आपले जीवन आपण खूपच गुंतागुंतीचे करून ठेवलेले असते, रोज आपण शारीरिक, मानसिक, भौतिक, सामाजिक समस्यांना सामोरे जात असतो. कोणताही निर्णय घेताना वैचारिक स्पष्टता खूपच महत्वाची असते, पण ती मिळवणे अनेकांसाठी कठीण जाते. पण मुळात स्पष्टता म्हणजे काय ?, ती कशी मिळवावी ? आणि ती खरंच आवश्यक आहे का ? यावर माझे मत या लेखात मी मांडत आहे.
अनेकदा सांगितल्या प्रमाणे जीवन जगण्यासाठी माणसाला प्रेरणा (मोटिवेशन) ची आवश्यकता असते आणि ही प्रेरणा आपल्याला काय हवे आहे हे समजून घेतले की मिळते. काय आणि कधी हवे आहे हे स्पष्ट असणे खूपच महत्वाचे आहे.
स्पष्टता म्हणजे आपल्याला काय हवे आहे, कधी हवे आहे आणि आपण ते कसे मिळवणार याचा सांगोपांग विचार. आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टी बदलणार आहेत आणि आपण कुठे फोकस करायला हवा हे देखील आपल्याला स्पष्ट होणे अत्यावश्यक असते.
निर्णय घेताना स्पष्टता असणे आवश्यक असले तरी सर्वांना ते जमत नाही, निर्णायक परिस्थिती मध्ये बहुतांश लोक panic होतात, त्यांचे श्वसन वेगाने होऊ लागते, हृदयाचे ठोके वाढू लागतात. उगाच चिडचिड होऊ लागते. त्यांचा स्वभाव अगदी बदलून जातो आपण काय बोलतो यावर ताबा राहत नाही. यामुळे ते निर्णय घेणे टाळतात किंवा वैचारिक स्पष्टता नसताना घाई मध्ये किंवा दुसऱ्यांच्या प्रभावात येऊन निर्णय घेतात आणि नंतर समस्यांच्या सामना करतात.
निर्णय घेताना स्पष्टता नसेल तर आपल्याला पुढील समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
✳️ Procrastination – कोणतेही काम / निर्णय पुढे ढकलणे.
✳️ चुकीचे निर्णय घेणे आणि नंतर स्वतःला दोषी समजणे.
✳️ आपण काहीच deserve करत नाही असा समज विकसित करणे.
✳️ भीती आणि चिंता करणे.
✳️ आपल्याला कुणीच समजून घेत नाही असा भ्रम विकसित होणे.
✳️ लोकांच्या बोलण्याला खूपच seriously घेणे आणि निर्णय घेताना स्वतःला डावलून दुसऱ्यांसाठी एखादी गोष्ट करणे.
✳️ Self esteem कमकुवत करून घेणे.
आपल्यापैकी अनेक जणांनी कधी ना कधी वरील परिस्थितीचा सामना केला असेल, अश्या वेळी परिस्थितीचा सामना कसा करावा आणि योग्य ती स्पष्टता कशी मिळवावी या साठी मी अमलात आणलेले काही खात्रीशीर पर्याय मी तुमच्या समोर मांडत आहे. आशा करतो की तुम्हाला मदत होईल.
❤️ कोणताही निर्णय घेताना घाई करू नका पण स्पष्टता नाही म्हणून उगाचच तो लांबणीवर टाकणे टाळा, स्पष्टता मिळवण्यासाठी विचार करणे सुरू करा म्हणजे निर्णय घेताना तुम्हाला काय हवे आहे हे सहज कळेल.
वैचारिक स्पष्टता मिळवण्याच्या 7 पायऱ्या
✳️ श्वसन
कदाचित हे वाचताना तुम्हाला खूपच बालिश वाटेल पण निर्णय घेताना जेव्हा आपण panic होतो तेव्हा दीर्घ श्वसन केल्याने स्ट्रेस हार्मोन चे प्रमाण कमी होते आणि आपल्याला वाटणारी चिंता देखील कमी होऊ लागते. त्यामुळे किमान मिनिटभर दीर्घ श्वसन करावे.
