डिप्रेशन हा सर्वात कॉमन मानसिक आजार आहे. याची सर्व लक्षणे ही आज सर्वश्रुत आहेत पण अनेकदा आपण लोकांना डिप्रेशन चे नाटक करताना पाहतो, आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी किंवा लोकांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी लोक आपण डिप्रेस्ड आहोत असे सांगतात. आजच्या लेखात याच डिप्रेशन चे नाटक म्हणजेच Malingering बद्दल आपण थोडी माहिती घेऊ.
Malingering म्हणजे जबाबदारी कमी करण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या मानसिक समस्यांचे केलेले उदात्तीकरण. उदा. एखाद्या मुलाने आपल्याला attention द्यावे म्हणून आपण अती दुःखात आहोत असे फेसबुक वर सतत पोस्ट करत राहणे.
खोटे डिप्रेशन किंवा Malingering सहज लक्षात येत नाही कारण डिप्रेशन ची अनेक लक्षणे सहज कॉपी करता येण्यासारखी असतात, जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशन चे नाटक करायचे ठरवते तेव्हा ती ठरवून सर्व लक्षणे असल्याचे इतरांना भासवत असते. उदा. आपण खूपच दुःखी आहोत, आपले कुणीच नाही असे वागणे जेणेकरून लोकांचा सहज विश्वास बसतो की समोरील व्यक्ती ही डिप्रेशन मध्ये असू शकते.
ह्याच बाबीचा विचार करून dsm 5 मध्ये Malingering चा समावेश एक गंभीर मानसिक स्थिती म्हणून केला असून त्यावर इलाज करणे अत्यावश्यक आहे असे नमूद केले आहे, जर योग्य इलाज घेतला नाही तर त्यातून अनेक गंभीर मानसिक आजार उद्भवू शकतात.
Malingering ची लक्षणे –
✳️ आपली लक्षणे किंवा परिस्थिती आहे त्यापेक्षा वाढवून चढवून सांगणे.
✳️ प्रत्येक वेळी नवीन नवीन लक्षणे सांगणे, लक्षणात विसंगती असणे.
✳️ कोणत्याच थेरपी चा फरक पडत नाही असे सांगून थेरपिस्ट बदलत राहणे.
वरील व्यक्ती जरी डिप्रेशन चे नाटक करत असली तरीही ते मानसिक तणावातून जात असतात त्यामुळे त्यांना इग्नोर करणे चुकीचे ठरते. सतत डिप्रेशन आहे असे फेक केल्याने शारीरिक त्रास देखील सुरू होऊ शकतात उदा. अंग दुखणे, पोटाचे विकार आणि डोकेदुखी.
Malingering ची कारणे –
कुणीही डिप्रेशन मुद्दाम फेक करत नाही, त्यासाठी अनेक कारणे कारणीभूत असतात. एखाद्या व्यक्तीला failure ची प्रचंड भीती असते त्यामुळे अशी परिस्थिती आली की दोष आपल्यावर येऊ नये म्हणून ते आपण मानसिक दृष्ट्या असक्षम असल्याचा दावा करतात, अनेकदा गुन्हेगार देखील याचाच फायदा घेऊन आपल्या गुन्ह्याला झाकायचा प्रयत्न करतात.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचे self esteem low असते तेव्हा त्यांना सतत validation हवे असते, अनेक लोकांनी आपल्याला attention द्यावे अशी इच्छा असते तेव्हा ते डिप्रेशन चे नाटक करतात ज्यामुळे लोक दया भावनेने त्यांना attention देतात. अनेकदा यातून पैसे किंवा शरीर सुख मिळवणे असे चुकीचे उद्देश देखील साध्य केले जातात.
Malingering चे निदान कसे करतात.
वर नमूद केल्या प्रमाणे याचे निदान करणे कठीण असले तरीही तज्ञांच्या मार्गदर्शनखाली प्रश्नावली आणि योग्य observation द्वारे व्यक्ती खरच डिप्रेशन मध्ये आहे की उगाच उदात्तीकरण करत आहे हे ओळखता येते.
आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचा किंवा मानसिक चुकीचे हेतू साध्य करण्याचा सोपा मार्ग म्हणून डिप्रेशन चे नाटक करणे हा मार्ग कधीही योग्य नसतो. एकदा असे केले आणि त्यातून हेतू साध्य झाला की मग ही सवय होते, इतरांना फसवता फसवता आपले मन देखील आपल्याला डिप्रेस्ड समजू लागते आणि त्यातून पुढे व्यक्ती खरच डिप्रेशन किंवा अनेक मानसिक आजारांचा शिकार होऊ शकते.



