Perfectionism

Table of Contents


Perfectionism म्हणजे काय ?

Perfectionism ही अवस्था आपल्या इंटर्नल प्रेशर मुळे येते, बरेचदा हरण्याची भीती किंवा जजमेंट avoid करायला हे प्रेशर मनात बिल्ड व्हायला सुरुवात होते आणि नंतर याची सवय Perfectionism मध्ये रुपांतरीत होते. अकॅडमीक आणि प्रोफेशनल स्पर्धा वाढल्यामुळे Perfectionism चे प्रमाण वाढत असून सोशल मीडियावर परफेक्ट दिसण्याची जी व्यापक चळवळ सुरू आहे ती या अवस्थेला खतपाणी देत आहे.

एखादी व्यक्ती Perfectionism आहे हे कसे ओळखावे ?

परफेक्शनिस्ट व्यक्ती स्वतःकडून आणि अन्य लोकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवतात, हे लोक दुसऱ्यांचे दोष खूप सहज शोधतात आणि दुसऱ्यांच्या चुकांबद्दल अती विचारी असतात. चूक होईल किंवा फेल्युअर च्या भीतीने अनेक गोष्टी पुढे ढकलतात. लोकांच्या compliment कवटाळून बसतात तर आपले छोटे छोटे यशस्वी क्षण सेलिब्रेट करायला विसरतात त्यांना आयुष्यातील काही ठराविक लोकांकडून त्यांना सतत validation आणि approval हवे असते.

Perfectionism चे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत:

 • Self-oriented perfectionism : स्वतःकडून 100 % perfection ची अपेक्षा ठेवणे.
 • Other-oriented perfectionism : परिचित किंवा परिवारातील व्यक्तीकडून 100 % perfection ची अपेक्षा ठेवणे.
 • Socially-prescribed perfectionism : समाजाकडून 100 % perfection ची अपेक्षा ठेवणे.

Perfectionism चे संभाव्य धोके:

मी अनेकदा बोलताना Perfection is myth हे वाक्य वापरतो, perfection म्हणजे एका अशक्य गोष्टीला सत्यात आणण्याचा अट्टाहास करणे. अनेकदा perfection चा हव्यास नकारात्मक गोष्टींना आमंत्रण देतो जसे गोष्टी किंवा कामे पुढे ढकलणे, हरण्याच्या भीतीने चॅलेंज घेणे टाळणे, हट्टीपणा, toxic स्पर्धा, नवीन मार्ग आणि क्रिएटिव्ह रस्ते वापरायला संकोच.

Perfection ची चुकीची संकल्पना तयार होण्यासाठी जबाबदार घटक :

 • Failure ची भीती
 • आपण वर्थलेस आहोत ही भावना
 • Low self esteem
 • लहानपणीचे वाईट अनुभव, घरच्यांनी केलेली comparison

Perfectionism चे मुख्य तोटे

डिप्रेशन, anxiety, स्ट्रेस, खाण्या पिण्याच्या बिघडलेल्या सवयी, आत्महत्येची भावना इत्यादी.

Perfectionism कुणासाठी चांगले आहे का ?

एखादी गोष्ट उत्कृष्ट असावी म्हणून खूप प्रयत्न करणे आणि ती 100% परफेक्ट असावी म्हणून प्रयत्न करणे यात खूप फरक आहे. उत्कृष्ट आणि परिपूर्ण यातील फरक समजून घेतला तर अनेक वैयक्तिक आणि सामाजिक प्रश्न सुटतील. उत्कृष्ट कामगिरी साठी प्रयत्न करणारे लोक हे रूटीन छान सेट करतात आणि अथक प्रयत्न करतात ते achievement-oriented असतात अशा उत्कृष्ट निर्मितीच्या मानसिकतेच्या लोकांनी adaptive perfectionist असेही म्हणू शकतो. पण अती परफेक्शनिस्ट लोक failure चा विचार करून स्वतःला सीमित करतात अशा व्यक्तींना maladaptive perfectionists ही संज्ञा लागू पडते.

Perfectionism चे तोटे कमी कसे करावे ?

 • तुलना करणे बंद करावे.
 • सेल्फ टॉक
 • सेल्फ affirmation
 • मेडिटेशन किंवा सेल्फ hypnosis
 • आपल्या नकारात्मक जजमेंट ना चॅलेंज करणे

Perfectionism आजार आहे का ?

Perfectionism कोणताही आजार नाही, पण त्याचा अतिरेक हा खूप धोकादायक आहे, हा एक personality trait आहे, तरी अनेक मेंटल डिसऑर्डर मध्ये सापडणारा एक महत्वाचा सिंड्रोम आहे. ocd मध्ये एखादी गोष्ट ही परफेक्ट किंवा आपल्याला हवी तशीच असावी हे ओबसेशन आपल्या कंट्रोल मध्ये नसते पण Perfectionism आपण सहज कंट्रोल करू शकतो.
परंतु अतिरेक झाल्यास OCD आणि OCPD चे चांसेस वाढतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*