समस्त महिला वर्गाला जागतिक महिला दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा. आजचा लेखात आपण महिलांच्या प्रजनन प्रणालीचे मुख्य घटक असलेल्या Estrogen आणि progesterone या संप्रेरकांचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करू.
Estrogen आणि progesterone या संप्रेरकांची निर्मिती मासिक चक्रा दरम्यान अंडाशयात (ovaries) होत असते. ही संप्रेरके प्रजनन संस्थेशी निगडित अनेक शारीरिक घटना जसे मासिक पाळी, बीज धारणा (ovulation) आणि गर्भधारणा (pregnancy) यांसाठी कारणीभूत असतात. परंतु यांचा प्रभाव प्रजनन संस्थे पुरताच मर्यादित न राहता तो मूड, समज आणि मानसिक स्वास्थ्य यांवर देखील होत असतो.
मासिक चक्र
प्रजनन संस्थेतील सर्वात महत्त्वाची आणि जटिल अशी क्रिया म्हणजे मासिक चक्र, Progesterone आणि Estrogen यांचा संदर्भ समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून मासिक चक्र आपण पाहू. (इतर संप्रेरके मुद्दाम वगळली आहेत.)
- मासिक पाळी: 1 ते 5 दिवस यात Estrogen आणि progesterone ची पातळी कमी असते.
- Follicular टप्पा: 6 ते 13 दिवस येथे Estrogen चे प्रभुत्व जास्त असते, साधारण या काळात महिला वर्ग देखील प्रसन्न असतो.
- बीज धारणा: 14 दिवस येथे Estrogen कमी होऊन Progesterone चे प्रमाण वाढू लागते.
- Luteal टप्पा: 15 ते 28 दिवस Progesterone ची मात्रा वाढते आणि त्याचे प्रभुत्व देखील जाणवू लागते, शरीर आणि मन शांत असते एकूणच गर्भधारण प्रक्रिया व्यवस्थित व्हावी म्हणून हा बदल होतो.
Estrogen
Estrogen हे प्रामुख्याने एक स्त्री संप्रेरक म्हणून ओळखले जाते. महिलांच्या मानसिक आरोग्यात हे संप्रेरक खूप महत्त्वाचे आहे. या संप्रेरकाचा प्रभाव हा serotonin, dopamine आणि norepinephrine अश्या neurotransmitters वर जास्त प्रमाणात होतो. serotonin, dopamine आणि norepinephrine हे तिन्ही neurotransmitters आपला मूड नियंत्रण आणि भावनिक स्थैर्य प्रदान करण्याचे काम करत असतात. पूर्ण मासिक चक्र कालावधीत estrogen ची पातळी कमी जास्त होत असते. बीज धारणा (ovulation) दरम्यान estrogen चे प्रमाण वाढते तर मासिक पाळी वेळी ते कमी होते त्यामुळे मूड मध्ये बराच बदल पाहायला मिळतो.
अभ्यासानुसार रजोनिवृत्ती (menopause) किंवा तत्सम काही शारीरिक बदलांमुळे estrogen ची पातळी कमी होऊ लागते तेव्हा नैराश्य (depression), तणाव (stress), चिंता (anxiety), चिडचिड (irritability) यांची लक्षणे महिलांमध्ये दिसून येतात. यामुळेच रजोनिवृत्ती (menopause) काळात किंवा estrogen पातळी कमी असताना नैराश्य आणि चिंता कमी करण्यासाठी अनेकदा Estrogen थेरपी घेण्याचा सल्ला दिला जातो.
Progesterone
Progesterone या संप्रेरकाचा नैसर्गिक गुणधर्म हा शांत करणे आहे. Estrogen मुळे वाढलेली चंचलता मूड swings नियंत्रित करण्याचे पूरक काम Progesterone करत असते. मासिक चक्राच्या दुसर्या टप्प्यात गर्भधारण प्रकिया नीट व्हावी म्हणून Progesterone चे प्रमाण वाढते, ज्यामुळे मेंदू निवांत आणि शांत होतो. Progesterone मेंदूमधील Gamma-aminobutyic acid म्हणजेच GABA receptors सोबत प्रक्रिया करते, त्यामुळे GABA द्वारे सर्व काही शांत आणि निवांत असल्याची भावना विकसित होते.
मासिक पाळीपूर्व syndrome (pre menstrual syndrome PMS) किंवा तत्सम शारीरिक बदलांमुळे Progesterone ची मात्रा कमीजास्त झाल्यास देखील नैराश्य (depression), तणाव (stress), चिंता (anxiety), चिडचिड (irritability) यांची लक्षणे महिलांमध्ये दिसून येतात. जर हे Progesterone चे प्रमाण कमी झाल्यामुळे होत असेल तर याला Estrogen dominance असे म्हणतात.
मासिक चक्र आणि मूड
मासिक चक्र सुरु असताना Estrogen आणि progesterone यांच्या कमीजास्त होणार्या पातळीचा परिणाम महिलांच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. अनेक महिलांना मासिक पाळीपूर्व लक्षणे (pre menstrual symptoms) जसे की मूड मध्ये बदल, चिडचिड, चिंता जाणवू लागतात.
रजोनिवृत्ती (menopause) आधी साधारण 2 ते 10 वर्षे perimenopause अवस्थेत असताना जेव्हा हळू हळू महिलांच्या अंडाशयाची क्षमता कमी होऊ लागते तेव्हा देखील Progesterone आणि Estrogen ची पातळी कमीजास्त होत असते. याच बदलामुळे या काळात महिलांना झोपेचे विकार, मूड संबंधित मानसिक आजार आणि नैराश्य यांचा सामना करावा लागु शकतो.
एकुणच मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे म्हणून Estrogen आणि progesterone ची पातळी योग्य असणे गरजेचे असते. पुढील पर्यायांचे अवलंब केल्यास संप्रेरकांचा समतोल राखणे सोपे होईल.
- योग्य आहार: भाज्या, फळे आणि omega – 3 fatty acid यांचा समावेश पुर्ण आहारात करावा.
- तणावाचे योग्य नियोजन करावे.
- शरीरिक व्यायाम आणि प्राणायाम नियमित करावे.
- Alcohol आणि caffaim यांचे प्रमाण कमी करावे.
- 7 ते 9 तासांची छान झोप घेण्याचा प्रयत्न करा.
- वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा.
समस्त महिला वर्गाने आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा.



