समज तुमचा पार्टनर मित्रांसोबत बाहेर चित्रपट पाहायला गेला/ गेली आहे, अश्यावेळी तुम्हाला उगाचच भीती आणि insecure वाटते की तुम्हाला अगदी निवांत वाटते ? तुम्ही तुमच्या पार्टनर वर किती विश्वास ठेवता किंवा नेमके नात्यात असताना कसे वागता हे तुमच्या attachment style वर अवलंबून असते. आजच्या लेखात आपण याच attachment styles समजून घेणार आहोत.
आपली attachment style माहित झाल्याने आपली सेल्फ awareness लेव्हल वाढीस लागते, नात्यात नेमके कशावर फोकस करावा आणि कशावर करू नये अशा अनेक बाबी लक्षात येतात ज्यामुळे आपण एक long term नाते प्रस्थापित करू शकतो.
आपले पालक लहानपणी आपल्याला कशी वागणूक देतात यावरून आपली Attachment style ठरत असते. बालपणात घडलेल्या घटना तसेच आपल्या भावनिक गरजा आणि त्यांची पालकांनी केलेली पूर्तता यावरून आपण पुढील आयुष्यात कसे वागणार हे निश्चित होत असते.
Attachment styles
मानसशास्त्रज्ञ आणि मनोविश्र्लेशक जॉन बॉलबी आणि मेरी ऐंसवर्थ यांच्या सिद्धांतानुसार 4 प्रकारचे attachment स्टाईल्स अस्तित्वात आहेत.
- Secure- सुरक्षित
- Avoidant – प्रतिबंधक
- Anxious – चिंताग्रस्त
- Disorganized – अस्ताव्यस्त
Avoidant, Anxious आणि disorganized या insecure attachment स्टाइल्स आहेत.
जर एखाद्या व्यक्तीला लहानपणी भावनिकदृष्ट्या उपलब्ध असणारे आणि वेळ देणारे पालक लाभले असतील तर त्या व्यक्ती मध्ये secure attachment style तयार होते, ती व्यक्ती कोणत्याही नात्याला सेफ समजतात आणि आपल्या भावना अगदी सहज मांडतात, या उलट ज्या व्यक्तींचे नाते पालकांशी घट्ट नसते, असे लोक भविष्यात देखील आपल्या भावना व्यक्त करत नाहीत आणि त्यांच्यात insecure attachment style निर्माण होते.
आपले पालक जसे असतात, जसे विचार करतात तशाच विचार सरणीचा आपला पार्टनर असावा असे आपल्याला subconsciously वाटत असते, त्यामुळे आपण आपल्या पालकांशी जसे वागतो अगदी तशीच वर्तणूक आपण आपल्या पार्टनर ला देत असतो. हे रिस्पॉन्स अगदी आपल्या नकळत जात असतात.
जर आपली attachment style ही insecure असेल तर आपण ती बदलू शकतो. त्यासाठी आधी आपण आपल्या मनात असलेल्या समजुती बदलणे गरजेचे ठरते. तरच आपण एक सुदृढ नाते निर्माण करू शकतो.
Secure- सुरक्षित attachment style
सुदृढ आणि विश्वासार्ह नाते निर्माण करणारे लोक.
जेव्हा पालक आणि मुलांमधील नाते हे अगदी सहज असते, पालक मुलांसाठी भावनिक दृष्ट्या उपलब्ध असतात, मुले आपल्या भावनिक बाबी निसंकोच बोलून दाखवू शकतात तेव्हा या attachment style चा विकास होतो.
ज्या मुलांना लहानपणी समजून घेतले जाते, त्यांची मते विचारात घेतली जातात तिथे मुले आपल्या पालकांचा आदर्श घेतात आणि secure attachment style चा पाया घातला जातो.
