सकारात्मक सेल्फ टॉक

Table of Contents

कधीकधी आपला आतला आवाज आपल्याला सतत नकारात्मक गोष्टी सांगत असतो, एखादे काम करताना ते आपल्याला जमणार नाही, काही वाईट झाले की आपणच याला जबाबदार आहोत असे विचार मनात सतत येत असतात. अशा नकारात्मक विचारांचा सामना कसा करावा हे आपल्याला सुचत नाही, आजच्या लेखात याच समस्येवर उपाय सुचवले आहेत.

आपण आपल्याबद्दल काय विचार करतो यावरून आपली सेल्फ इमेज ठरत असते, फक्त एक नकारात्मक विचार देखील आपला पूर्ण दिवस खराब करू शकतो. आपल्याला वाटत की विचार आलेच नाहीत तर बरं होईल पण विचार हे सतत सुरूच असतात अशा वेळी नकारात्मक विचारांना थांबवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे सेल्फ टॉक ( स्वतःशी केलेले संभाषण)

स्वतःबद्दल नकारात्मक विचार येताच सावध व्हा !

एकदा माझा मित्र आणि मी एका विषयावर बोलत होतो, तो उगाच स्वतःला नावे ठेवत होता, मी त्याला म्हणालो ” माझ्या मित्रा संदर्भात असे बोलू नकोस”. आणि दोन मिनिट तो गप्प झाला. विचार करा की जेव्हा आपले मन आपल्याला नकारात्मक संकेत देत असेल तेव्हा आपण त्याला वरील वाक्य ऐकवले तर ? निश्चितच नकारात्मक विचार कमी होऊ लागतील. एक वाक्य कायम लक्षात ठेवा – Don’t be too hard on your self.

दीर्घ श्वसन

मागील एका लेखात दीर्घ श्वसनाचे आपल्या मानसिक आरोग्यावर होणारे फायदे मी लिहिले आहेत, जेव्हा नकारात्मक विचार आपल्याला त्रास देऊ लागतील तेव्हा एक छोटा ब्रेक घ्यावा आणि 4 ते 5 मिनिट दीर्घ श्वसन करावे, आपले पूर्ण लक्ष हे श्र्वासाच्या गती कडे असायला हवे. यामुळे नकारात्मक विचारांकडे लक्ष जात नाही आणि शरीरात तयार झालेले स्ट्रेस हार्मोन देखील कंट्रोल होण्यास मदत होतें

कृतज्ञता व्यक्त करा

मी अनेकदा माझ्या लाईव्ह कार्यक्रमात little win या संकल्पनेबाबत सांगत असतो, आपल्या सोबत रोज अनेक छोट्या छोट्या गोष्टी होत असतात ज्यामुळे नकळत आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटत असते. अश्या छोट्या छोट्या गोष्टींप्रती देखील कृतज्ञता व्यक्त करा. इतकेच नव्हे तर आपण आता पर्यंत मिळवलेले यश, आपला पगार, राहणीमान यांचा देखील आदर करा, ज्यांच्याकडे नोकरी नाही, राहायला घर नाही अश्यांपेक्षा आपले जीवन चांगले आहे हे मनाला सांगा आणि आपण मेहनत केली म्हणून हे मिळाले यासाठी कृतज्ञ रहा. यामुळे आपण मेहनत करून यशस्वी होऊ शकतो असे मनाला पटायला लागते.

आपला फोकस बदला

आपल्या आयुष्यात काय चांगले सुरू आहे याबद्दल कृतज्ञ राहणे हे देखील फोकस बदलण्याचे एक माध्यम आहे, असेच अनेक मार्ग आपण अवलंबू शकतो जसे आपला छंद जोपासणे, पाळीव प्राणी / पक्षी यांना वेळ देणे, सायकलिंग करणे, जिम/ योगासने करणे किंवा कोणतीही क्रिया ज्याने आपल्याला प्रसन्न वाटेल. एकदा मन प्रसन्न राहू लागले की आपण सकारात्मक विचारांकडे ओढले जातो.

