संवाद साधताना आपण आपली भाषा, शब्द आणि आवाज यांकडे विशेष लक्ष देत असतो पण त्याच सोबत आपली Body language देखील तितकीच महत्वाची असते, दुर्भाग्याने body language बद्दल आपल्याला कधीच शिकवले जात नाही आणि आपणही त्यावर जास्त विचार करत नाही. आजच्या लेखात Body language म्हणजेच non verbal communication यावर थोडी माहिती आपण घेऊ.
Body language समजून घेताना पुढील घटकांना लक्षात घेणे खूपच आवश्यक असते.
✳️ Space समजून घेणे – आपण सर्वजण आपल्या भोवती एक वलय निर्माण करून असतो ज्यात आपण लोकांना आपल्या मर्जीने प्रवेश देत असतो यालाच आपण पर्सनल स्पेस म्हणतो. आपली आणि समोरच्या व्यक्तीची स्पेस समजून घेतली की मग संवाद साधताना दोघांना सहजपणा जाणवतो.
✳️ एकटक बघणे – Eye कॉन्टॅक्ट ठेवणे हे संवादासाठी महत्वाचे असले तरीही आपण एकटक समोरच्याच्या डोळ्यात पहात असलो तर त्यांना त्यातून नकारात्मक संदेश देखील मिळू शकतात. त्यामुळे सहजतेने पाहणे केव्हाही उत्तम.
✳️ अयोग्य ठिकाणी बघणे – अनेकदा संवाद साधताना आपण इतरत्र पाहत असतो किंवा मान खाली घालून हाताची हालचाल करत असतो किंवा समोरच्याच्या चेहऱ्याकडे न पाहता अन्य ठिकाणी लक्ष देत असतो. या सर्व गोष्टींमुळे देखील आपण समोरच्याच्या बोलण्यात interested नाही असे नकारात्मक संदेश जातात. त्यामुळे बोलणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलणे / त्याकडे पाहणे कधीही उत्तम.
✳️ हावभाव – प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असणारे हावभाव हे वेगळे असतात, काही लोकांचा चेहरा हा खूपच उदास असतो तर काहींच्या चेहऱ्यावर सतत स्मितहास्य असते, काही लोक हे रागीट वाटत असतात. संवाद सुरू असताना त्यानुसार एक्स्प्रेशन न दिल्याने अनेकदा समोरचा नीट ऐकत नाहीये किंवा त्याला घेणे देणे नाही असा भ्रम होऊ शकतो त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर योग्य भाव असणे महत्वाचे ठरते.
✳️ अनावश्यक हालचाली – संवाद साधताना सतत हातपाय हलवणे, मोबाईल वापरणे किंवा कोणत्याही वस्तू सोबत खेळणे अशा अनावश्यक हालचाली केल्याने आपण नर्व्हस आहोत असा समज होऊ शकतो, त्याच बरोबर अश्या हालचालींमुळे समोरची व्यक्ती देखील गैरसमज करून घेऊ शकते आणि संवादाचे रूपांतर वादात होऊ शकते.
✳️ स्पर्श टाळणे – अनोळखी किंवा औपचारिक संवाद सुरू असताना टाळी देणे किंवा सतत स्पर्श करणे असे प्रकार टाळणे योग्य असते, त्यातून अनेकदा चुकीचे अर्थ निघू शकतात त्यामुळे हात नियंत्रणात ठेवणे केव्हाही उत्तम.
आपली Body language सुधारण्यासाठी सर्वोत्तम उपाय
✳️ स्वतःला observe करा – आपण कुठे कसे वागतो हे पाहून आपल्या चुका शोधून काढा आणि त्यांवर काम सुरू करा.
✳️ दुसऱ्यांना observe करा – समोरच्या व्यक्ती मधील कोणती गोष्ट आपल्याला चूक किंवा बरोबर वाटली ते पहा आणि त्यानुसार स्वतःला सूचना द्या.
✳️ आपले वागणे त्रयस्थ म्हणून पहा आणि स्वतःच्या विकासावर लक्ष द्या.



