संध्याकाळची वेळ…
तुम्ही ऑफिसमधून थकून घरी आला आहात..
आणि घरात कुणीतरी सहज म्हणतं
“तु कधीच वेळेवर येत नाहीस …”

क्षणात राग येतो…
आवाज चढतो…
आणि काही मिनिटांत वातावरण तणावपूर्ण होतं…
पण काही वेळाने डोकं शांत झाल्यावर मनात विचार येतो
“मी थोडं शांतपणे बोलू शकलो असतो…”
हा अनुभव काही नवीन नाही…
आपण सगळेच यातून जात असतो…
कारण त्या क्षणी आपण प्रतिक्रिया (Reaction) देतो…
आणि नंतर आपण प्रतिसाद (Response) काय असू शकला असता हा विचार करतो.
प्रतिक्रिया vs प्रतिसाद नेमकं काय घडतं?
जेव्हा आपल्याला राग, भीती किंवा तणाव जाणवतो
तेव्हा मेंदूतील अमिग्डाला (Amygdala) पटकन सक्रिय होतो.
👉 ही आपली भावनिक अलार्म सिस्टम (Emotional Alarm System) आहे
👉 ती “धोक्याची” सिग्नल देऊन लगेच प्रतिक्रिया घडवते
म्हणूनच reaction:
- पटकन येते.
- विचार न करता येते.
- आणि अनेकदा नंतर आपल्याला पश्चाताप होतो.
पण जर आपण थोडा थांबा (Pause) घेतला…
तर मेंदूतील प्रिफ्रंटल कॉर्टेक्स (Prefrontal Cortex) सक्रिय होतो
👉 जो विचारपूर्वक निर्णय घेतो
👉 जो आपल्याला “काय योग्य आहे?” यावर विचार करायला मदत करतो.
👉 म्हणजेच…
थोडंसं थांबणे म्हणजे reaction पासून response कडे जाण्याचा सहज मार्ग
R.A.P.I.D Method एक सोपी सवय
अशा क्षणी तुम्ही ही 5-step पद्धत वापरू शकता:
R – Relax (शांत व्हा)
सर्वात आधी शरीर शांत करा…
एक दीर्घ श्वास (Deep Breath) घ्या…
आणि हळूहळू सोडा…
👉 हळू श्वास घेतल्याने नर्व्हस सिस्टम (Nervous System) शांत होते.
👉 आणि विचार स्पष्ट होऊ लागतात.
✔️ शांत शरीर = मन स्पष्ट
A – Accept (स्वीकार करा)
“मला राग येतोय…”
ही भावना स्वीकारा.
👉 भावना दाबल्या (Suppress) तर त्या वाढतात
👉 पण स्वीकारल्या तर त्यांची तीव्रता कमी होते
✔️ भावना चुकीच्या नाहीत…
पण त्यावर आपण काय कृती करतो ती महत्त्वाची असते
P – Pause (थांबा)
प्रतिक्रिया देण्याआधी थोडा थांबा…
फक्त 5 सेकंद जरी थांबलात तरी
👉 तुम्ही impulsive reaction टाळू शकता.
✔️ हा छोटासा pause म्हणजेच emotional intelligence
I – Investigate (समजून घ्या)
स्वतःला विचारा:
- नेमकं मला त्रास कशामुळे झाला?
- मी जो विचार करतोय ते वास्तव (Fact) आहे कीअंदाज (Assumption)?
👉 ही step तुम्हाला स्वतःला समजून घ्यायला भाग पाडते, आपण अंतर्मुख होऊ लागतो.
D – Decide (निर्णय घ्या)
आता ठरवा…
👉 तुम्ही रागाने व्यक्त होणार का ?
👉 की शांतपणे, विचारपूर्वक व्यक्त होणार ?
✔️ तुमचे मूल्य (Values) आणि नातेसंबंध (Relationships) लक्षात घेऊन विचारपूर्वक निर्णय घ्या.
पुन्हा त्या प्रसंगाकडे…
जर तुम्ही त्या वेळी RAPID वापरलं असतं…
👉 तुम्ही थांबला असता
👉 स्वतःचा राग वेळीच ओळखला असता
👉 आणि कदाचित शांतपणे विचारलं असतं
“तुला असं का वाटतंय ?”
आणि कदाचित…
भांडण टळलं असतं.
RAPID ही कोणती जादू नाही…
ही एक सरावाची सवय (Practice) आहे.
सुरुवातीला कठीण वाटेल…
पण हळूहळू तुम्हाला जाणवेल
👉 “मी आधीसारखा पटकन react होत नाही…”
👉 “मी थोडा थांबून respond करतो…”
👉 “माझे नातेसंबंध सुधारत आहेत…”
जाता जाता
👉 प्रतिक्रिया (Reaction) या भावनांचे प्रतिबिंब असतात.
👉 प्रतिसाद (Response) हा जाणिवांचा जमाखर्च असतो..
आणि या दोघांमधला फरक
फक्त काही सेकंदांचा थांबा (Pause) इतकाच असतो.




2 thoughts on “R.A.P.I.D Method प्रतिक्रिया नाही, प्रतिसाद द्या!”
Nice information on controlling our emotions in difficult situations..
Thank you !