Self love and appreciation

प्रेम आणि करुणा हे मानवी स्वभावाचे उत्तम गुण आहेत, अनेकदा आपण जगाला प्रेम आणि करुणेच्या नजरेतून पाहतो पण स्वतःबद्दल फारच कठोर होऊन जातो. Self image सुधारण्यासाठी आपण स्वतःवर प्रेम करणे फारच गरजेचे आहे. आपल्यात असलेल्या गुणांची कदर करणे आणि स्वतःच्या छोट्या छोट्या सक्सेस सेलिब्रेट करणे फारच गरजेचे आहे. त्यामुळे आपण स्वतच्या चांगल्या गुणांकडे फोकस करू लागतो.

सेल्फ लव्ह म्हणजे स्वतच्या व्यक्तिमत्त्वात असलेले दोष/ नकारात्मक गुण जसे इर्षा/ द्वेष यांना स्वीकारणे नव्हे, तर आपण जन्मजात घेऊन आलेले फिचर्स/ आपला रंग/ शारीरिक व्यंग यांना कमी न लेखणे असा आहे. जर तुम्ही फक्त जंक फूड खाऊन जाड झाले असाल आणि तुम्ही I love my body म्हणत असाल तर ते चूक आहे, पण जर काही व्याधी मुळे तुमची तब्येत वाढली असेल आणि त्यावर उपचार घेऊन देखील ती कमी होत नसेल तरच स्वतःला आहे तसे स्वीकारण्यास self लव्ह म्हणता येईल.

भावना समजून घ्या

कधी कधी आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा आपली प्रिय व्यक्ती आपल्याला फसवते, ज्यांच्यावर विश्वास असतो ते विश्वासघात करतात अश्या वेळी येणाऱ्या भावना जसे दुःख, भीती यांना देखील भावना म्हणून किंमत द्यायला शिका, यांना व्यक्त होऊ द्या, रडू येत असेल तर रडा, मनातील भावना लिहून ठेवा. उगाच सर्व काही सहन करण्याची गरज नसते. भावना समजून घेतल्यास त्या आपल्याला अनुभव रुपी ज्ञान देतात पण याउलट जर आपण यांना इग्नोर केले तर त्या मनात खोलवर प्रभाव पाडतात आणि त्यातून मग राग, द्वेष अशा भावना तयार होतात. मलाच असे अनुभव का? मी काय वाईट केले आहे ? माझ्याच सोबत असे का होते ? असे प्रश्न तयार होतात आणि मग आपण स्वतःला दोष देऊ लागतो म्हणून भावनांना दुर्लक्षित ठेऊ नये.

स्टोरी टेलिंग ची पद्धत बदला

आपली नोकरी चांगली नाही, आपण चांगले दिसत नाही, आपली लाईफस्टाईल चांगली नाही असे आपले मन आपल्याला सांगत असते याचा अर्थ आपण आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्या मनाला सांगत असताना सतत तक्रारी केल्या आहेत, स्वतःबद्दल सतत शोक व्यक्त केला आहे, जर आपल्याला वाटते की मनाने आपल्याला सकारात्मक विचार द्यावे तर आपण स्वतःला परिस्थिती समजावून सांगताना ती आहे तशी सांगायला हवी, त्यात कुठेही शोक/ अनावश्यक फुगवटा असू नये.

आपली परिस्थिती वाईट आहे असे आपण सतत बोलू लागतो तर मग आपण helpless फील करू लागतो आणि त्यामुळे त्या परिस्थिती सोबत सामना करण्याची आपली शक्ती कमी होते, उलट परिस्थिती चे सखोल निरीक्षण केले आणि तिला समजून घेतले तर त्यातून मार्ग निघण्याची शक्यता वाढीस लागते.

सगळ्यांच्या आयुष्यात वाईट गोष्टी होत असतात, काही लोक त्याचा अती विचार करतात तर काही लोक त्या गोष्टी सोडून आपल्यासोबत जे चांगले झाले त्याचा विचार करून खुश राहतात. शेवटी आपण आनंदी राहणार की दुःखी हे फक्त आपल्या विचारांवर आणि आपण स्वतःला कशी स्टोरी सांगतो यावर अवलंबून असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*