Dissociative Identity Disorder (Multiple Personality Disorder)

Dissociative Identity Disorder (Multiple Personality Disorder)

Table of Contents

आपण सर्वांनी अपरिचित चित्रपट (मूळ तमिळ चित्रपट – Anniyan) नक्कीच पाहिला असेल, एक साधा वकील रामानुजन (अंबी) जो परिस्थितीनुसार अपरिचित आणि रेमो अशा दोन वेगळ्या व्यक्तिरेखा देखील जगत असतो, आणि त्याला अपरिचित किंवा रेमो यांनी बोललेले किंवा वागलेले काहीच आठवत नाही. ह्या मूळच्या तमिळ चित्रपटाने पहिल्यांदा Dissociative Identity Disorder हा मुद्दा इतक्या प्रभावीपणे आणि सहज रित्या सर्वांसमोर मांडला.

Dissociative Identity Disorder म्हणजेच Multiple Personality Disorder ह्या बद्दल या चित्रपटाच्या आधारे आपण माहिती घेऊ. Dissociative Identity Disorder चा उल्लेख लेखात DID असा केलेला आहे, DID चे वैशिष्ट्य म्हणजे एकाच व्यक्ती मध्ये दोन किंवा अधिक वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा अंतर्भाव. या डिसऑर्डर चा सामना करणारे अनेक लोक हे तीव्र गैरवर्तनाचा शिकार असतात. अंबी चे उदाहरण घेऊन सांगायचे तर आपली कर्तव्ये योग्य प्रकारे पूर्ण न करणाऱ्या लोकांमुळे त्यानी बालपणी सख्खी बहिण गमावली होती, त्यामुळे त्याला कर्तव्यात कोणतीही तडजोड मान्य नव्हती.

Dissociative Identity Disorder ही खूप दुर्मिळ अवस्था आहे, ज्यात एकाच व्यक्ती मध्ये दोन किंवा अधिक वेगळे स्वभाव किंवा व्यक्तिमत्व आढळतात आणि ते आळीपाळीने त्या व्यक्तीचा ताबा घेऊन त्याचे वागणे बोलणे नियंत्रित करतात आणि एका व्यक्तिमत्त्वाने केलेल्या गोष्टींची दुसऱ्या व्यक्तिमत्त्वाला आठवण सुद्धा नसते. यामुळेच अपरिचित ने शिक्षा म्हणून केलेले खून हे अंबी ला आठवत देखील नाहीत, किंबहुना लाय डिटेक्टर टेस्ट मध्ये देखील तो खरे बोलत आहे असे निष्पन्न होते. अनेकदा लोक याचा अर्थ भुताने पछाडले आहे असा देखील काढतात.

DID चा उल्लेख 1994 पर्यंत Multiple Personality Disorder असा केला जात होता, पण नंतर या डिसऑर्डर चे योग्य आकलन व्हावे म्हणून याचे नव्याने बारसे करण्यात आले. याचे मुख्य कारण म्हणजे या condition मध्ये व्यक्तीत नवीन व्यक्तिमत्व तयार होत नसून आहे त्या व्यक्तीच्या मूळ स्वभावाचे विखंडन होते. जसे अंबी ला लोकांनी कर्तव्यात कमतरता दाखवलेली आवडत नसे, म्हणून त्याची दुसरी personality अपरिचित त्या लोकांना शिक्षा देत असे. किंवा नंदिनी समोर त्याला प्रेम व्यक्त करायची / रेजेक्शन ची भीती होती पण रेमो हे व्यक्तिमत्व त्या उलट नंदिनी ला प्रेमात पाडत होते.

DID बद्दल थोडक्यात सांगायचे तर व्यक्तीच्या मेमरी, आयडेंटिटी आणि consciousness यांचे एकाच मेंदूत तयार झालेले parallal स्पेस किंवा dimension. यात व्यक्तीची प्रायमरी आयडेंटिटी म्हणजे त्याचे मूळ नाव आणि दुसरी आयडेंटिटी म्हणजे त्याचे guilt किंवा डिप्रेशन यामुळे तयार झालेले passive रूप जे परिस्थिती नुसार समोर येते. प्रत्येक व्यक्तिमत्व स्वतःची वेगळी मेमरी, सेल्फ इमेज आणि ओळख घेऊन असतात. दोन्ही व्यक्तिमत्त्वाचे ज्ञान आणि विचार पद्धती वेगळी असते. वयात, लिंगात किंवा धर्मात देखील फरक असू शकतो. अंबी हिंदू आणि रेमो ख्रिस्ती होता.