✳️ आपले long term व्हिजन लक्षात घ्या
जेव्हा आपल्याकडे 2 पर्याय उपलब्ध असतात तेव्हा कोणता पर्याय आपल्याला जीवन उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी पूरक आहे हे पाहणे गरजेचे असते. तुम्हाला लाँग टर्म व्हिजन माहीत नसेल किंवा ते ठरवताना अडचण येत असेल तर एकदा शांत बसा आणि तुम्ही स्वतःला कुठे इमॅजिन करता हे पहा, तुमचे गुण आणि कौशल्ये यांच्यानुसार तुमचे व्हिजन ठरवा. एका व्हिजन ठरले की मग निर्णयात आपोआप स्पष्टता येत जाते.
✳️ ऐकावे जनाचे करावे मनाचे
आपल्या अडचणी किंवा समस्या प्रिय व्यक्ती किंवा मित्रांसोबत शेअर करणे चुकीचे नाही पण त्यांचा सल्ला हा कधीही निर्णय म्हणून स्वीकारू नये. दोन मित्र कधीही सारखा सल्ला देत नाहीत त्यामुळे आपले कन्फ्युजन वाढते आणि उलट निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. मित्रांना समस्या सांगून मन मोकळे करा. पण शेवटी आपल्याला पटेल आणि रुचेल तेच करा म्हणजे नंतर regret करायची वेळ येत नाही.
✳️ Intution वर विश्वास ठेवा
आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे असतात. आपला आतला आवाज किंवा अंतर्मन आपल्याला काही न काही सांगत असतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा स्पष्टता हवी असेल तेव्हा शांत बसून एकदा मन केंद्रित करा आणि जे intution येतात त्यावर विश्वास ठेवा.
✳️ फायदे तोटे यांची यादी काढा
प्रत्येक पर्याय किंवा संभाव्य शक्यतेचे फायदे आणि तोटे यांची यादी काढा, दोघांमध्ये किती तफावत आहे ते समजून घ्या आणि त्यात सर्वात जास्त फायदे असणारा आणि कमी तोटे असणारा पर्याय निवडा म्हणजे त्यातून मानसिक आणि शारीरिक त्रास होणार नाही.
✳️ कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है !
आयुष्य खूपच Uncertain असते, आपण जसे ते प्लॅन करतो तसेच ते चालेल याची शाश्वती अजिबात नसते, त्यामुळे जे काही पदरी पडत आहे ते स्वीकारावे लागते. अनेकदा तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जाताना तुमचा comfort zone सोडावा लागेल काही लोक ज्यांच्याशी आपण attach आहोत पण आपल्या प्रगतीच्या आड ते येत आहेत किंवा ते आपला वापर करत आहेत असे सोडून द्यावे लागतील अश्यावेळी ते निर्णय घेताना आपले मस्त स्पष्ट मांडा आणि पुढे जा.
✳️ अंतिम निर्णय घेताना नेहमी तटस्थ रहा.
निर्णय घेताना आपण positive असलो तर अती प्रमाणत सकारात्मक विचाराने संभाव्य धोके किंवा तोटे आपण इग्नोर करतो, आणि negative असलो तर त्या नकारात्मक विचाराने आपण संभाव्य फायदे इग्नोर करतो त्यामुळे तटस्थ असणे आवश्यक असते. कधीकधी आपण एखादा मार्ग सोपा आहे म्हणून स्वीकारतो पण त्यातून आपण आपलेच नुकसान करत असतो. त्यामुळे तटस्थ राहून स्वतःसाठी सोपे मार्ग न निवडता जे चांगले आहे ते निवडणे फायद्याचे ठरते.
हे मार्ग फॉलो करताना मी एक छोटीशी ट्रिक करतो, मी 2 पर्याय निवडायचे असतात तेव्हा एक नाणे घेतो आणि छापा काटा यांवर दोन्ही पर्याय ठेवतो. नाणे फेक करताना मी मला मनापासून हवा असलेले पर्याय यावा अशी प्रार्थना करतो. शेवटी मला हवा असलेला पर्याय आला तर मी खुश होतो किंवा पुन्हा नाणे फेक करतो.



