कृतज्ञता नोंदवही (Grattitude Journal)

Table of Contents

आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण, अनिश्चितता आणि माहितीचा सततचा प्रवाह यामुळे मनावर अतिरिक्त तणाव निर्माण होत आहे, आपल्या भोवताली नकारात्मकतेचे एक वलय तयार झाले आहे, अशा परिस्थितीत “सकारात्मक विचारशैली ठेवावी” हा सल्ला अनेकदा दिला जातो, पण प्रत्यक्ष जीवनात ती टिकवणे आव्हानात्मक असते. या ठिकाणी कृतज्ञता नोंदवही ही एक सोपी पण अत्यंत प्रभावी पद्धत मानसिक संतुलन निर्माण करण्यास मदत करते.

कृतज्ञता नोंदवही (Gratitude Journal) म्हणजे दिवसातील सकारात्मक अनुभवांची जाणीवपूर्वक नोंद—एक अशी सवय, जी मेंदूला नकारात्मक माहितीपासून दूर नेऊन भावनिक स्थिरता वाढविण्यास मदत करते.

कृतज्ञता नोंदवही (Gratitude Journal) म्हणजे काय?

कृतज्ञता नोंदवही (Gratitude Journal) म्हणजे दिवसभरातील सकारात्मक अनुभव किंवा भावनिक क्षण यांची नियमित नोंद ठेवण्याची पद्धत. ही प्रक्रिया केवळ डायरी लेखन नसून reflection-based therapeutic practice आहे, जी Positive Psychology च्या विविध मॉडेल्सद्वारे समर्थित आहे.

कृतज्ञता नोंदवही (Gratitude Journal) चा मुख्य उद्देश:
  • वर्तमान काळाकडे सजगतेने पाहणे
  • सूक्ष्म सकारात्मक अनुभवांची दखल घेणे
  • मनातील भावनिक फोकस संतुलित करणे

कृतज्ञता नोंदवही (Gratitude Journal) चे फायदे

अनेक संशोधनांनुसार कृतज्ञता नोंदवही (Gratitude Journal) वापरणाऱ्या व्यक्तींमध्ये पुढील बदल पाहायला मिळतात:

1. Mental Health Improvement
  • ताण आणि चिंता कमी होते
  • नैराश्याशी संबंधित नकारात्मक विचारांमध्ये घट
  • Emotional resilience वाढते
2. Positive Psychology Support

Martin Seligman यांच्या PERMA मॉडेलनुसार Gratitude हे Positive Emotions आणि Meaning या दोन महत्त्वाच्या घटकांना थेट बळकटी देते.

3. Cognitive Reframing

नियमित कृतज्ञता लेखनामुळे मेंदूचा “problem-focused mode” कमी होऊन “solution-focused आणि appreciation-based mode” वाढतो.

4. Relationship Enhancement

Appreciation व्यक्त करण्याची प्रवृत्ती वाढल्याने संवाद, सहकार्य आणि आपुलकी सुधारते.

5. Improved Sleep & Emotional Balance

रात्री कृतज्ञतेची नोंद केल्याने ताण कमी होतो, विचार स्पष्ट होतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

कृतज्ञता नोंदवहीचे (Gratitude Journal) लिखाण कसे करावे ?

प्रत्येक दिवसासाठी एक मार्गदर्शक संरचना :

  • आजच्या दिवसातील तीन सकारात्मक अनुभव: हे अनुभव छोटे असले तरी लिहा. उदा. कुणी केलेली साधी मदत, एखादा प्रेरणादायी संवाद, निसर्गातील एखादा शांत क्षण.
  • या अनुभवाने माझ्या भावनांवर कसा परिणाम झाला? : इथे फोकस “भावनिक परिणामांवर” असावा. उदा. या नंतर मला शांत वाटले, समाधान मिळाले, प्रेरणा मिळाली. इत्यादी.
  • त्या अनुभवामागे कोणाचे योगदान होते? : ही प्रक्रिया Appreciation आणि Relationship Awareness वाढवते, अगदी आपल्यासाठी लिफ्ट चे दार उघडणारा व्यक्ती सुद्धा यात येऊ शकतो.
  • मी हे appreciation कशा स्वरूपात व्यक्त केले / करू शकतो? त्याच वेळी मी यासाठी कृतज्ञता व्यक्त केली का ?, केली तर कशाप्रकारे ? केली नसल्यास लिहिताना विचार करून ती व्यक्त करा, छोटे शब्द, कृती किंवा acknowledgment — हे भावनात्मक आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते.
  • आजचे ‘Key Learning’ किंवा सूक्ष्म जाणीव : प्रत्येक दिवसात एक छोटी शिकवण असतेच; त्याची नोंद आपल्याला दीर्घकालीन clarity देते.

