ध्येय निश्चिती – SMART goals

ध्येय निश्चिती – SMART goals

Table of Contents

समजा आपण बॅग भरून पुण्याहून मुंबईला निघालो आहोत आणि कसे जायचे, कधी पर्यन्त जायचे, कुठे उतरायचे हे माहीतच नसेल तर आपण इच्छित ठिकाणी पोहचू का ? आयुष्य ही अगदी तसेच असते. कुठे जायचे म्हणजेच आपले ध्येय निश्चित करणे फारच आवश्यक असते. ध्येय ठरलेले असले तरीही मार्गात अनेक अडचणी येतात आजच्या लेखात याच अडचणींवर मात कशी करावी आणि smart goal कसे set करावे यावर आपण माहिती घेऊ.

SMART goals ही संकल्पना फारच उपयुक्त आणि सोपी असून त्या पद्धतीने जर ध्येय ठरवले तर ते प्राप्त करणे सहज होते आणि त्याचा आनंद देखील आपल्याला प्राप्त करता येतो.

Specific: ध्येय ठराविक, विशिष्ट, स्पष्ट आणि एकामार्गी असायला हवे, त्यात किंतु परंतु नसावेत.
Measurable: ध्येयाकडे वाटचाल करताना आपण किती प्रगती केली आहे ही मोजमाप करता आले पाहिजे.
Achievable: ध्येय ठरवताना ते प्राप्त करणे शक्य असायला हवे.
Realistic: आपल्या आयुष्याला साजेसे आणि तर्क आधारित, सत्याधारीत ध्येय असायला हवे.
Timely: वेळेची मर्यादा असलेले आणि सुरुवात तसेच अंत कधी असावा, ठराविक वेळेत किती काम झाले पाहिजे याचा आराखडा तयार असायला हवा.

Specific स्मार्ट गोल :

जे ध्येय पुढील प्रश्न स्वताला विचारून निश्चित केले जाते ते पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते.

  • या ध्येयात माझ्यासोबत कोणकोण आहे ?
  • मला नेमके काय प्राप्त करायचे आहे ?
  • ध्येय साध्य करण्याची जागा / क्षेत्र कोणते ?
  • मला हे कधी पर्यन्त साध्य करणे आवश्यक आहे ?
  • मला हे का साध्य करायचे आहे ?
  • माझी काय प्रगती होणार आहे ?

Measurable स्मार्ट गोल

ध्येयाकडे जात असताना आपली किती प्रगती झाली आहे ही माहीत झाले की आपल्याला देखील आनंद होतो आणि प्रयत्न फळाला येत आहेत म्हणून मग वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते म्हणून प्रगती मोजण्याचे प्रमाण ठरवणे गरजेचे असते. रोज स्वताला पुढील प्रश्न विचारले की आपण कुठे आहोत हे सहज कळते .

  • अजून पर्यन्त किती काम झाले आहे आणि किती काम बाकी आहे ?
  • माझे ध्येय पूर्ण झाले हे मला कसे कळणार ?
  • मी पुढे प्रगती करत आहे हे कसे ओळखावे ?

Achievable स्मार्ट गोल

एखादे ध्येय प्राप्त करताना ते कठीण आणि आपल्याला चॅलेंज करणारे नक्की असावे पण त्याच सोबत ते आवाक्यातील आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील प्रश्न स्वताला आवर्जून विचारा.

  • मला जे काही साध्य करायचे आहे त्यासाठी आवश्यक सर्व संसाधणे, साहित्य माझ्याकडे आहे का ?
  • नसल्यास ते मला मिळवणे शक्य आहे का ?

उदा. माझ्या कडे गाडी नसताना मी मार्केटिंग किंवा delivery चे काम करायला घेणे.

Realistic स्मार्ट गोल

आपले ध्येय नेहमी तर्क आधारित असावे, आपल्याकडे उपलब्ध साहित्य आणि संसाधने यांचा वापर करून ते प्राप्त करणे आपल्याला जमेल की नाही ही ठरवताना पुढील प्रश्न स्वतला विचारावे

  • ध्येय माझ्या मर्यादेत येणारे आणि तर्कशुद्ध आहे का ?
  • ध्येय ठरवलेल्या वेळेत पूर्ण होणे शक्य आहे का ?
  • उपलब्ध संसाधने वगळता अन्य गोष्टी कामात अडथळा तर आणणार नाहीत ना ?

Timely स्मार्ट गोल्स

अनेकदा वरील सर्व आपण पाळले तरीही ध्येय प्राप्त होत नाही, कारण त्याची वेळ मर्यादा आपण ठरवलेली नसते. त्यामुळे सुरुवात आणि शेवट कधी करावा ही ठरवणे महत्वाचे ठरते. त्यासाठी 2 सोपे प्रश्न स्वताला नेहमी विचारावे

  • माझ्या कामाला वेळेची मर्यादा आहे का ?
  • माझे काम कधी पर्यन्त पूर्ण व्हायला हवे ?

वरील पाचही मुद्दे नीट लक्षात घेऊन जर आपन नियोजन केले तर यशस्वी होण्याची शक्यता दहा पटींनी वाढते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*