Eating disorders

Table of Contents

Eating disorder ही एक मानसिक परिस्थिती आहे ज्यामुळे व्यक्ती मध्ये आरोग्याला अपायकारक अशा खाण्यापिण्याच्या सवयी तयार होतात. Eating disorders ची लक्षणे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारची असतात. खाण्याच्या पॅटर्न प्रमाणे याचे वर्गीकरण केले जाते. anorexia nervosa (voluntary starvation), bulimia nervosa (binge-eating followed by purging), binge-eating disorder (binge-eating without purging), आणि unspecified eating disorders ह्याबद्दल आपण आज माहिती घेऊ.

Eating disorders चे प्रमाण श्रीमंत वर्गात जास्त पाहायला मिळायचे पण गेल्या 5 वर्षात सर्वच वर्गात हा डिसऑर्डर पाहायला मिळतो. टीन age मधील मुली, 20 वर्षांवरील स्त्री आणि पुरुष यांच्यपाठोपाठ 40शी नंतरचे स्त्री पुरुष यांमध्ये Eating disorders चे प्रमाण अधिक आहे.

शारीरिक रचना, सामाजिक आणि interpersonal प्रेशर हे घटक Eating डिसऑर्डर साठी महत्वाचे आहेत. पूर्वापार चालत आलेले समज जसे बारीक असणे किंवा शेप मध्ये असणे म्हणजेच सुंदरता हा समज, परफेक्शनिस्ट स्वभाव आणि obsessiveness यामुळे eating डिसऑर्डर चे प्रमाण वाढत चालले आहे.

Anorexia

Anorexia nervosa हा eating disorder अती प्रमाणात वजन कमी करणे/ अती व्यायाम यांच्याशी निगडित आहे, शक्यतो युवा अवस्थेतील आणि मध्यम वयीन स्त्रियांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त आढळून येते.
आपण खूप जाड आहोत किंवा आकर्षक नाही असा समज आणि आपण परफेक्ट दिसावे म्हणून केले जाणारे अती डायटिंग, सल्ला न घेता केलेला अती व्यायाम, उपाशी राहणे अशा लक्षणांमुळे हा डिसऑर्डर सर्वात जास्त धोकादायक समजला जातो. बरेचदा डिप्रेशन मध्ये असणाऱ्या स्त्रिया याचा शिकार होतात, आपण दिसायला आकर्षक नाही म्हणून हळू हळू सोशल लाईफ एंजॉय करणे आणि सेल्फ इस्टीम सुद्धा कमी होते. उपाशी राहिल्याने शरीराला योग्य पोषण मिळत नाही आणि शारीरिक स्वास्थ्य सुद्धा खराब होते.
Anorexia असलेले व्यक्ती ट्रीटमेंट साठी लवकर तयार होत नाहीत, अनेकदा त्यांना anxiety आणि डिप्रेशन सुद्धा असते त्यामुळे त्यावर उपाय आधी करावे लागतात, CBT सोबत न्युट्रिशन बद्दल माहिती आणि योग्य डाएट असा थेरपी चा क्रम असतो.
जर ही सवय जास्त काळ दुर्लक्षित राहिली तर हॉस्पिटल मध्ये admit होऊन जबरदस्ती अन्न द्यायची वेळ देखील येऊ शकते ज्याचा परिणाम हा आई वडील किंवा पार्टनर वर होऊ शकतो ते ट्रॉमा अनुभवू शकतात.
पूर्वी हे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त होते पण हल्ली पुरुषांमध्ये सुद्धा लक्षणीय प्रमाणात वाढ झाली असून परफेक्ट दिसण्यासाठी पुरुष देखील स्वतःच्या आरोग्याशी खेळताना दिसून येतात.

Bulimia

Bulimia nervosa मध्ये व्यक्ती अती प्रमाणात काहीही आणि कसेही खाते आणि नंतर ते अन्न बाहेर काढते/ पचवण्यासाठी प्रयत्न करते, त्यासाठी उलटी करणे, चुकीची औषधे घेणे, जुलाब होण्यासाठी गोळ्या घेणे, उपवास करणे किंवा अती व्यायाम करणे असे चुकीचे मार्ग निवडतात.
हा डिसऑर्डर शक्यतो 10 ते 19 या वयात निर्माण होतो, याचे निदान करणे फार अवघड जाते कारण हे खाणे आणि बाहेर काढणे/ पचवणे व्यक्ती एकांतात करत असते आणि जाहीरपणे स्वीकारणे टाळते. Bulimia असणारे बहुसंख्य लोक हे overweight असतात, त्यांना वजन वाढायची भीती असते त्यामुळेच anxiety निर्माण होते, पुढे याचे रूपांतर डिप्रेशन मध्ये होऊ शकते.
सतत खाणे, वजन कमी जास्त होत राहणे, सतत टॉयलेट चा वापर करणे, सोशल इव्हेंट टाळणे आणि घरीच जास्त वेळ घालवणे हे Bulimia चे signs आहेत. यासाठी सुद्धा CBT, न्युट्रिशन बद्दल माहिती आणि योग्य डाएट असा थेरपी चा क्रम असतो.

