आपल्या शरीरात अनेक संप्रेरके / हॉर्मोन्स त्यांचे काम नियमितपणे करत असतात, dopamine हे हार्मोन मानसिक दृष्ट्या खूप महत्वाचे आहे. आज आपण याच हार्मोन विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. आपला मेंदू हा neurons पासून बनलेला असून सर्व ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये ही नर्व्हस सिस्टीम ने जोडलेली आहेत. ह्या neurons मधून सर्व माहिती वाहून नेण्याचे काम केले जाते, dopamine हे हार्मोन एक neurotransmitter म्हणून काम करते. याचे योग्य प्रमाण आपल्या ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मेंदू यांच्यातील देवाणघेवाण सोपे करते.
Dopamine हार्मोन हे सेल्फ reward हार्मोन आहे ते आपला मूड, motivation आणि attention नियंत्रित करण्याचे काम करते. आवडीच्या पदार्थांच्या सेवनाने, शारीरिक संबंध प्रस्थपित केल्यावर किंवा आवडीच्या गोष्टी केल्यावर आपल्याला जे plesure किंवा satisfaction अनुभवायला मिळते ते याच हार्मोन मुळे मिळते.
Dopamine हार्मोन बद्दल एक छोटा प्रयोग आपण पाहू :
एका उंदराला डोक्यावर एक इलेक्ट्रिक device लावून त्याला एका पिंजऱ्यात ठेवण्यात आले, त्या पिंजऱ्यात एक लाल बटन होते, उंदराने फिरता फिरता त्याला स्पर्श केला आणि त्याला डोक्यावरील device मधून हलका करंट लागला त्यामुळे त्याच्या मेंदूतील reward झोन activate झाला, त्या प्लेजर साठी उंदीर काही वेळाच्या अंतराने पुन्हा पुन्हा त्याच बटनाच्या दिशेने जाऊ लागला. नंतर जेव्हा त्याचे परीक्षण केले तेव्हा जाणवले की प्रत्येक शॉक नंतर त्याची dopamine पातळी वाढलेली जाणवत होती.
मनुष्याच्या बाबतीतही असेच होते. कोणतीही गोष्ट ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो किंवा प्लेजर फील होते ती गोष्ट सारखी करायची इच्छा आपल्याला होते, कारण त्यामुळे dopamine लेव्हल वाढत जाते, कोणत्याही व्यसानाबद्दल सुद्धा हाच नियम लागू होतो, ज्यांची dopamine लेव्हल कमी असते ते सहज व्यसनाधीन होतात, कारण स्मोकींग किंवा drinking मधील निकोटिन / अल्कोहोल मुळे dopamine ची पातळी वाढते आणि मग मेंदू पुन्हा पुन्हा तो अनुभव यावा म्हणून प्रयत्न करत असतो.
Dopamine reward सिस्टीम/ सर्किट म्हणजे काय ?
या हार्मोन मुळे मेंदू मधील काही neurons activate होतात आणि एक सर्किट तयार होते, हे सर्किट एक तीव्र अनुभूती उत्पन्न करते, उदा. कोणतेही व्यसन केल्यावर high फील करणे. हे सर्किट त्या अनुभवाची एक प्लेजरेबल आठवण आपल्या मेमरी मध्ये सेव्ह करते आणि आपल्या मेंदूच्या पेशी अश्या पद्धतीने प्रोग्राम करते की त्या आपल्याला पुन्हा पुन्हा ही अनुभूती मिळावी म्हणून आदेश देतात.
Dopamine मुळे कोणतीही व्यक्ती उत्तेजीत होते, आपल्याला काय हवे आहे ?, ते कसे मिळवायचे ? त्यासाठी गोल सेट करणे, कृती करणे ही सर्व प्रक्रिया क्रमबद्ध होत जाते. थोडक्यात सांगायचे तर सतत मेंदूला reward मिळवायची सवय लागते म्हणून मेंदू त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करतो. सतत इंस्टाग्राम चेक करणे, फोटो ला किती react आले आहेत ते बघणे किंवा स्मोकींग अशी अनेक उदाहरणे या बेहेवियर ची आहेत.
स्वभावानुसार किंवा अन्य कारणांनी ज्यांची dopamine पातळी जास्त असते असे लोक सेंसेशन सीकर असतात, कोणत्याही स्ट्रेस असलेल्या परिस्थिती मध्ये गोंधळून न जाता ते त्या परिस्थितीला चॅलेंज म्हणून स्वीकारतात आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करतात. थोडक्यात ज्या व्यक्ती शुर असतात किंवा आलेल्या परिस्थिती ला धीराने सामोरे जातात त्यांची या रसायनाची पातळी जास्त असते असे आपण म्हणू शकतो.
