Borderline personality disorder (BPD) हा मानसिक विकार आहे, किशोर अवस्थेत किंवा तारुण्यात असताना हा विकसित होतो. भावनिक अस्थिरता, impulsive वागणे, विकृत विचारसरणी, अस्थिर नातेसंबंध आणि चुकीची सेल्फ इमेज हा या डिसऑर्डर चा कॉमन पॅटर्न आहे.
Borderline personality disorder (BPD) ची कारणे.
BPD ची मूळ कारणे याबद्दल संशोधन सुरू आहे, आजवर उपलब्ध माहितीनुसार अनेक घटक यासाठी कारणीभूत असू शकतात.
✳️ जनुकीय संरचना – BPD ही genetic संरचनेमुळे देखील होऊ शकतो.
✳️ Environment – अस्थिर, हिंसक आणि दुर्लक्षित वातावरणात सतत राहिल्याने BPD विकसित होऊ शकतो.
✳️ Serotonin विकृती – serotonin हार्मोन आपला मूड नियंत्रित करत असते. त्याची पाळली बिघडल्यास देखील BPD विकसित होऊ शकतो.
Borderline personality disorder (BPD) चा धोका कुणाला जास्त असतो ?
✳️ घरात कुणाला Borderline personality disorder (BPD) असेल तर.
✳️ लहानपापासूनच भावनिक दृष्ट्या अस्थिर आणि इग्नोर झाल्यासारखे वाटत असेल तर.
✳️ तुम्ही लहान असताना घरात कुणाचे वागणे impulsive असेल तर.
✳️ बाल हिंसा ( child abuse) झाले असेल तर.
Borderline personality disorder (BPD) ची लक्षणे –
✳️ सत्यात किंवा स्वप्नात कुणीतरी दूर किंवा सोडून जाऊ नये म्हणून उन्मत्त होणे.
✳️ अस्थिर नाते असणे.
✳️ स्वतःबद्दल नकारात्मक विचार करणे.
✳️ स्वतःला विनाशाकडे घेऊन जाणारी वागणूक असणे.
✳️ आत्महत्या किंवा स्वतःला त्रास देणारी कृत्ये करणे.
✳️ सतत मूड बदलणे.
✳️ एकदम उदास आणि भकास वाटणे.
✳️ कारण नसताना चिडचिड होणे आणि राग येणे.
✳️ भावना आणि मन, शरीर एकदम वेगळे झाल्यासारखे वाटणे.
वरील पैकी कोणतीही 5 किंवा अधिक लक्षणे असल्यास व्यक्तीला BPD असू शकतो. अश्यावेळी तज्ञ काही प्रश्न विचारून आणि निरिक्षणातून याचे निदान करतात.
BPD साठी औषधे आणि psychotherapy दोघांचा एकत्रित वापर केला जातो. व्यक्तीच्या लक्षणानुसार त्यांना मेंटल हेल्थ सेंटर मध्ये देखील राहायचं सल्ला दिला जाऊ शकतो. ओमेगा 3 fatty acid गोळ्यांमुळे देखील aggression कमी होण्यास मदत होते त्यामुळे डॉक्टर या गोळ्या घेण्याचा सल्ला देतात.
Borderline personality disorder (BPD) मुळे पुढील आजार उद्भवू शकतात.
✳️ डिप्रेशन
✳️ Anxiety
✳️ Eating disorder
✳️ Bipolar disorder
✳️ व्यसनाधीनता
Borderline personality disorder (BPD) मुळे सामान्य जीवनात येणाऱ्या अडचणी.
✳️ कामात अडथळे निर्माण होणे.
✳️ नात्यात समस्या.
✳️ स्वतःला इजा पोहचवणे किंवा आत्महत्या.
प्रत्येक व्यक्ती नुसार लक्षणे आणि त्यांची तीव्रता बदलते पण योग्य उपचार घेतल्यास BPD चा त्रास कमी करता येतो.




1 thought on “Borderline personality disorder (BPD)”
Pingback: Coping up with Sexual abuse - Divya Abhivyakti