मी तुझी मदत करतो किंवा मी सर्व काही ठीक करू शकतो हा स्वभाव अनेकांकडे असतो, आपल्याला या लोकांप्रती एक वेगळा आदर असतो. आपल्या आयुष्यातून वेळ काढून ते सर्वांना कशी मदत करतात, आपण सुद्धा असेच असावे असे अनेक विचार आपल्या मनात येतात.पण अती प्रमाणात मदत करत राहिलो की त्याचे अनेक दुष्परिणाम देखील भोगावे लागतात. मदत करताना कुठे थांबावे हे देखील आपल्याला माहीत हवे. आजच्या लेखात मदत करायच्या सवयीचे obsession होत आहे हे कसे ओळखावे यावर आपण माहिती घेऊ म्हणजे कुठे थांबायचे ते सहज कळेल.
लोकांना मदत करताना पुढील पैकी कोणतीही गोष्ट जर तुम्हाला दिसत असेल तर तुमच्या सवयीचे रूपांतर obsession मध्ये होत आहे हे समजून जावे आणि त्वरित आपली सवय थांबवायला प्रयत्न करावे/ आपल्या स्वभवतून ब्रेक घेणे.
✳️ तुम्ही तुमच्या आयुष्यातील छोटी गोष्ट पण इतरांचा विचार करून करत असाल तर.
तुमची विचारप्रणाली तुम्हाला फक्त तुमच्या बद्दल विचार करायला विरोध करत असेल उदा. एखाद्या ठिकाणी कोणते कपडे घालावे हा विचार करताना इतर लोकांना काय वाटेल, ते कसा विचार करतील, त्यांना हे आवडेल का ? हे सर्व प्रश्न जर डोक्यात येत असतील तर आपण दुसऱ्यांचा विचार जास्त करत आहोत हे समजून जावे.
✳️ जर तुम्ही त्यांना मदत केली नाही तर कुणीच करणार नाही.
एखादी व्यक्ती संकटात असताना तिला मदत करावी वाटणे स्वाभाविक आहे पण आपण मदत केली नाही तर त्याला कुणीच मदत करणार नाही किंवा कुणालाच ते जमणार नाही असा विचार करून सर्व जबाबदारी स्वतःवर घेणे.
✳️ एका निनावी लक्षाकडे वाटचाल करणे.
दुसऱ्यांना मदत करताना एका रेस मध्ये आपण आहोत आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांना मदत करायची आहे, त्यासाठी आपण कितीही मेहनत घेऊ शकतो असा स्वभाव निर्माण होणे.
✳️ तुम्ही एकटे असताना किंवा तुम्हाला गरज असताना तुम्ही एकटे असणे.
इतरांची दुःख ऐकून घेताना पूर्ण लक्ष देऊन ऐकता पण जेव्हा तुम्हाला ऐकून घेणार कुणी हवे असते तेव्हा तुम्ही एकटे असता. तुमची बाजू ऐकून घ्यायला कुणीच उपलब्ध नसणे. किंवा तुम्हाला मदतीची गरजच नाही असे लोकांना वाटणे.
✳️ सर्वांचे अश्रू पुसणे.
कुणीही थोडे दुःखी असले किंवा रडत असले तर तुम्ही त्यांचे अश्रू पुसायला तत्पर असता. तेव्हा ते चूक की बरोबर हा विचार ही तुम्ही करत नाही.
✳️ ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांच्या शोधात असणे.
तुम्ही सतत कुणाला मदतीची गरज आहे का हे शोधत असता, त्यांच्या वागण्यावरून ते कदाचित दुःखी असतील असा समज करून घेऊन त्यांना मदत हवी आहे का असे विचारता.
✳️ समोरच्या व्यक्तीला मदतीची गरज आहे की नाही हे न पाहणे.
एखादा संक्तटत असताना त्याला खरच मदतीची गरज आहे की नाही हे न पाहता तुम्ही सरळ त्याच्या विषयात मध्यस्ती करता.
✳️ स्वतःचे प्रॉब्लेम बाजूला ठेऊन तुम्ही दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम ला जास्त किंमत देता.
तुम्ही दुसरे प्रॉब्लेम मध्ये असताना आपला सर्व वेळ आणि अन्य सोर्स वापरून त्यांची मस्त करता, अनेकदा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही किंवा तुम्ही सुखी आहात असा समोरच्याचा समज होतो.
✳️ समोरच्याला त्याचे उत्तर/ solution शोधू न देणे.
समोरची व्यक्तीला त्याच्या समस्या समजावून त्यावर स्वतः उत्तर शोधायला प्रवृत्त न करता तुम्ही सांगितलेला मार्ग एकमेव आहे आणि तो त्यांनी ऐकायलाच हवा असा विचार करून मदत करणे. याने आपण त्यांना परावलंबी करत असतो.
✳️ सतत सल्ले देणे.
कधी कधी समोरच्याला फक्त कुणीतरी शांतपणे ऐकून घेणारे हवे असते अश्यावेळी सल्ले दिल्याने ते अजून दुःखी होऊ शकतात.
✳️ तुम्ही कंट्रोलर होत जाता.
सर्व काही चुकीचे सुरू आहे आणि तुम्ही ते ठीक करू शकता असा तुमचा भ्रम होतो आणि त्यामुळे तुम्ही सर्व परिस्थिती कंट्रोल करू लागता त्यामुळे तुम्ही dominating आहात असा समज देखील होऊ शकतो.
✳️ तुमचा उद्देश मदत करणे असेल पण त्याने परिस्थिती अजून खराब होते.
तुमचा उद्देश किंवा हेतू काय आहे यावर कुणालाच संशय नसतो पण तुमच्या मार्गाने चालल्यास मदत कमी आणि त्रास जास्त होतो त्यामुळे तुम्हाला guilt येणे किंवा वाईट वाटणे.
✳️ दुसऱ्यांची मदत करणे तुमच्या आयुष्यात आनंदाचे एकमेव कारण होणे.
आपला आनंद हा आपल्यात न शोधता तो इतरांमध्ये शोधणे चुकीचे असते. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळतो तेव्हा चांगले वाटणे स्वाभाविक आहे पण जर हे एकमेव आनंदाचे कारण असेल तर आपल्याला बहुतांश वेळा दुःखी किंवा चुकल्यासारखे वाटू लागते.
✳️ तुमचीच मते बरोबर आहेत असा समज निर्माण होणे.
तुम्ही दिलेला सल्ला बरोबर आहे किंवा तुमचे मत योग्य आहे हा समज ठीक आहे पण दुसऱ्याची चूक आणि बरोबर ची व्याख्या वेगळी असू शकते त्यामुळे आपली मते त्यावर थोपणे केव्हाही चूक असते हे समजून घ्यायला हवे.
दुसऱ्याची मदत करणे हे कितीही विधायक असले तरीही त्यातून आपल्याला खूप त्रास होतो त्यामुळे मदत करताना कुणाला आणि का करत आहोत हे समजून मदत करणे कधीही योग्य. जर या सवयीचा त्रास होत असेल तर ब्रेक घेणे केव्हाही उत्तम.



