कोरोना लॉकडाउन मुळे आपण सर्वजण मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य याबद्दल विचार करू लागलो, मानसिक स्वास्थ्य आणि स्ट्रेस या विषयावर होणारी चर्चा ही समाजाच्या दृष्टीने फारच सकारात्मक आहे. मानसिक स्वास्थ्य या विषयावर बोलताना किंवा ऐकताना आपण ट्रॉमा, स्ट्रेस, डिप्रेशन, anxiety, नर्सिस्म असे अनेक विषय ऐकतो पण याच सोबत अनेकदा Schizophrenia हा शब्द देखील कानी पडतो. याच आजाराविषयी काही रूढ गैरसमज आजच्या लेखात दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
एखाद्या व्यक्तीला Schizophrenia (स्किझोफ्रेनिया) आहे असे ऐकिवात आले की मग अनेक लोक घाबरून जातात, त्या व्यक्ती सोबत कॉन्टॅक्ट कमी करतात. ती व्यक्ती जणूकाही परग्रहवासी असा समज करून बसतात. पण स्किझोफ्रेनिया असलेले लोक हे देखील सर्वांसारखे प्रेम आणि आपुलकीची वागणूक deserve करतात, त्यांना आपण प्रेम, सहानुभूती आणि सहकार्य दाखवायला हवे म्हणजे ते देखील आपल्याशी चांगले नाते निर्माण करतील.
स्किझोफ्रेनिया म्हणजे काय ?
जगातील साधारण 1% लोक हे स्किझोफ्रेनिया चा शिकार होतात, मुळात हा आजार आपल्या विचारसरणीशी आधारित असून यात व्यक्तीला वेगवेगळे भास होणे, सतत वेगवेगळे विचार येणे, गैरसमज करून घेणे, संशय बाळगणे आणि लोक आपल्याला इजा / दुःख पोहचवत आहेत असा समज करून घेणे असे वेगवेगळे लक्षण दिसून येतात. याच मुळे ते लवकर कुणासोबत मिक्स होत नाहीत किंवा विश्वास ठेवत नाहीत.
स्किझोफ्रेनिया बद्दल बरेच संशोधन झाले असूनही या बद्दल समाजात अनेक गैरसमज रूढ आहेत त्यामधील काही मोजक्या गैरसमजुती आज आपण दूर करणार आहोत.
✳️ स्किझोफ्रेनिया असलेले सर्वजण हे हिंसक असतात.
अनेक चित्रपट आणि वेबसेरीज मध्ये स्किझोफ्रेनिया चे रुग्ण हे हिंसक दाखवले आहेत त्यामुळे हा समज रूढ झाला आहे पण खऱ्या जीवनात स्किझोफ्रेनिया असलेले लोक हे अतिशय एकटे राहणारे असतात उलट तेच अनेकदा हिंसेचा शिकार होतात. रुग्ण अनेकदा स्वतःला इजा करून घेतात, साधारण 10% रुग्ण हे आत्महत्येचा देखील प्रयत्न करतात.
✳️ स्किझोफ्रेनिया हा पालकांच्या चुकीच्या संगोपनामुळे होतो.
आजारावर संशोधन सुरू असताना सुरुवातीच्या काळात अनेक तज्ञांचे मत होते की हा आजार चुकीच्या संगोपनामुळे होतो, एवढेच नव्हे तर यात आई ची चूक जास्त असते. आई ला जर स्किझोफ्रेनिया असेल तर मुलांना व्हायचे प्रमाण देखील जास्त असते. पण नंतर यावर अधिक संशोधन झाले तेव्हा समजले की हा पूर्णपणे मेंदू शी संबंधित आजार असून यात संगोपन हा एकमात्र निकष होऊ शकत नाही, viral इन्फेक्शन, मेंदू मधील केमिकल ची पातळी बदलणे, जेनेटिक असे अनेक घटक यासाठी कारणीभूत असू शकतात.
✳️ स्किझोफ्रेनिया आणि multiple personality / dissociative identity disorder एकच आहेत.
स्किझोफ्रेनिया या शब्दाचा उगम एका ग्रीक शब्दातून झाला असून त्याचा अर्थ स्प्लिट ( विभक्त) मन असा आहे. यातील स्प्लिट चा अर्थ अनेक लोक चुकीच्या पद्धतीने घेतात आणि त्याचा संबंध multiple personality / dissociative identity disorder यांशी लावतात. दोन्ही आजारात जरी भास होणे हे समान असले तरीही दोघांची अन्य लक्षणे वेगळी आहेत, multiple personality / dissociative identity disorder चे प्रमाण स्किझोफ्रेनिया पेक्षा कमी आहे.
✳️ स्किझोफ्रेनिया झालेली व्यक्ती कधीच बरी होऊ शकत नाही.
जेव्हा स्किझोफ्रेनिया चे मूळ माहीत नव्हते तेव्हा यावर इफेक्टिव औषधे उपलब्ध नव्हती पण आता advanve औषधे आणि थेरपी यांचा योग्य वापर करून लक्षणे आणि दुष्परिणाम नियंत्रित करता येऊ शकतात. आपण जर आपल्याला स्किझोफ्रेनिया आहे हे स्वीकारून त्यावर योग्य उपचार घेतले तर तो लवकरच आटोक्यात येऊ शकतो.
स्किझोफ्रेनिया असलेल्या व्यक्ती साठी आणि त्याच्या परिवारासाठी रोज नवीन चॅलेंज असतात पण त्यांनी आशा सोडून चालणार नाही, मुळात हा आजार काय आहे हे समजून घेतले तर यावर मात करणे सहज शक्य होते.




2 thoughts on “स्किझोफ्रेनिया – समज आणि गैरसमज”
Pingback: Paranoid Personality Disorder (PPD) - Divya Abhivyakti
Pingback: Schizotypal Personality Disorder (STPD) - Abhivyakti