कालच्या लेखानंतर अनेक पालक आणि विद्यार्थी यांनी परीक्षेच्या दिवसाचे नियोजन कसे करावे विचारले, आजच्या लेखात परीक्षेच्या दिवशी घरी आणि परीक्षा स्थळ येथे कसे नियोजन करावे. काय करणे कटाक्षाने टाळावे आणि कोणते टिप्स वापरावे यावर माहिती घेऊ.
परीक्षेच्या दिवशी करायची तयारी.
✳️ परीक्षेचा अधल्या दिवशी लवकर झोपा, परीक्षेच्या दिवशी तुमची पूर्ण झोप झालेली असावी आणि झोपेतून उठल्यावर एकदम फ्रेश वाटायला हवे.
✳️ पोटभर नाश्ता करा पण अती तेलकट किंवा पचनास जड अन्न खाऊ नका.
✳️ सर्व साहित्य जसे पेन, पेन्सिल, घड्याळ, hall तिकीट सोबत आहे की नाही हे तपासा.
✳️ पाण्याची बाटली नेहमी सोबत असू द्या.
✳️ राहिलेले विषय/ टॉपिक वाचण्याचा किंवा त्याचे पॉइंट समजून घेण्याचा प्रयत्न निघताना करू नका.
✳️ किमान 30 मिनिट आधी परीक्षा स्थळी पोहचा.
✳️ आपले अनेक मित्र परिक्षेआधी चर्चा करत असतात जसे तुझा किती अभ्यास झाला, हा टॉपिक केलास का ?, अमुक प्रश्न नक्की येणार आहे. अश्या चर्चा कटाक्षाने टाळा.
✳️ जर चिंता वाटत असेल तर दीर्घ श्वसन सुरू करा, स्वतःशी सकारात्मक चर्चा करा. सतत स्वतःला आठवून द्या की तुम्ही छान तयारी केली आहे आणि तुम्ही पेपर छान solve करणार आहात.
Exam हॉल मधील नियोजन.
✳️ उत्तर पत्रिकेत सर्व माहिती योग्य प्रकारे भरून घ्या.
✳️ प्रश्न पत्रिका मिळाली की सर्वात आधी ती वाचून घ्या. कोणते प्रश्न पर्यायी आहेत आणि negative मार्किंग आहे का हे तपासून घ्या.
✳️ प्रश्नांना 3 भागात विभागून घ्या. 1. सोपे, २. Manage होऊ शकणारे, 3. कठीण
✳️ वेळेचे नियोजन करा –
❤️ कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे ठरवा आणि तसे मनात ठरवून घ्या.
❤️ वेळेत जर उत्तर पूर्ण झाले नाही तर थोडी जागा सोडून पुढील प्रश्न सुरू करा.
❤️ वेळेचे नियोजन करताना अपूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी थोडा वेळ राखीव ठेवा.
❤️ जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा.
❤️ आधी सोपे मग manage होणारे (moderate) आणि शेवटी कठीण प्रश्न या क्रमाने पेपर सोडवा.
❤️ गरज नसल्यास जास्त मोठी उत्तरे लिहिणे टाळा.
Presentation कडे लक्ष द्या.
✳️ अक्षर चांगले आणि वाचण्यायोग्य असू द्या.
✳️ Paragraph न लिहिता पॉइंट नुसार उत्तरे लिहा.
✳️ उत्तराला योग्य प्रकारे मांडायला जमेल तिथे Diagram किंवा चार्ट वापरा.
✳️ महत्वाचे मुद्दे अधोरेखित म्हणजेच underline करा. ( हे शक्यतो पूर्ण पेपर लिहून झालं की करावे)
पालकांसाठी काही सूचना.
आपल्या मुलांना प्रोत्साहन द्या, त्यांना परीक्षेची भीती किंवा चिंता वाटत असेल तर त्यांना आधार द्या. मुलांना अपयशाची भीती असते त्यामुळे परीक्षेचे अपयश हे आयुष्याचे अपयश नसते हे पटवून द्या. मुलांना कधीच मार्क्स च खूप महत्त्वाचे असतात असे वाटून देऊ नका. चांगले मार्क म्हणजे चांगली नोकरी, आणि पुढे चांगले करियर तर कमी मार्क म्हणजे आयुष्याचा अंत हा विचार त्यांच्या मनात येऊन देऊ नका.
यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, वेळेचे नियोजन, चुकांमधून शिकणे आणि परिश्रम हेच यशाचे मार्ग आहेत.



