Men & Feelings

Table of Contents

आपल्या समाजात भावना व्यक्त करण्याच्या बाबतीत खूप दुजाभाव आढळतो, स्त्रियांना नेहमी संवेदनशील आणि नाजूक समजले जाते म्हणून त्यांनी त्यांच्या भावना मांडणे, रडणे हे समाजमान्य असते परंतु त्याच ठिकाणी एखादा पुरुष जर कधी अशा भावना मांडत असेल तर समाज त्याकडे वेगळ्याच नजरेने पाहतो, “बाई सारखे काय रडत आहेस ?” असा शेरा त्याला दिला जातो, पुरुषांना आपला समाज निडर आणि कठोर समजतो. “मर्द को दर्द नही होता.” अशा भंपक डायलॉग मुळे पुरुषाने भावना व्यक्त करणे चुकीचे आहे हा समज दृढ होत चालला आहे. यातूनच toxic masculinity चा जन्म होतो.

हे कल्चरल नॉर्म आणि रूढी या पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत, आणि त्या पुरुषांसाठी खूपच हानिकारक आहेत, जो पुरुष आपल्या भावना व्यक्त करतो त्याला कमजोर समजण्यात येते. समाजात आपली खिल्ली उडू नये म्हणून शक्यतो पुरुष त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत त्यांना दाबून ठेवणे पसंत करतात, पण भावना दाबून ठेवल्याने मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतात.

पुरुष भावना लपवणे का पसंत करतात ?

स्त्रिया आपल्या भावना पुरुषांच्या तुलनेत अगदी सहज व्यक्त करतात, पण बालपणापासून पुरुषांच्या मनावर बिंबवले जाते की भावना व्यक्त करणे हा पुरुषासाठी कलंक आहे. ती ” बाईल्या” लोकांची लक्षणे आहेत. अशी कमजोरी दाखवल्याने समाजातील त्यांची प्रतिमा कलंकित होईल. विशेषतः पुरुषांना असे पढवले जाते की कुणासमोर रडणे म्हणजे आपल्या पुरुषत्वाचा (masculinity) अपमान करणे आहे.

पुरुषांना भावना नसतात का ?

आपला समाज पुरुषांना कठोर समजतो, प्रत्येक परिस्थिती मध्ये त्याने strong राहणे आवश्यक समजले जाते, पुरुष भावना व्यक्त करत नाहीत म्हणून ते असंवेदनशील आणि भावनाशून्य असतात असे नाही. रिसर्च नुसार पुरुष आणि स्त्रिया दोघांवर भावनांचा प्रभाव सारखाच होतो. पण फक्त सामाजिक बंधने आणि अलिखित नियम यांमुळे पुरुष अव्यक्त राहतात. त्यामुळे पुरुष उदास किंवा दुःखी असताना सहसा त्यांच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात ते सहज दिसून येत नाही.

या उलट जे पुरुष दुःख सहन करत असतात, ते त्यांच्या भावना समाजाच्या दृष्टीने योग्य असलेल्या भावनांमध्ये रुपांतरीत करतात. उदा. एखादा दुःखी किंवा डिप्रेस्ड पुरुष हा दुःख न दाखवता त्याचे रूपांतर राग आणि चिडचिड या भावनेत करतो.

समाजाच्या मते dominance, strength यांच्याशी निगडित भावना ह्या पुरुषी भावना आहेत, त्यामुळे पुरुषाने चिडचिड करणे, रागावणे, आक्रमक होणे आणि हिंसक होणे या भावना पुरुषी मानल्या जातात. भावना या पाण्याच्या प्रवाहासारख्या असतात, त्यांना मार्ग कुणीच अडवू शकत नाही. त्यामुळे दुःखात असलेले पुरुष चिडचिड करणारे आणि रागीट होतात.

भावना दाबून ठेवल्याने होणारे दुष्परिणाम –

आपल्याला आणि जनावरांना वेगळा करणारा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपली भावना समजून घेण्याची आणि त्यांच्या अनुसार कृती करण्याची शक्ती. जेव्हा आपण खुश असतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर आनंद असतो, शरीरात उत्साह संचारतो तर रागावलो की शरीर सतर्क होते आणि आवाज वाढतो. खूप जास्त उदास आलो की रडायची ईच्छा होते.

पण जेव्हा आपण आपल्या भावना दाबतो तेव्हा त्यातून अनेक मानसिक आजार आणि विकार जन्म घेतात. व्यक्ती सहज डिप्रेशन आणि anxiety चा शिकार होऊ शकतो. पुरुषांच्या बाबतीत सांगायचे तर भावना रोखून ठेवल्यास मनात आत्महत्येचे विचार देखील येतात.