कृतज्ञता नोंदवही (Gratitude Journal) लिहिताना येणाऱ्या सामान्य अडचणी आणि त्यावरील उपाय

अडचण 1: “काय लिहू ते सुचत नाही.”

मेंदूचा नकारात्मक बायस नैसर्गिक आहे. आपण हा प्रयत्न आधी केला नसल्याने सुरुवातीला असे वाटणे स्वाभाविक आहे. उपाय: सूक्ष्म अनुभव ओळखण्याचा सराव करावा, जसे की शांत प्रवास, छोटा संवाद, स्वतःसाठी काढलेली 5 मिनिटे, कुणाकडून आलेली कॉम्प्लिमेंट.

अडचण 2: सातत्य राखणे कठीण जाते

आठवड्यातून किमान 3 दिवस लिहिण्याचा मिनिमम प्लॅन ठेवा, मी आज लिहिणार आहेच असे ठरवून बसा, हे कोणतेही व्रत नाही त्यामुळे खंड पडल्यास जेव्हा शक्य आहे तेव्हा लिखाण पुन्हा सुरू करा.

अडचण 3: “माझ्या गोष्टी खूप छोट्या आहेत”

काही घटना आपल्याला फार छोट्या वाटतात, यात लिहिण्यासारखे काय आहे ? असा प्रश्न अनेकदा पडू शकतो अशावेळी त्या घटनांचा जाणीवपूर्वक उल्लेख करावा. Gratitude सूक्ष्म घटनांमधूनच सर्वाधिक परिणाम करतो हे Positive Psychology च्या micro-interventions ने सिद्ध झाले आहे.

अडचण 4: वेळ कमी असतो

फास्ट जगात आपण अनेकदा कामात व्यस्त असतो अशा वेळी 2-मिनिटांची “Micro Gratitude Entry” करावी ज्यात आजचा 1 चांगला अनुभव आणि त्याने आपला मूड कसा बदलला? हे नमूद करायचे असते.

वास्तव जीवनातील काही उदाहरणे

  • Workday Reflection: “आजच्या टीम मिटिंगमध्ये माझे काम सकारात्मकरीत्या स्वीकारले गेले. एका सहकाऱ्याने आवश्यक माहिती योग्यवेळी दिली, त्यामुळे माझा workload कमी झाला. दिवसाचा शेवट समाधानकारक वाटला.”
  • Home & Family Gratitude: “संध्याकाळी मुलांसोबत थोडा शांत वेळ घालवला. हा छोटा संवाद दिवसभराच्या तणावानंतर मानसिक स्थिरता देणारा ठरला.”
  • Personal Wellbeing Reflection: “आज स्वतःला guilt न देता काही मिनिटे ब्रेक घेतला. या ब्रेकमुळे विचार अधिक स्पष्ट झाले आणि निर्णयक्षमता सुधारली.”
  • Social Interaction Moment: “घरी जाताना रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तीने सहज हसत संवाद साधला. त्यांचा सकारात्मक स्वभाव आणि सहजता दिवसातील ताण कमी करण्यास मदतीची ठरली.”

समारोप

कृतज्ञता नोंदवही (Gratitude Journal) म्हणजे फक्त लेखन नाही तर ते मेंदूचे प्रशिक्षण (mental conditioning), भावनिक स्थिरता (emotional regulation)
आणि सकारात्मक दृष्टिकोन (positive mindset) निर्माण करणारे structured tool आहे.

दिवसातील मोठ्या घटनांपेक्षा सूक्ष्म क्षणांकडे पाहण्याची क्षमता वाढली की व्यक्ती मानसिकदृष्ट्या अधिक संतुलित, आत्मविश्वासी आणि भावनिकदृष्ट्या परिपक्व बनते. कृतज्ञता नोंदवही (Gratitude Journal) ही त्याची लहान, साधी, पण आयुष्य बदलण्याची क्षमता असलेली सुरुवात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*