Insecurity चा सामना कसा करावा ?

Insecurity चा सामना कसा करावा

Table of Contents

आपण सर्व कधी ना कधी insecure फील करत असतो. पण जर हीच insecurity सतत डोके वर काढत असेल तर ती फारच त्रासदायक होऊन जाते, Insecure feel करण्याचे मूळ हे कमकुवत सेल्फ esteem असून ती विकसित करून आपण insecurity चा सामना उत्तम प्रकारे करू शकतो.

Insecurity कमी करण्यासाठी आपल्याला आपण कोण आहोत आणि समोरची व्यक्ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे घटक जास्त महत्वाचे असतात. अनेक वर्षांपासून असलेली insecurity ची भावना एका रात्रीत नाहीशी होत नाही पण खालील मार्ग त्यावर मात नक्की करू शकतात.

आपण जेव्हा insecure feel करतो तेव्हा सर्वात आधी स्वतःला सांगा की हो आता या क्षणी मला insecure वाटत आहे. स्वतःला अजिबात judge करू नका. आपल्या भावना स्वीकारून त्यांना लेबल करणे याला  “affect labeling” असे म्हणतात.

Affect labeling करण्याचे मुख्य 3 फायदे आहेत.

✳️ आपण स्वतःला insecurity पासून वेगळे करतो.
जेव्हा आपण स्वीकारतो की आपल्याला आता insecure वाटत आहे तेव्हा आपण insecurity ला भावना म्हणून वागणूक देतो, आपल्याला कळते की ही एक temporary  phase आहे आणि आपण त्यातून बाहेर पडू शकतो.

कुणी असे insecure फील करत असेल तर आपण जाऊन त्यांची चौकशी केली पाहिजे, त्याला त्यातून बाहेर यायला मदत केली पाहिजे कारण प्रत्येकाला खुश राहण्याचा हक्क आहे.

✳️ स्वतः सोबत छान मैत्री होते.
अनेकदा आपल्याला insecure वाटू लागले की आपण looser आहोत, कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकत नाही असा फील येऊ लागतो. पण जेव्हा आपण ही भावना temporary म्हणून स्वीकारतो तेव्हा आपल्याला कळू लागते की Insecurity हे आपल्या तेव्हाच्या स्थिती चे observation / मत आहे आपण कसे आहोत त्याचे प्रतिबिंब नव्हे.

जेव्हा आपल्यासोबत काय होत आहे हे आपण स्वीकारतो तेव्हा आपण एकटे कधीच पडत नाही. आपल्यासोबत कुणीतरी आहे ही भावना निर्माण होऊ लागते आणि आपली स्वतःशी मैत्री होऊ लागते.

✳️ आपण सत्य स्वीकारू लागतो.
एक strong व्यक्ती सत्य कितीही कठोर असले तरी ते स्वीकारते आणि त्याची लाज किंवा भीती बाळगत नाही. आपण insecure आहोत हे स्वीकारले की अर्धी समस्या दूर होऊन जाते.

Insecurity हा आपला शत्रू नसून आपण insecure आहोत हे अमान्य करणे हा आपला मोठा शत्रू आहे.

आपल्या नकारात्मक विचारांना आणि भावनांना आपण कोणत्याही judgement शिवाय लेबल करायला शिकायला हवे. ही सवय लावून घेतली की मग आपले सेल्फ नॉलेज आणि सेल्फ acceptance विकसित होऊ लागते आणि insecurity ची भावना समूळ नष्ट होऊ लागते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

RAPID METHOD
R.A.P.I.D Method प्रतिक्रिया नाही, प्रतिसाद द्या!

R.A.P.I.D Method ही भावना नियंत्रण (Emotional Regulation) सुधारण्यासाठी वापरली जाणारी प्रभावी मानसशास्त्रीय पद्धत आहे. ही तंत्रे प्रतिक्रिया (Reaction) ऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद (Response) देण्यास मदत करते.

Read More »
Mistakes Parents make while choosing career for children
मुलांचे करिअर निवडताना तुम्हीही याच चुका करत आहात का ?

आपल्या पाल्याचे करिअर स्थिर असावे, त्याने आयुष्यात प्रगती करावी आणि आनंदी रहावे अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. करियर निवडीसाठी दहावी आणि बारावी हे दोन टप्पे

Read More »
आपल्या मुलांसाठी योग्य चित्रपट कसे निवडावे ?

आजच्या डिजिटल युगात चित्रपट, वेबसीरिज आणि विविध प्रकारचा व्हिडिओ कंटेंट काही सेकंदांत उपलब्ध होतो. मोबाईल, टॅब, स्मार्ट टीव्ही यांच्या माध्यमातून मुले सहजपणे विविध प्रकारचे आशय

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*