तुम्हाला आवडत असलेल्या व्यक्ती सोबत तुम्ही रिलेशन मध्ये आहात, तुमचा त्या व्यक्तीवर विश्वास आहे, तुम्ही एकमेकांच्या सवयी समजून घेतल्या आहेत, सर्व काही ठीक वाटत असले तरीही तुम्ही सतत स्वतःबद्दल किंवा पार्टनर बद्दल सतत साशंक (insecure) आहात. हे नाते किती दिवस टिकेल? पार्टनर आपल्यापासून काही लपवत तर नसेल ? पार्टनर माझ्यासाठी योग्य तर आहे ना ? तुम्ही हे नाते सांभाळायला समर्थ आहात की नाही, असे अनेक प्रश्न तुम्हाला सतावत असतील तर तुम्ही relationship anxiety चा शिकार झाला आहात असे समजावे.
मुळात relationship anxiety ही फार कॉमन आहे, नात्याच्या सुरुवातीच्या काळात आपल्या पार्टनर बद्दल जास्त माहिती नसताना हीचे प्रमाण जास्त असते, हळूहळू विश्वास बसू लागला की ती कमी होत जाते पण काही लोकांमध्ये लाँग टर्म रिलेशन मध्ये देखील relationship anxiety आढळून येते.
Relationship anxiety मुळे भावनिक असमतोल, चिडचिडेपणा, थकवा, निरुत्साही जीवनशैली असे अनेक मानसिक आणि पोटदुखी, पित्त असे शारीरिक आजार देखील जाणवू शकतात. relationship anxiety चे कारण अनेकदा पार्टनर चे वागणे किंवा परिस्थिती नसू शकते पण या anxiety मुळे रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम नक्कीच निर्माण होऊ शकतात.
Relationship anxiety ची लक्षणे
नात्याच्या सुरुवातीच्या काळात ही anxiety असणे अतिशय स्वाभाविक आहे पण ही anxiety जर कमी होत नसेल किंवा commited relation मध्ये पण जाणवत असेल आणि त्यामुळे नात्यात अडचणी येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
- आपल्या पार्टनर च्या फिलिंग वर डाऊट घेणे. – तुमचा पार्टनर तुम्हाला जास्त attention / वेळ देत नाही, दिवसभर मेसेज करत नाही म्हणजे त्याचे प्रेम कमी झाले आहे असे अर्थ काढून त्यांवर डाऊट घेणे.
- तुम्ही तुमच्या पार्टनर साठी महत्वाचे आहात की नाही असे सतत वाटणे -तुम्ही एकटेच सर्व काही करत आहात किंवा उद्या कठीण वेळ आली तर तुमचा पार्टनर सोबत असणार नाही अशी भीती असणे.
- आपले पुढे पटेल की नाही हा विचार करणे. – आपण नात्यात खरच खुश आहोत की नाही असा विचार येणे आणि मग आपल्यात काय फरक आहेत हा विचार करून भविष्यात आपले पटेल की नाही असा विचार करणे.
- पार्टनर च्या बोलण्याचा आणि वागण्याचा अती विचार करणे. – पार्टनर चे वागणे आणि बोलणे यांचा अती प्रमाणत विचार करून त्यांचे चुकीचे अर्थ लावणे. त्यातून गैरसमज करून घेणे.
- पार्टनर ब्रेक अप करणार आहे अशी भीती. – आपल्याला मिळत असलेले प्रेम केव्हाही कमी होईल आणि पार्टनर आपल्याला सोडून जाईल अशी भीती आपल्याला वाटू लागणे, मग पार्टनर ला काय आवडेल हा विचार स्वतःच करून तसे वागणे किंवा त्यांच्या चुका इग्नोर करू लागणे.
- सर्व वेळ नकारात्मक विचारात घालवणे. – आपल्या आयुष्यातील बहुतांश वेळ हा फक्त नकारात्मक विचारात घालवणे आणि नात्यातील चांगल्या गोष्टी, छोट्या छोट्या moment यांचा आनंद न घेणे.
Relationship anxiety ची कारणे
Relationship anxiety साठी एक किंवा अनेक कारणे जबाबदार असू शकतात, त्यांचा शोध घेण्यासाठी संयम आणि कठोर आत्मपरीक्षण गरजेचे असते. अनेकदा वरवर पाहता याची कारणे सापडत नाहीत त्यासाठी भूतकाळ, आपले जुने अनुभव आणि विचार पद्धती यांचे परीक्षण करणे गरजेचे असते. Insecurity कुठून तयार झाली आहे याची मुळे सापडली की त्यावर मात करणे सोपे जाते.