Dissociative Identity Disorder ची लक्षणे / symptoms

✳️ व्यक्ती मध्ये दोन किंवा अधिक व्यक्तिमत्त्वांचा अंतर्भाव. ( भुताने झपाटले आहे असा आरोप)
✳️ वागण्यात किंवा बोलण्यात अचानक होणारा फरक, सेल्फ इमेज आणि सेल्फ सेन्स यात तफावत, शारीरिक हालचाल बदलणे थोडक्यात अंगात आल्यावर व्यक्ती वागेल तसे सर्व वागणे.
✳️ ठराविक वेळेत काय झाले हे न आठवणे, ब्लँक होणे. ( दुसरे व्यक्तिमत्व जागृत असताना पहिले व्यक्तिमत्व सुप्त असते त्यामुळे त्याला काय झाले ते आठवत नाही.)
✳️ व्यक्तीच्या सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात अडथळे येणे.
✳️ अनेक व्यक्ती, घटना विसरणे. (तात्पुरते किंवा कायमचे ) Amnesia.

एका व्यक्तिमत्त्वाने दुसऱ्या व्यक्तिमत्त्वात जातानाचा प्रवास हा अनेकदा स्ट्रेस किंवा ट्रिगर मुळे होतो. जसे नंदिनी ने रजिस्टर ऑफिस मध्ये लाच द्यायचा प्रयत्न केला तेव्हा अपरिचित समोर आला. लाच देणे हा ट्रिगर झाला. यात देखील 2 प्रकार आहेत. एक possession-form ज्यात व्यक्ती चे दुसरी व्यक्तिमत्व हे समोरच्याला सहज कळते आणि दुसरा nonpossession-form ज्यात व्यक्ती दुसरे व्यक्तिमत्व जगत आहे हे पटकन लक्षात येत नाही.

DID असणारे लोक बरेचदा स्वतःकडे त्रयस्थ म्हणून बघतात. आपल्यासोबत जे होत आहे ते खरे की खोटे हे त्यांना कळत नाही. लोक जे सांगत आहे त्यामुळे ते द्विधा मनस्थिती मध्ये असतात. अनेकदा त्यांना वेगवेगळे आवाज ऐकू येतात, त्यांना असा भास होतो की त्यांचा शरीर आणि मनावरील ताबा सुटत आहे. असे अनेक प्रकारचे भास त्यांना होऊ शकतात.

DID असणारे 70 % लोक आयुष्यात एकदा तरी अत आत्महत्येचा प्रयत्न करतात. सेल्फ इंजुरी आणि सेल्फ harm चे प्रमाण देखील खूप जास्त आहे.

Dissociative Identity Disorder ची कारणे

व्यक्ती मध्ये हा डिसऑर्डर का निर्माण होतो याचे मूळ कारण अजूनही स्पष्ट नाही, पण बऱ्याच केसेस मध्ये अनुभलेला एखादा ट्रॉमा किंवा लैंगिक हिंसा हे मुख्य कारण आढळले आहे. जसे अंबी च्या बाबतीत त्याच्या बहिणीच्या मृत्यूचा ट्रॉमा कारणीभूत होता.

DID कोणत्याही वयात समोर येऊ शकतो, त्यासोबत बरेचदा post-traumatic symptoms सुद्धा दिसतात, परिवारात ( biologically close relatives) जर कुणाला DID असेल तर बाकीच्या लोकांच्या तुलनेत अशा लोकांना DID चे चान्स जास्त असतात.

याचे निदान करणे थोडे कठीण असते, कारण दुसरे व्यक्तिमत्व परिस्थिती नुसार समोर येते त्यामुळे संयम ठेवून काम करावे लागते. मेंदू मधील बदल लक्षात घ्यायला अनेकदा ब्रेन imaging चा देखील आधार घ्यावा लागतो.

Dissociative Identity Disorder साठी उल्पलब ट्रीटमेंट

लाँग टर्म psychotherapy ही सर्वात जास्त प्रभावी उपचार पद्धती आहे, दुसऱ्या व्यक्तिमत्वाचा उगम शोधून त्याचे अस्तित्व कसे नष्ट करता येईल हा याचा उद्देश असतो. त्याच सोबत cognitive आणि creative थेरपी देखील वापरल्या जातात. याचे उदाहरण द्यायचे झाले तर चंद्रमुखी चित्रपटात चंद्रमुखी ने राजा चा खून करून जो बदला घेतला त्यामुळे तिचे ध्येय पूर्ण झाले आणि ते व्यक्तिमत्व नष्ट झाले.

DID साठी स्पेसिफिक औषधे उपलब्ध नाहीत पण अँटी डिप्रेशन आणि अँटी anxiety टॅबलेट, झोपेच्या गोळ्या देऊन शारीरिक आणि वरवरची लक्षणे कमी केली जातात. योग्य प्रकारे इलाज केल्यास ह्या व्यक्ती योग्य आयुष्य जगतात.

Dissociative Identity Disorder वर आधारित काही चित्रपट –
✳️ Voices Within: The Lives of Truddi Chase 1990
✳️ Sybil 1976
✳️ Bhool Bhulaiyaa 2007

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*