गेल्या महिन्यात सीमा चा कॉल आला, ती खूपच डिस्टर्ब वाटत होती. गेले वर्षभर ती डिप्रेशन सोबत लढत आहे, पण एका घटनेने तिला खूपच वाईट वाटले, ज्या लोकांसोबत तिचे कायमचे उठणे बसणे होते त्यांनी अचानक तिला पार्टी ला बोलवले नाही, कारण विचारता तिला एक मैत्रीण म्हणाली की अमुक व्यक्ती बोलत होती की सीमा डिप्रेशन मध्ये आहे उगाच तिला बोलवू नका, काही झालं तर उगाच आपल्या डोक्याला त्रास…. हे ऐकून तिचा पारा प्रचंड चढला…
अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमी होत असतात, मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार यांच्याबद्दल समाजात अनेक गैरसमज प्रचलित आहेत, या गैरसमजुतींमुळे आणि समाजाच्या विक्षिप्त वागण्याने अनेक मनोरुग्ण दुखावले जातात, त्यांची recovery देखील मंदावते. आजचा लेख अशाच काही प्रमुख गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, हा लेख आपण शेअर करून मनोरुग्णांची मदत करावी अशी विनंती.
मनोरुग्ण हे इतर लोकांच्या तुलनेत जास्त धोकादायक असतात.
मनोरुग्ण व्यक्ती ही अनेकदा त्यांच्यासोबत झालेल्या हिंसेमुळे/ अत्याचारामुळे त्रासलेली असते, खूप कमी मानसिक आजारात हिंसा किंवा compulsive वागणूक दिसून येते, अनेकदा सामान्य व्यक्तीच्या तुलनेत मनोरुग्ण जास्त शांत असतात.
मनोरुग्ण हे weak असतात.
मानसिक आजार हे व्यक्तीच्या कमजोरी/ कमकुवतपणाचे लक्षण अजिबात नाही, मानसिक आजार हे अनेक कारणांनी होत असतात जसे जनुकीय रचना, पारिवारिक परिस्थिती, शारीरिक व्याधी, व्यक्तिमत्व इत्यादी. ह्या उलट मानसिक आजारातून जाताना देखील अनेक लोक दैनंदिन आयुष्य व्यवस्थित जगत असतात/ जगण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे ते strong असतात weak नाही.
मानसिक आजार अस्तित्वात नसतात, लोक फक्त त्याचे नाटक करत असतात.
मानसिक आजार हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर आघात करतात असतात, यामुळे व्यक्तीचे नुकसान होत असते, कुणीही आपल्या मानसिक आजारांचे ढोंग करत नाही. मानसिक आजारामुळे व्यक्तीच्या मेंदूच्या संरचानेवर प्रभाव पडत असतो हे सिद्ध देखील झाले आहे. काही लोक हे मानसिक आजारांचे नाटक करत असतात पण असे pretend करत राहिले तर त्यांना मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते.
मनोरुग्ण व्यक्तींना फक्त attention हवे असते.
काही लोक attention साठी दिखावा नक्कीच करत असतील पण वास्तविक आपल्या समाजात मानसिक आजार आणि मनोरुग्ण यांविषयी तिरस्कार पाहायला मिळतो. डिप्रेशन, anxiety अशा प्रॉब्लेम ला देखील लोक इग्नोर करतात त्यामुळे रुग्ण त्यांची वाच्यता कुठेही करत नाही, मनोरुग्ण अनेकदा एकांतात राहणे आणि इतर कुणासोबत शेअर न करणे पसंत करतात.
मानसिक आरोग्य देखील शारीरिक आरोग्यासारखे सहज ठीक करता येते.
शारीरिक आरोग्य हे गोळ्या, औषधे, ऑपरेशन मुळे ठीक होते पण मानसिक आरोग्य ठीक होण्याची प्रोसेस ही थोडी मोठी असते. शारीरिक आणि मानसिक नुकसान भरून निघण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते, त्यासाठी समाज, मित्रांची वागणूक असे घटक देखील जबाबदार असतात. मनोरुग्ण ठीक होण्यात त्यांच्या भोवतालची परिस्थिती आणि समुपदेशन यांचा मोठा वाटा असतो.
फक्त औषधे घेऊन मानसिक आजार ठीक होतात.
काही मानसिक आजारात औषधे घेणे हे गरजेचे असते परंतु फक्त औषधाने मानसिक रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, त्यासाठी त्याने स्वतःची विचारसरणी आणि वागणुकीत बदल करणे आवश्यक असते. यासाठी counselling, थेरपी आणि support ग्रुप उपलब्ध असतात.
दुर्लक्ष केल्यास मानसिक आजार दूर होतात.
आपले दुखणे जर आपण अंगावर काढले तर जसे त्याचे रूपांतर मोठ्या आजारात होते तसेच भावना किंवा मानसिक आजार हे इग्नोर केल्याने त्यांची तीव्रता वाढते. उलट मानसिक अजारांकदे वेळीच लक्ष देणे केव्हाही चांगले असते.
लहान मुलांना मानसिक आजार होत नाहीत.
लहान मुलांना देखील मानसिक त्रास/ आजार होऊ शकतात, उलट लहानपणी मिळालेला trauma, झालेले अत्याचार, अन्याय यामुळे त्यांचे नाजूक मन जास्तच दुःखवले जाते.
मानसिक आजार पूर्णपणे कधीच बरे होत नाहीत.
अनेक स्टडी आणि रिपोर्ट नुसार एखादी व्यक्ती ही मानसिक आजारावर पूर्णपणे मात करू शकते, त्यासाठी योग्य समुपदेशन आणि ट्रीटमेंट गरजेची असते
मनोरुग्ण हे आपल्या सर्वांसारखे असतात, उलट त्यांना मित्राची जास्त आवश्यकता असतात, त्यांना ऐकून – समजून घेणारे कुणी मिळाले की मग ते लवकर बरे होतात. त्यांच्याशी सौजन्याने वागणे हे आपले कर्तव्य आहे.



