Childhood Trauma

Table of Contents

बालपणी प्रत्येकाला अनुभव येतात, काही जण सहज नॉर्मल होतात तर काही त्या अनुभवांचे ओझे आजन्म वाहत असतात. ट्रॉमा किंवा आघात यांचे अनेक प्रकार आहेत जसे,
 •  अपघात खूप जवळून अनुभवणे,
 • खूप जास्त आजारपण किंवा एखादी सर्जरी,
 • आपल्या प्रियजनांना झालेली दुखापत / त्यांनी भोगलेला त्रास,
 • परिवाराकडून दुय्यम वागणूक मिळणे,
 • शारीरिक त्रास/ मारहाण,
 • लैंगिक छळ, त्याचे अनुभव पालकांना सांगितल्यावर त्यांनी तो इग्नोर करणे,
 • मानसिक समस्या सांगितल्यावर त्यांना इग्नोर करणे,
 • पालकांनी फक्त नोकरी किंवा कामाला महत्त्व देणे,
 • स्वतःच्या अडचणीच्या वेळी कुणीच सोबत नसणे,
 • पालकांकडून दोन मुलांमध्ये तुलना होणे.

वरील घटनांचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर खोलवर होत असतो. बाल्यावस्थेत असताना आपण आजूबाजूला होणाऱ्या प्रत्येक घटनेचा अर्थ आपल्या आकलनशक्ती प्रमाणे लावत असतो, त्याच आकलनातून जग कसे आहे, लोक जसे आहेत अशी मते बनत असतात, याच मतांच्या चष्म्यातून आपण जगाकडे बघत असतो. वय जसे वाढत जाते तसे नवीन अनुभव आपल्याला येतात आणि या मतांमध्ये बदल होत जातात आणि आपण ती मते अद्ययावत/ अपडेट करतो पण जर काही कारणामुळे नवीन मते तयार झालीच नाहीत तर ? त्यांना जीवन जगताना किती अडचणी येतील, जुन्या चष्म्यातून जग पाहणे म्हणजे प्रौढ म्हणून काम करण्याच्या क्षमतेचे नुकसान करणे. हाच जुना चस्मा न बदलण्याचे कारण म्हणजेच Childhood Trauma.

Childhood Trauma चे परिणाम

Childhood Trauma चे परिणाम खूप वेगवेगळे असतात पण खालील 4 परिणाम हे जास्त प्रमाणात दिसून येतात आणि त्यांचा प्रभाव पुढील आयुष्यावर देखील मोठ्या प्रमाणात होतो.

 • स्वतःचे चुकीचे चित्र तयार करणे / आभासी आयुष्य जगणे – लहान असताना आपली अपेक्षा असते की आपल्या पालकांनी आपल्यावर खूप प्रेम करावे, पण जेव्हा तेवढे प्रेम आपल्याला मिळत नाही तेव्हा आपण आपल्या चष्म्यातून विचार सुरू करतो. आपल्या पालकांना आपण कसे आवडू हे आपल्या विचारांनी आपण ठरवून तशी कृती करू लागतो. प्रसंगी आपले विचार बाजूला ठेवून, मूळ स्वभाव सोडून एक आभासी आयुष्य आपण जगायला लागतो. जेव्हा आपण आपले मूळ विचार सोडून देतो तेव्हा एक प्रकारे आपण आपले अस्तित्वच विसरून गेलेलो असतो. आपल्याला कायम भीती वाटत असते की जर आपण हा मुखवटा काढला तर आपल्याला मिळणारे प्रेम, काळजी ची भावना ही बंद होईल. हाच मुखवटा मग आपले अस्तित्व हिरावून घेतो.

 • स्वतःला victim समजणे – आपण स्वतःला काय समजतो तसेच आपण होत जातो, स्वताबद्दलचा आपला विचार आपल्याला शक्तिशाली किंवा शक्तिहीन बनवत असतो. पण सतत जर नकारात्मक विचार करत राहिलो तर आपण स्वतःला शक्तिहीन समजू लागतो आणि जीवनावर काहीच कंट्रोल नाहीये अशी आपली धारणा होते, हे सगळं माझ्या सोबतच का होतंय असे विचार मनात येऊ लागतात आणि आपण स्वतःला बळीचा बकरा किंवा victim समजू लागतो. लहानपणी हे ठीक असेलही पण म्हणून मोठे झाल्यावर सुद्धा हाच समज आपल्यासाठी त्रासदायक ठरतो. मग हा चष्मा बदलणे गरजेचे ठरते. आपल्याला कितीही वाटले की दुसरी काही चॉईस नाहीये अश्या वेळी सुद्धा आपल्याकडे एक चॉईस असते ती म्हणजे त्या परिस्थिती मध्ये विचार करण्याची चॉईस, लहान असताना आजूबाजूच्या परिस्थिती आपल्याला बदलता येत नाहीत पण मोठे झाल्यावर नक्कीच आपण विचारांनी आणि कृतीतून परिस्थिती बदलू शकतो.

