विक्षिप्त Personality Disorder असणाऱ्या लोकांची वागणूक ही सामान्य माणसांना असामान्य आणि विचित्र वाटणारी असते. या प्रकारचे विक्षिप्त Personality डिसऑर्डर हे cluster A personality disorders यांच्या अंतर्गत येतात.
Paranoid Personality Disorder (PPD) हा एक विक्षिप्त Personality Disorder आहे, पुढे संपूर्ण लेखात याचा उल्लेख PPD असा केला आहे.
PPD असणारे लोक हे सतत दुसऱ्यांवर संशय घेत असतात, त्याचा प्रभाव त्यांच्या daily लाईफ वर सुद्धा होत असतो. समोरच्या व्यक्तीच्या वागणुकीवर सतत संशय घेणे, ती व्यक्ती आपल्याला काही इजा पोहचवायचा हेतू बाळगून आहे असा यांचा समज असतो.
PPD असणाऱ्या लोकांची वागणूक साधारणपणे अशी असते
• दुसऱ्यांवर विश्वास ठेवायला इच्छुक नसणे.
• साध्या कॉमेंट किंवा वाक्याचा विपर्यास करणे / चुकीचा अर्थ लावणे.
• बदल्याची भावना बाळगणे.
• दुसऱ्यांवर सतत चिडणे, लोकांचा राग राग करणे.
2017 च्या एका रिपोर्ट नुसार जगात 1.25 ते 4 % लोकांमध्ये PPD चे symptoms आढळतात. यांची ट्रीटमेंट सुद्धा एक मोठे चॅलेंज असते कारण हे आपल्या थेरपिस्ट किंवा डॉक्टर वर पण विश्वास ठेवत नाहीत, त्यांना ही संशयाच्या नजरेने बघतात. जर तुम्हाला PPD असेल तर तुम्हाला यातून बाहेर यायला मदत करणाऱ्या प्रोफेशनल वर विश्वास ठेवणे कठीण जाणे स्वाभाविक आहे पण मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका.
PPD असणाऱ्या क्लाएंट ना ट्रीट करणे हे आमच्यासाठी मोठे चॅलेंज असते, सर्वात आधी त्या व्यक्तीच्या मनात विश्वास निर्माण करणे यात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. एकदा मैत्री आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले की मग यावर मात करणे सोपे होते.
PPD कशामुळे होतो ह्याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे, पण आजवर झालेल्या रिसर्च नुसार अनेक biological फॅक्टर आणि आजूबाजूचे वातावरण ही मुख्य कारणे असू शकतात.
ज्या परिवारात schizophrenia किंवा delusional disorder यांचा इतिहास किंवा ज्यांनी लहानपणी ट्रॉमा अनुभवला आहे त्यांना PPD होण्याची शक्यता जास्त असते.
याचसोबत खालील घटक सुद्धा कारणीभूत असू शकतात:
• कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबात लहानाचे मोठे होणे.
• घटस्फोट होणे.
• नवरा किंवा बायको चे अकाली निधन होणे.
• लग्न न करणे.
Paranoid Personality Disorder (PPD) चे symptoms
PPD असणाऱ्या लोकांना आपले वागणे विचित्र आहे असे कधी वाटतं नाही, त्यांच्यासाठी ती एक सामान्य गोष्ट असते, पण त्यांच्या जवळ असणाऱ्या लोकांना अश्या संशयी वागणुकीचा खूप त्रास होतो.
PPD असणारी व्यक्ती नेहमी विरोधी भूमिका घेणारी असते, हट्टीपणा हा गुण त्यांचा अंगी असतो. बरेचदा ते sarcastic वागतात जेणेकरून समोरच्याची भूमिका समजेल आणि यांचा संशय दूर होईल.
• समोरची व्यक्ती आपल्याला दुखावायचा/ इजा पोहचवायचा सुप्त हेतू बाळगून आहे असा समज असणे.
• दुसऱ्यांच्या निष्ठेवर अविश्वास दाखवणे.
• अन्य लोकांसोबत काम करतात अडचणी येणे.
• व्यंग/ criticism बद्दल खूपच सेन्सिटिव्ह असणे. सगळे वैयक्तिक पातळीवर घेऊन offend होणे.
• सतत वाद घालणे स्वतःचा बचाव करणारे विधान करणे.
• मित्र किंवा सामाजिक आयुष्य कमी असणे.
• रिलॅक्स करण्यात अडचणी येणे.
• बायकोवर किंवा प्रेयसी वर संशय घेणे.
बरेचदा Schizophrenia आणि borderline personality disorder (BPD) चे symptoms हे PPD शी मिळतेजुळते असल्याने निदान करताना बारीक लक्ष द्यावे लागते.
Paranoid Personality Disorder (PPD) चे निदान कसे केले जाते?
• पूर्ण केस हिस्टरी – मेडिकल हिस्टरी आणि symptoms समजून घेतले जातात.
• शारीरिक तपासण्या – शक्यतो रक्त तपासणी केली जाते कारण iron/ हिमोग्लोबिन ची कमतरता पण वरील काही symptoms दाखवू शकते.
• असेसमेंट – तज्ञ psychiatrist किंवा psychologist द्वारे असेसमेंट केली जाते. ते बालपण, शालेय जीवन, नाते संबंध, काम अश्या अनेक गोष्टींशी संबंधित प्रश्न विचारतात.
• वरील मार्गांनी मिळालेली उत्तरे परिपूर्ण न वाटल्यास मग काल्पनिक परिस्थिती मध्ये रिस्पॉन्स कसा असेल असे प्रश्न विचारून रिपोर्ट तयार केला जातो.
Paranoid Personality Disorder (PPD) ची ट्रीटमेंट.
PPD पूर्णपणे बरा होतो पण त्यासाठी PPD असणाऱ्या व्यक्तीचा विश्वास जिंकणे हे मोठे चॅलेंज असते.
ज्या व्यक्ती स्वतःहून ट्रीटमेंट घ्यायचे ठरवतात त्यासाठी टॉक थेरपी खूप परिणामकारक सिद्ध झाली आहे. या थेरपी मध्ये
• PPD चा सामना कसा करावा.
• सोशल interaction कसे वाढवावे.
• Paranoia म्हणजेच संशयी प्रवृत्ती कशी कमी करावी.
यावर चर्चा करून सल्ले दिले जातात.
जर PPD सोबत डिप्रेशन, स्ट्रेस आणि anxiety असे आजार असतील तर psychiatrist औषधे लिहून देतात. शक्यतो यांमध्ये अँटी डेप्रेसंट आणि मूड stable करणारे घटक असतात. अनेकदा टॉक थेरपी आणि औषधे असे दोन्ही सोबत दिल्याने रिझल्ट लवकर येतात.