2000 सालचा नोबेल पुरस्कार एक स्वीडिश फार्माकोलॉजिस्ट आणि न्युरोसायंटिस्ट अर्विड कार्लसन यांना Dopamine चा मेंदूच्या कार्यक्षमतेवर प्रभाव या त्यांच्या रिसर्च साठी मिळाला. त्यांच्या रिसर्च नुसार हे हार्मोन आपल्या जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असून मोटर activities जसे चालणे, बोलणे ( शारीरिक हालचाली) यांवर याचा खूप प्रभाव पडतो. जर शरीर हे हार्मोन योग्य मात्रेत बनवत नसेल तर पार्किन्सन हा आजार होऊ शकतो, आपल्यापैकी कुणाच्या परिचयात हा आजार असल्यास त्यांना dopamine ची मात्रा वाढवणारे औषध दिले जाते हे माहीत असेलच. Dopamine चा संबंध ADHD आणि schizophrenia यांच्याशी सुद्धा आहे, Dopamine ची निर्मिती आणि त्याचे कार्य हे व्यक्तीच्या dopamine receptor वर अवलंबून असते. हल्ली ADHD असणाऱ्या व्यक्तींना dopamine ची पातळी वाढवणारे औषध दिले जाते जेणेकरून ते एका विषयावर फोकस करू शकतील.
माझ्यामते dopamine मुळेच आपण human बनतो, लहान असताना आपला मेंदू विकसनशील अवस्थेत तेव्हा dopamine चे प्रमाण कमी असल्यास अनेक मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता असते. जेनेटिक आजार जसे थायरॉईड ( congenital hypothyroidism) याचा सुद्धा संबंध dopamine लेव्हलशी असतो. अल्झायमर, डिप्रेशन, सतत खाणे ( विचित्र प्रकारे), व्यसन किंवा जुगार हे सर्व dopamine कमतरतेमुळे होणारे विकार आहेत.
एकूणच Dopamine आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूपच महत्वाचे रसायन आहे, या रसायनाची पातळी ही आपले behaviour ठरवत असते. आपण एक रात्र जरी झोप कमी घेतली तरी लगेच dopamine ची पातळी कमी होते परंतु त्याची पातळी वाढण्यासाठी औषधे घेणे हा एकमेव मार्ग अजिबात नाही, रोजच्या जीवनात आपण जर खालील मार्ग व्यवस्थित अवलंबले तर याच्या कमतरतेमुळे होणारे अनेक आजार हे दूर राहतील.
• जेवणात प्रोटीन चे प्रमाण व्यवस्थित ठेवा, विशेषतः tyrosine असलेले अन्न जसे चीज, मासे, मांस, डेअरी प्रॉडक्ट्स, soy प्रॉडक्ट्स, सर्व प्रकारच्या डाळी, कड धान्ये इत्यादी. ( शक्यतो supplements किंवा fortified फूड न घेण्याचा सल्ला मी देतो)
• आपल्या अन्नात मॅग्नेशियम असलेले पदार्थ add करा, dry fruits, डाळी आणि dark चॉकलेट हे सहज उपलब्ध होणारे पदार्थ आहेत.
• प्रोसेस केलेले फूड कमी खा – हाई fat, साखर आणि कॅफैन चे प्रमाण जास्त असलेले पदार्थ हे हानिकारक आहेत.
• आपली झोप व्यवस्थित पूर्ण करा, दिवसातून किमान 4-6 तास पूर्ण झोप घ्या. ( Deep Sleep)
• रोज थोडा व्यायाम करा.
• स्ट्रेस कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम, visualization, श्वसनाचे व्यायाम न विसरता 10 मिनिट रोज करा.
• तुमचे छंद जोपासा ज्याने आनंदाची अनुभूती येईल.
• छोटे गोल सेट करा आणि छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करा.
• गावाकडे जर राहत असाल तर खाज कुइरी / Velvet beans चा समावेश आहारात करा. ( High cholesterol मध्ये पण सेवन चालते)
• संगीत dopamine ची पातळी नियंत्रित करण्यात खूप मदत करते, आज वर झालेले संशोधन सांगत की संगीतामुळे मेंदूच्या संरचनेत सकारात्मक बदल होतात आणि dopamine ची पातळी वाढते. या साठी आजवर instrumental संगीताचा अभ्यास केला गेला असून लिरिक्स चा प्रभाव होतो की नाही हे अजून संशोधनातून समोर आले नाही.
• दिवसातून एकदा सूर्यप्रकाशात जा, शक्यतो कोवळ्या उन्हात जाणे जास्त फायदेशीर आहे.
Dopamine चा संबंध हा spiritual प्रगती सोबत सुद्धा आहे, अध्यात्मिक प्रगती किंवा अनुभूती मध्ये आपण जी सर्वोच्च पातळी अनुभवतो ती सुद्धा याच रसायनाच्या reward सर्किट चा भाग असते. अध्यात्मिक प्रगती मध्ये आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा मेंदू मधील dopamine receptors हे activate होतात आणि केमिकल produce होते. सत्संग किंवा अध्यात्मिक सेशन नंतर काही व्यक्तींच्या मेंदूचे MRI करण्यात आले तर आधीच्या MRI तुलनेत dopamine आणि Serotonin चे प्रमाण वाढलेले जाणवले. ( 7 दिवसाचे तुलनात्मक परीक्षण)




2 thoughts on “Dopamine”
Pingback: Endorphins - Divya Abhivyakti
Pingback: Oxytocin - The Love Hormone - Divya Abhivyakti