 • Passive-Aggressiveness – बरेचदा अनेक घरात मुलांना राग व्यक्त करणे चुकीचे आहे असे शिकवले जाते, राग ही भावनाच चूक आहे असे मनावर बिंबवले गेले की त्यांच्या मनात रागाबद्दल चुकीची कॉन्सेप्ट तयार होते, किंवा काही ठिकाणी मुले रागाचे स्वरूप हे मारहाणीच्या रूपाने बघतात त्यामुळे राग म्हणजे मारहाण आणि राग वाईटच आहे अशी त्यांची समजूत होते, म्हणून स्वतःला जरी राग आला तरी ते तो दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही केसेस मध्ये राग बाहेर न आल्यामुळे तो सतत मनाच्या कोपऱ्यात तसाच राहतो आणि त्याचे रूपांतर Passive-Aggressiveness मध्ये होते, त्यातून मग कामे पुढे ढकलणे, सतत दुसऱ्यांना criticize करणे, blame करणे असे प्रकार सुरू होतात. अशी व्यक्ती सतत कुजत असते आणि अनेक मानसिक आजारांचे घर होऊन बसते.

 • निष्क्रियता – लहानपणी जेव्हा एखाद्याकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा तो राग आणि भीती ह्या भावना सोडून देतो जेणेकरून त्याला हवे असणारे प्रेम आणि attention मिळेल, एक आभासी आयुष्य तो जगू लागतो, पण जगाकडून प्रेम मिळवायचे प्रयत्न करताना तो स्वतःला पूर्ण हरवून बसतो. स्वतःच्या मुळ स्वभावाचा त्याग केल्याने सतत तो स्वतःला पाठी ठेवत असतो. आपल्यात असलेले पोटेन्शियल कधीच पूर्ण वापरात नाही, त्याला स्वतःच्या आवश्यकता माहीत असतात पण तो त्यांच्यासाठी प्रयत्न करत नाही. दुसऱ्यांच्या प्रेमाच्या अपेक्षेत हा व्यक्ती स्वतः निष्क्रिय रोबोट सारखे आयुष्य जगायला सुरुवात करतो.

स्वतःचे अस्तित्व गमावून जीवन जगणे म्हणजे यांत्रिकी जीवन जगणेच आहे. मग असे अनुभव जे आपल्याला त्रास देतात त्यांच्याशी कसे लढावे ?

मी कायम पुढील 9 स्टेप प्रोग्रॅम सांगत असतो.
 • Ground it- शांत ठिकाणी बसा, श्वास घ्या आणि शरीर आणि मन एकाग्र करा.
 • Recall it – ज्या गोष्टीने तुम्हाला ट्रॉमा पुन्हा आठवला तुम्ही ट्रिगर झालात ती आठवा.
 • Sense it – ती गोष्ट आठवली की तुमच्या भावना कशा बदलतात ते बघा.
 • Name it – भावनांना नाव द्या. राग येतोय की उदास वाटत आहे, तिरस्कार आहे हे समजून घ्या.
 • Love it – ज्या गोष्टी अनुभवल्या किंवा ज्या भावना समोर आल्या त्यांना स्वीकारा.
 • Feel and experience it – येणारे अनुभव आपलेच आहेत त्यांना रोखू नका, त्यांना शरीरात आणि मनात संचार करू द्या, रडू आले तर रडा, कुणाला मारावे वाटत असेल तर हवेत मारा हा अनुभव घ्या.
 • Receive its message and wisdom – आताचे अनुभव तुम्हाला भूतकाळातील एखाद्या किंवा अनेक ट्रॉमा सोबत कनेक्ट करतील, आता डोक शांत करून त्यातील संदेश समजून घ्या, त्याचे नोट्स काढा, तुमच्या भावना तुमच्याशी बोलतील ते नीट एका.
 • Share it – तुम्हाला आलेला अनुभव जवळच्या व्यक्तीशी शेअर करा, ते आवडत नसल्यास लिहायला सुरुवात करा, पहिला आघात झाला तेव्हा नेमके काय आणि कसे वाटले होते ते लिहा. मन मोकळे करून टाका.
 • Let it go – मग तुम्ही जे लिहिलं आहे ते सरळ जाळून टाका, त्या ट्रॉमा ची आठवण दूर करा, असे करताना शरीरातून एक नकारात्मक ऊर्जा बाहेर जातानाचा अनुभव होईल.

वरील 9 पायऱ्या खूप सहज आणि सोप्या आहेत पण तितक्याच प्रभावी आहेत, आपण ट्रॉमा वर जी शक्ती रोज खर्च करतो ती एकदाच करून जर त्यातून आपल्याला मुक्ती मिळणार असेल तर त्याहून चांगले अजून काय असेल ? जर तुम्हाला हे स्वतः करणे कठीण जात आहे तर नक्कीच तज्ञांच्या सल्ला घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*