धकाधकीच्या जीवनात एखाच वेळी अनेक कामे करणे (multi-tasking) ही सवय आपल्या सर्वांच्या अंगवळणी पडत चालली आहे, एकाच वेळी अनेक कामे केल्याने आपली कार्यक्षमता (productivity) वाढते असा दावा अनेकदा केला जातो, multitasking मुळे खरंच आपली एकाग्रता (focus) आणि कार्यक्षमता (productivity) वाढते का ? multitasking चे फायदे आणि तोटे आजच्या लेखातून समजून घेऊ.
Multitasking मुळे आपली कार्यक्षमता (productivity) 40% पर्यंत कमी होऊ शकते असा दावा अमेरिकन सायकॉलॉजिस्ट असोसिएशन द्वारे प्रकाशित एका रिसर्च पेपर मध्ये आढळून आले आहे.
सर्वात आधी आपण multitasking संदर्भात असलेले गैरसमज पाहू.
गैरसमज – Multitasking मुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते.
Multitasking मुळे आपले लक्ष एकाच वेळी अनेक कामात विभागले जाऊन कामांचे योग्य नियोजन होत नाही आणि focus कमी होतो परिणामी एकूणच कार्यक्षमता कमी होऊ लागते.
वैज्ञानिक आधार –
एका प्रयोगात functional magnetic resonance imaging (fMRI) द्वारे मेंदूचे परीक्षण केले गेले, तेव्हा multitasking करताना लक्ष आणि एकाग्रता यांचे नियंत्रण करणाऱ्या भागाची क्रियाशिलता कमी झाल्याचे आढळून आले. कमी झालेली क्रियाशिलता मनुष्याचा मेंदू एकाच वेळी अनेक जटिल कामे करण्यासाठी बनलेला नाही या विधानाची पुष्टी करते. त्यामुळे आपली कार्यक्षमता आणि multitasking यांचा काहीच संबंध नाही हे दिसून येते.
गैरसमज – Multitasking मुळे वेळेची बचत होते.
Multitasking मुळे आपले लक्ष एका कामावर न राहता ते अनेक कामात विभागले जाते, त्यामुळे आपली बौद्धिक क्षमता मंदावते, दुर्लक्ष होऊन आपल्याकडून काही शुल्लक चुका होण्याची शक्यता वाढते एकूणच कामे पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होतात एकूणच multitasking मुळे वेळेची बचत न होता जास्त वेळ खर्च होतो.
गैरसमज – Multitasking मुळे कामाची गुणवत्ता कमी होत नाही.
Multitasking मुळे प्रत्येक घटक पूर्ण लक्ष देऊन पाहणे शक्य होत नाही, अनेकदा वरवर दिसणाऱ्या माहिती/ output च्या आधारे आपण काम करत असतो त्यामुळे चुका होण्याची शक्यता वाढते, कामाची गुणवत्ता कमी होते.
गैरसमज – Multitasking मुळे स्मरणशक्ती वाढते.
Multitasking करत असताना आपले लक्ष आणि एकाग्रता कमी असल्याने ऐकलेली/ पाहिलेली/ वाचलेली माहिती व्यवस्थित प्रोसेस होत नाही, परिणामी तिचे विस्मरण होण्याची शक्यता वाढते. एकूणच multitasking मुळे memory retaintion/ स्मरणशक्ती वर विपरीत परिणाम होतो.
गैरसमज – तंत्रज्ञानामुळे Multitasking सहज आणि फायदेशीर झाले आहे.
Multitasking मध्ये तंत्रज्ञानामुळे प्रगती नक्कीच झाली असेल पण त्यामुळे आपली एकाग्रता वाढली नसून ती कमीच होत आहे. उदा. आपले फोन नक्कीच multitasking करत असतील पण एका ठिकाणी मेसेज वाचताना जर आपण दुसरीकडे कुणाचे बोलणे ऐकत असू तर दोन्ही कडे आपण तितक्याच एकाग्रतेने काम करू शकत नाही परिणामी आपल्याला त्याचे तोटे सहन करावेच लागतात.
Multitasking चे दुष्परिणाम –
✒️ कार्यक्षमता (productivity) कमी होते.
✒️ बौद्धिक क्षमता कमी होते.
✒️ कामात होणाऱ्या चुका वाढतात.
✒️ लक्ष आणि एकाग्रता (focus & attention) कमी होते.
✒️ स्मरणशक्ती कमी होते.
✒️ खूप लवकर कंटाळा येऊ लागतो.
✒️ स्ट्रेस वाढू लागतो.
✒️ सृजनशीलता कमी होते.
✒️ कामाची गुणवत्ता कमी होते.
✒️ नातेसंबंधात दुरावा निर्माण होतो.
✒️ जीवनाचा आनंद हिरावतो.
Multitasking मुळे आपली सृजनशीलता (creativity) आणि समस्या निवारण (problem solving) या दोन क्षमतांवर सर्वाधिक नकारात्मक परिणाम होतो, कोणतेही सृजनशील (creative) काम करायचे असेल तर त्यासाठी एकाग्रता (concentration) आणि लक्षपूर्वक विचार क्षमता फार आवश्यक असते, परंतु multitasking मुळे एका कामातून दुसऱ्या कामात shift होताना आपली एकाग्रता भंग पावते परिणामी सुयोग्य पद्धतीने विचार करणे देखील कठीण होते.
अनेकदा आपल्या नातेवाईक/ प्रिय व्यक्तींसोबत असताना आपण सोशल मीडियावर व्यस्त असलो तर या multitasking मुळे त्यांना ignored वाटू लागते, परिणामी त्यामुळे आपलेच लोक आपल्यापासून दुरावू लागतात.
सतत multitasking करता राहिल्याने पूर्ण झालेल्या कामांचा आणि त्यांचा यशाचा आनंद आपल्याला अनुभवता आणि साजरा करता येत नाही, त्यामुळे सर्व काही पूर्ण करून देखील शेवटी आपण तितके आनंदी नसतो.
Multitasking चा नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो ?
✒️ कामांचे प्राधान्य ठरवा ( priority)
✒️ प्रत्येक कामाला ठराविक वेळ द्या.
✒️ महत्त्वाचें काम करताना फोन किंवा अन्य साधने यांचे नोटिफिकेशन बंद करा.
✒️ काही कामांना ठराविक वेळ देऊन ठेवा – जसे दर तासाला 5 मिनिटे WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ईमेल चेक करणे. ( वैयक्तिक)
✒️ One at a time – एका वेळी एकच काम करा.
✒️ Pomodoro सारखे technique वापरून पहा. ( 25 मिनिटे एकच काम करणे आणि नंतर ब्रेक घेणे)
✒️ तंत्रज्ञान आणि गॅजेट्स यांचा वापर नियंत्रित करा.
✒️ स्वतःकडून योग्य अपेक्षा ठेवा, स्वतःचे अवलोकन करा.
✒️ आपले यश आणि आनंदी क्षण छान साजरे करा.
✒️ स्वतःला वेळ द्या.
✒️ Fomo पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
एकूणच काय तर Multitasking हे एक मोठे मिथक आहे, ते जीवनावश्यक अजिबात नाही, उलट त्यामुळे आपले नुकसान होत असते, कोणतेही काम mindfully करणे आणि त्याचा आनंद घेणे हे सर्वात चांगले माध्यम आहे ज्यामुळे आपण तणावमुक्त राहतो आणि आपली कार्यक्षमता देखील वाढीस लागते.



