Cluster A personality disorders यांच्या अंतर्गत येणारा तिसरा विक्षिप्त Personality डिसऑर्डर म्हणजे Schizotypal Personality Disorder (STPD), STPD असणारे व्यक्तींच्या वागण्याची पद्धत दुसऱ्यांना विचित्र वाटू शकते. STPD साधारणपणे schizophrenia spectrum मध्ये येणारा डिसऑर्डर आहे, हा डिसऑर्डर असलेल्या लोकांना शक्यतो मनोविकार जाणवत नाहीत.
Schizotypal Personality Disorder (STPD) ची लक्षणे –
✳️ विचार करायची विक्षिप्त पद्धत.
✳️ विचित्र वागणे.
✳️ असामान्य श्रद्धा.
✳️ जास्त लोकांमध्ये किंवा गर्दीत अस्वस्थ वाटणे.
✳️ भावनांचा अभाव किंवा चुकीच्या पद्घतीने भावना समजणे आणि त्यांवर react करणे.
✳️ अस्पष्ट किंवा भरकटलेले बोलणे.
✳️ मित्रांची कमतरता.
STPD असणारे लोक आयुष्य एकट्याने जगणे पसंत करतात, जर कुणाला समाजात किंवा लोकांमध्ये अस्वस्थ वाटत असेल तर त्यांना चांगली नाती निर्माण करता येत नाहीत. असे लोक अनेकदा स्वतःच्या अस्वस्थतेचा दोष इतरांवर टाकत असतात.
STPD असणाऱ्या लोकांना शक्यतो मनोविकार जाणवत नाहीत, Hallucinations ( मतीभ्रम) , delusions ( भ्रम) आणि वास्तवापासून दूर होणे ही मनोविकाराची मुख्य लक्षणे आहेत. मनोविकार नसले तरीही या डिसऑर्डर मध्ये लोक प्रत्येक गोष्टीचा आपल्या बुद्धीने अर्थ लावतात आणि त्यावर स्वतःचे वेगळे मत बनवतात.
STPD कुणाला होऊ शकतो ?
खालील पैकी कोणतीही लक्षणे परिवारातील लोकांमध्ये असतील तर व्यक्तीला STPD होण्याची शक्यता असते.
✳️Schizophrenia
✳️Schizotypal personality disorder
✳️अन्य personality disorder
त्याच बरोबर आजूबाजूचे वातावरण आणि भूतकाळातील काही घटना देखील यासाठी कारणीभूत ठरू शकतात. जसे
✳️ ट्रॉमा
✳️ स्ट्रेस
✳️ पालकांशी इमोशनल बाँड नसणे
✳️ शारीरिक / मानसिक किंवा लैंगिक हिंसा
✳️ प्रिय व्यक्तींकडून दुर्लक्ष केले जाणे
STPD चे निदान कसे केले जाते ?
STPD चे निदान शक्यतो 20 वर्षांवरील लोकांमध्ये होते. जर psychiatrists किंवा psychologists यांना संशय आला की व्यक्ती मध्ये लक्षणे दिसत आहेत तर ते आधी शारीरिक परीक्षण करायला सांगतात आणि मग काही प्रश्न विचारून याचे निदान करतात. उदा
✳️ लक्षणे कधी पासून दिसत आहेत ?
✳️ या लक्षणांमुळे दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होत आहे ?
✳️ गर्दीत किंवा सोशल gathering मध्ये भाग घेतल्यावर कसे वाटते ?
✳️ बालपण कसे होते ?
✳️ शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्य कसे होते ?
✳️ कधी आत्महत्येचा विचार आला होता का ?
त्याच बरोबर या वागणुकीवर घरच्यांची किंवा मित्रांची प्रतिक्रिया कशी होती. असे प्रश्न विचारून या डिसऑर्डर चे निदान करता येते.
STPD ची ट्रीटमेंट –
STPD साठी विशिष्ट गोळ्या किंवा औषधे उपलब्ध नाहीत, पण जर स्ट्रेस जास्त असेल त्यासाठी डॉक्टर काही औषधे देतात. थेरपी जास्त उपयुक्त असतात. Psychotherapy किंवा talk therapy चा वापर करून नाती कशी निर्माण करावी आणि सोशल interaction कसे वाढवावे हे शिकवता येते. CBT चा वापर करून समाज आणि आजूबाजूच्या परिस्थिती विषयी असलेले गैरसमज दूर करण्यात येतात. CBT सोबत फॅमिली थेरपी देखील उपयुक्त ठरते.
STPD एक chronic डिसऑर्डर आहे, यासाठी दीर्घ काळ थेरपी उपयुक्त असते. ट्रीटमेंट योग्य वेळेत सुरू केल्यास लवकर रिझल्ट मिळतात आणि या डिसऑर्डर ला नियंत्रित करता येते.