आधीच्या नात्याच्या कडू आठवणी –
आधीच्या नात्यात जर फसवणूक झाली असेल तर नवीन व्यक्ती वर विश्वास ठेवणे कठीण जाते, आधी घडून गेलेल्या गोष्टी किंवा त्यांची आठवण करून देणारे प्रसंग जर पुन्हा समोर आले तर त्या मुळे जुन्या गोष्टी अठवणात आणि anxiety वाढते.
सेल्फ एस्टीम ची कमतरता
ज्यांची सेल्फ एस्टीम कमकुवत असते ते लोक आपल्या पार्टनर वर अनेकदा डाऊट घेतात, आपले ब्रेकअप होऊ शकते किंवा आपण नाते टिकवू शकत नाही असे त्यांना सतत वाटत असते.
आपली attachment स्टाईल
लहानपणी आपले पालक यांनी आपल्याला दिलेला वेळ आणि त्यांची वागण्याची पद्धत या वर आपली attachment स्टाईल अवलंबून असते. ज्यांच्या पालकांनी त्यांना जास्त वेळ दिला आहे, भावनिक आधार दिला आहे असे लोक secure attachment style निर्माण करतात पण ज्यांना घरी ऐकून घेणारे कुणीच नसते असे लोक insecure attachment style मुळे anxiety चा शिकार होतात, आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती सोडून जाऊ नये म्हणून ते कोणत्याही थराला जातात.
अती प्रश्न करण्याची सवय
आपण घेतलेल्या निर्णयावर सतत प्रश्न करणे आणि आत्मविश्वास कमी असणे किंवा पुढे काय होईल, कसे होईल असे सेल्फ डाऊट असलेले प्रश्न देखील anxiety चे प्रमाण वाढवतात.
Relationship anxiety वर मात कशी करावी
Relationship anxiety वर मात करणे शक्य आहे फक्त त्यासाठी परिश्रम आणि संयम यांची गरज असते. पुढे दिलेले मार्ग वापरून आपण anxiety चा सामना करू शकतो.
आपले अस्तित्व जोपासा.
एखाद्या नात्यात असताना आपण स्वतःला गमवायची आवश्यकता नसते, आपल्या आवडी निवडी आणि मते निर्धास्त होऊन मांडा, छोट्या गोष्टी देखील granted घेऊ नका आणि पार्टनर ला देखील granted घेऊन देऊ नका.
वास्तवात जगा
पुढे काय होईल ही भीती आपला वास्तव (present) देखील खराब करते, त्यामुळे आज काय सुरू आहे याकडे लक्ष द्या, छोट्या छोट्या गोष्टी आणि moments यांची नोंद ठेवा त्यांचा आस्वाद घ्या.
यामुळे नकारात्मक विचार दूर राहायला मदत होते, भविष्याची चिंता कमी व्हायला मदत होते.
Communication चांगले ठेवा.
Relationship anxiety अनेकदा बाहेरच्या नाही तर अंतर्गत कारणांमुळे येते.
कधीही संवाद साधताना निष्कर्ष काढण्यापेक्षा आपली मते मांडा. उदा. “तू हल्ली मला वेळ देत नाहीस.” ऐवजी “मला असे वाटते की हल्ली तू मला जास्त वेळ देत नाहीस” त्यामुळे तुम्ही conclusion न काढता चर्चा करत आहात असे समोरच्याला वाटते आणि गैरसमज होत नाहीत.
समोरच्याला वाईट वाटेल म्हणून आपल्या भावना व्यक्त करणे टाळू नका, योग्य शब्दात आणि योग्य वेळी सर्व सांगणे नेहमीच गरजेचे असते.
भीती मुळे चुकीची पावले टाकू नका.
फक्त तुम्हाला insecure वाटते म्हणून पार्टनर ला सतत “कुठे आहेस?”, “कधी येणार?” असे मेसेज करणे, पार्टनर बाहेर असताना पाठलाग करणे किंवा त्यांच्या मित्राकडून reconfirm करणे अशा घटना नाते खराब करू शकतात.
तज्ञांचा सल्ला घेणे.
आपल्या insecurity ची कारणे शोधताना जर अडचण येत असेल किंवा मार्ग सापडत नसेल तर आपण psychologist ची मदत घेऊ शकता, जे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील.