पुरुषांनी कळत्या वयापासून अनेकदा ” पुरुष बन/ be a man” हे वाक्य ऐकलेले असते, त्यामुळे तेच sub counscious mind मध्ये घर करून असते, भावना रुपांतरीत करायची पुरुषांचा इतकी सवय होते की त्याचे रूपांतर नंतर हानिकारक पुरुषत्वात / toxic masculinity मध्ये होते. ही सवय सोडवायला मग खूप प्रयत्न करावे लागतात.

Toxic masculinity चे धक्कादायक वास्तव

✳️ ” पुरुष नीच च असतात, स्त्री ने सांभाळून राहायला हवे.” हे वाक्य रेप नंतर हमखास कानी पडते, toxic masculinity मुळे व्यक्ती स्त्री ला कमजोर आणि उपभोग योग्य समजू लागतो.
✳️ हिंसा – toxic masculinity मुळे भावनांचे रूपांतर हिंसेत होते, त्याचा शिकार बायको, प्रेयसी, आई, बहीण, किंवा दुसरा पुरुष देखील असू शकतो.
✳️ आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार सांगायला संकोच वाटतो. त्यामुळे ट्रॉमा जाणवू शकतो.
✳️ ” पुरुष नीच असतात, स्त्री ने सांभाळून राहायला हवे.” हे वाक्य रेप नंतर हमखास कानी पडते, toxic masculinity मुळे व्यक्ती स्त्री ला कमजोर आणि उपभोग योग्य समजू लागतो.

✳️ हिंसा – toxic masculinity मुळे भावनांचे रूपांतर हिंसेत होते, त्याचा शिकार बायको, प्रेयसी, आई, बहीण, किंवा दुसरा पुरुष देखील असू शकतो.

पुरुषांनी भावना व्यक्त कशा कराव्या ? toxic masculinity मधून बाहेर कसे यावे ?

यासाठी पुरुषांनी असुरक्षित फील करणे महत्वाचे आहे, मनातील खऱ्या भावना जजमेंट ची भीती न बाळगता व्यक्त करणे सुरू केले पाहिजे पण हे वाचायला जितके सोपे आहे तितकेच प्रत्यक्षात आणण्यासाठी कठीण आहे. एखादी जुनी सवय मोडणे कठीण असते, त्यामुळे यासाठी मी वापरलेल्या काही टिप्स मांडतो.

✳️ भावनांशी प्रामाणिक रहा – बरेचदा आपल्याला दुःख झाले की आपण strong होण्याच्या घाईत ती भावना दाबून टाकतो, पण इथे लक्षपूर्वक आपली भावना समजून घ्यायची आहे आणि ती स्वीकारायची आहे. आपण का दुःखी आहोत हे समजून घ्यायचा आणि भावना व्यक्त करायचा प्रयत्न करायचा आहे.

✳️ छंद जोपासा – अनेकदा आपल्याला भावना व्यक्तींसमोर मांडता येत नाहीत, पण तेच एक पाळीव कुत्रा किंवा मांजर असेल तर आपण त्या सोबत सर्व भावना judge न होण्याच्या खात्रीने मांडू शकतो, मन मोकळे होते. हेच cooking, ड्रॉइंग, पेंटिंग बद्दल लागू होते.

✳️ थेरपी घ्या – पुरुषी अहंकार अनेकदा आपल्याला मदत घेण्यापासून परावृत्त करतो, आपण वेडे नाहीत आणि मला कुणाची गरज नाही असा समज यासाठी कारणीभूत असतो. पण निश्चय केल्यास थेरपिस्ट निवडून मग त्याच्याशी बोलून आपल्या toxic masculinity मधून बाहेर येता येते. जितक्या लवकर सुरुवात करू तितके रिझल्ट छान येतात.

✳️ अन्य पुरुष मित्रांशी मैत्रीचे नाते असू शकते, जशा मुली हातात हात घेऊन चालतात किंवा एकमेकांना मिठी मारतात तसेच तुम्ही पण खूप डिस्टर्ब असल्यावर करू शकता उगाच त्याला समलिंगी समजू नका. Toxic masculinity मुळे Homophobia निर्माण होतो. सोशल मीडिया वर no homo हा देखील याचाच प्रकार आहे. प्रत्येक गोष्टीला सेक्स या एकाच angle ने बघू नका.

प्रिय पुरुष मित्रांनो आपण सुद्घा सर्व भावना व्यक्त करू शकतो, रडू शकतो. फक्त त्यासाठी योग्य व्यक्ती निवडा आणि मन मोकळे करा. दुसऱ्यांना देखील judge करणे थांबवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*