत हे जगाला दाखवायचा एक प्रयत्न असतो तो. पण हा वेडेपणा बरेचदा जीवावर बेतू शकतो, योग्य वेळेत कुणाचे लक्ष न गेल्यास जीव जाण्याची पण शक्यता असते.

Accidental Suicide

ड्रग्स किंवा तत्सम पदार्थांचा जास्त डोस किंवा चोकिंग गेम असे चॅलेंज ज्यात काही लोक आपण किती कूल आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतात आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर त्यांचा मृत्यू होतो हे सुद्धा आत्महत्येतच येते.

मला अनेकदा लोक प्रश्न विचारतात की आत्महत्या रोखण्यासाठी आपण काय करू शकतो ?
खरतर कुणाच्या मनात काय सुरु आहे हे समजणे अजिबात सोपे नसते पण पुढील मार्ग वापरून आपण समोरच्याच्या मनाचा अंदाज लावू शकतो आणि त्याचे त्या संबंधीचे विचार बदलू शकतो.

समोरच्याचे वागणे, बोलणे बदलले आहे का ते नोटीस करा, त्याला निराश वाटत आहे का ?, अचानक मित्रांमध्ये मिसळणे त्याने बंद केले आहे का ?, त्याला साध्या गोष्टी करताना पण प्रॉब्लेम येत आहेत का हे बघा. त्यांच्या मनात काय विचार आहेत हे त्यांना सरळ विचारा. स्ट्रेस समजून घ्यायचा प्रयत्न करा. ( हे सुरू करताना तुम्ही त्यांचे ऐकून घेणे गरजेचे आहे, आधी विषय सुरू करून मग जर तुम्ही एकने बंद केले तर व्यक्ती अजून निराश होऊ शकते)
स्वतः मध्ये पुढील गोष्टी आणण्याचा प्रयत्न करा.
 • जेव्हा कुणी काही सांगत आहे, तेव्हा ऐकून घ्यायला शिका.
 • समोरच्याला त्याच्या गतीने जाउद्या.
 • उगाच सल्ले देऊ नका, किंवा जजमेंट पास करू नका.
 • प्रत्येकाचे मानसिक आरोग्य वेगळे असते हे समजून घ्या.
 • त्यांच्या बोलण्यातून त्यांना मदतीची गरज आहे असे जाणवल्यास कौन्सेलर शी त्यांचा संपर्क साधून द्या.
 • निरर्थक सल्ले देऊ नका.
 • इतिहासातील उदाहरणे देऊन ते कसे चुकीचे आहेत हे दाखवू नका, त्यांचे सेल्फ esteem खराब करू नका.

परिस्थिती हाताबाहेर जात आहे असा संशय आल्यास तज्ञांचा सल्ला घ्या, कोणतीही छोटी गोष्ट इग्नोर करू नका.

1 thought on “Suicide awareness”

  1. Pingback: Borderline personality disorder (BPD) - Divya Abhivyakti

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*