Binge Eating Disorder

Binge Eating Disorder मध्ये अती प्रमाणत कसेही आणि काहीही खाते आणि ते पचवण्यासाठी काहीच मेहनत घेत नाही ज्यामुळे व्यक्तीचे वजन अनियंत्रित होते.
हा डिसऑर्डर असणारे लोक इतरांच्या तुलनेत पटापट आणि जास्त खातात आणि जोवर त्यांना पोट गच्च भरले आहे असे वाटत नाही तोवर ते थांबत नाहीत. भूक नसली तरी ते जास्त प्रमाणात खातात, शक्यतो एकटे खाणे पसंत करतात कारण त्यांना लोकांनी judge करायची भीती असते.
कधी कधी लोक काही विशिष्ट वेळी जास्त खातात त्याला आपण Binge Eating Disorder म्हणू शकत नाही, किमान 6 महिने ही लक्षणे असतील तरच त्याला Binge Eating Disorder समजले जाते.
या प्रकारात अती वजन वाढते, त्यामुळे व्यक्ती सामाजिक आयुष्य जगणे कमी करते.

Other Eating Disorders

वरील 3 डिसऑर्डर कॉमन आहेत, पण त्या व्यतिरिक्त avoidant/restrictive food intake disorder, rumination disorder, pica हे देखील डिसऑर्डर कमी जास्त प्रमाणात आढळून येतात.

Avoidant/restrictive food intake disorder मध्ये लोक विशिष्ट प्रकारच्या व्यांजनाबाबत उदासीन असतात, भूतकाळात आलेला एखादा वाईट अनुभव (एखादी dish खाऊन आजारी झाले असतील तर) किंवा त्या व्यंजनाचा आकार, रंग अशा गोष्टी मुळे लोक ठराविक व्यंजन टाळतात.

Rumination disorder मध्ये लोक रवंथ करतात. सेवन केलेले अन्न उलटी किंवा मळमळ न होता पुन्हा चघळणे/ चावणे अशी क्रिया करून मग ते पुन्हा गिळतात किंवा थुंकन टाकतात.

Pica मध्ये कोणत्याही प्रकारचे पोषण नसलेले खाण्यायोग्य नसलेले पदार्थ खाण्याची सवय असते, जसे कागद, साबण, केस इत्यादी.

त्याच सोबत night eating syndrome किंवा atypical anorexia हे सुद्धा Other Eating Disorders मध्ये येतात.

Eating डिसऑर्डर का होतात ?

Eating disorder साठी कोणतीही एक गोष्ट कारणीभूत नसते. अन्न आणि मानसिक आरोग्य यांचा बिघडलेला समतोल सर्व प्रकारच्या डिसऑर्डर चा पाया समजला जातो. कोणताही Eating disorders हा एक साधी सवय म्हणून सुरू होतो, कमी खाणे किंवा जास्त खाणे हे हळू हळू व्यक्तीच्या जीवनाचा भाग होऊन जाते आणि नंतर त्यावर कंट्रोल मिळवणे कठीण होते.

Biological factor- आपली पचनसंस्था ही खूप जटिल आहे, पोटातील आणि मेंदूतील अनेक रसायने आपली भूक आणि भुकेची तृप्ती यांस नियंत्रित करतात. त्यामुळे ह्या रसायनाचे प्रमाण देखील Eating disorders साठी कारणीभूत असू शकते. अनेकदा जनुकीय रचना देखील यासाठी कारणीभूत असते.

Culture – समाज आणि त्यांचे विचार यांचा पगडा आपल्यावर नेहमी असतो, आपली शरीर रचना योग्य की अयोग्य हे आपण समाजाच्या माध्यमातून ठरवत असतो. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी नाजूक असणे आणि shape मध्ये असणे याला समाजात अती महत्व आहे. त्यासाठी त्या चुकीचा डाएट फॉलो करतात आणि Anorexia चा शिकार होतात.

त्याच बरोबर स्ट्रेस, तुलना, सामाजिक जीवनात मिसळताना येणाऱ्या अडचणी, दिसण्यावरून केलेले criticism, एकटेपणा, डिप्रेशन, ट्रॉमा आणि डायटिंग हे फॅक्टर सुद्धा कारणीभूत असू शकतात.

Eating disorders साठी टॉक थेरपी – CBT चा वापर केला जातो त्याचसोबत न्युट्रिशन एक्स्पर्ट कडून देखील शरीराचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी डाएट आणि अन्य सल्ले घेतले जातात. ट्रीटमेंट साठी प्रचंड संयम लागतात. साधारण 50% लोक सहज recover होतात.

वरील पैकी कोणत्याही डिसऑर्डर चे निदान करताना त्याची लक्षणे किमान 6 महिने तरी पेशंट मध्ये असावी लागतात. अनेकदा Binge Eating हा प्रकार रिकामे असल्याने देखील होतो, उदा घरी बसले असताना काही काम नाही म्हणून चिप्स किंवा बिस्कीट खाणे. रात्र भर वेब सीरिज बघताना टाईम पास म्हणून पॉपकॉर्न किंवा चिप्स खाणे हे डिसऑर्डर नाहीत पण असे रोज झाले तर त्याचे रूपांतर Binge Eating डिसऑर्डर मध्ये होऊ शकते. कोणतीही अनियंत्रित सवय कधीही डिसऑर्डर चे रुप धारण करू शकते त्यामुळे ह्या गोष्टी नोटीस करणे फार गरजेचे आहे.

कुठेही काहीही confusion असल्यास डॉक्टर शी संपर्क साधावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*