Secure attachment style ची लक्षणे
- आपल्या भावना समजून घेणे
- दुसऱ्यावर सहज विश्वास ठेवणे
- संवाद कौशल्य चांगले असणे
- भावनिक आधार सहज मागता येणे
- एकटे असताना comfortable असणे
- नात्यात असताना comfortable असणे
- स्वतःच मत/ भावना निसंकोच मांडणे
- समोरच्या व्यक्तीसाठी उपलब्ध असणे
- सेल्फ esteem चांगली असणे
- भावनिक आधार देण्यास तत्पर असणे
Secure attachment style चा नात्यावर होणारा प्रभाव
विश्वासार्हता आणि भावनिक उपलब्धता यामुळे हे लोक चांगले नाते प्रस्थापित करतात, आपल्या पार्टनर प्रती प्रेम, सकारात्मक भावना आणि विश्वास असल्याने यांना jealousy किंवा insecurity चा त्रास जाणवत नाही. ( पार्टनर कडून वाईट अनुभव आल्यास trust issues होऊ शकतात) आपण प्रेम deserve करतो हे त्यांना माहीत असल्याने त्यांना त्यासाठी बाहेरून कोणत्याही validation ची गरज पडत नाही.
Avoidant – प्रतिबंधक attachment style
भावनिक दृष्ट्या साथ न देता आल्यामुळे या लोकांना long term relationship निर्माण करता येत नाहीत.
जेव्हा पालक हे खूपच strict असतात किंवा ते मुलांच्या भावनिक गरजा समजून घेत नाहीत तेव्हा ही insecure attachment style वाढीस लागते.
जर एखाद्या व्यक्ती चे पालक हे मुलांना लहानपणा पासुन स्वावलंबी हो, आमच्यावर अवलंबून राहू नकोस किंवा तुला आम्ही पोसत आहोत असे सतत ऐकवत असतात, मुलगा भावना व्यक्त करत असताना त्याला हिनवतात किंवा weak बोलतात, त्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण करताना देखील टाळाटाळ करतात तेव्हा ही style विकसित होते.
अनेकदा पालक हे मुद्दामून करत नसले पण ते कामात व्यस्त असले किंवा त्यांना मुलापेक्षा त्याचा मार्क्स आणि करिअर बद्दल चिंता असते अशा वेळी मुलांना वाटते की पालक आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे देखील या attachment स्टाईल चा विकास होतो.
यामुळे मुले स्वतःचा इंडिपेंडंट म्हणजेच स्वावलंबी समजू लागतात आणि ते भविष्यात कुणावर भावनिक दृष्ट्या अवलंबून राहत नाहीत, आणि समोरच्या व्यक्तीच्या भावना देखील समजून घेणे त्यांना कठीण जाते.
Avoidant – प्रतिबंधक attachment style ची लक्षणे
- भावनिक किंवा शारीरिक संबंध प्रस्थपित करताना अडचणी येणे
- आपल्याला कुणाची गरज नाही असे वाटणे
- आपल्या भावना व्यक्त करता न येणे
- लोकांवर विश्वास न बसणे
- आपल्या जवळ (नात्यात) कुणी येत असेल तर भीती वाटणे
- स्वतःसोबत वेळ घालवणे
- Commitment ची भीती वाटणे
- नात्यात जबाबदारी पासून दूर पळणे
Avoidant – प्रतिबंधक attachment style चा नात्यावर होणारा प्रभाव
कोणत्याही नात्यात जाताना हे समोरच्या व्यक्तीला भावनिक दृष्ट्या जवळ येऊन देत नाहीत, जर कोणतीही व्यक्ती अती भावनिक होत असेल तर हे नात्यात अंतर निर्माण करतात किंवा त्यांना avoid करू लागतात. यांच्या मते सर्वांनी आपल्या भावनांची जबाबदारी स्वतःच घ्यायची असते.
Anxious – चिंताग्रस्त attachment style
या insecure attachment style मध्ये व्यक्तीला सतत rejection ची भीती वाटतं असते, आपल्याला कुणीतरी सोडुन जाईल असा यांचा समज असतो. आपल्या पार्टनर कडून validation आणि भावनिक आधार यांना सतत हवा असतो. हे अती जास्त प्रमाणात आपल्या पार्टनर वर अवलंबून असतात.
जेव्हा पालक अती भावनिक असतात किंवा स्ट्रेस / डिप्रेशन मधून जात असतात तेव्हा ते मुलांना योग्य वेळ देत नाहीत, कधी ते मुलांची बाजू ऐकून घेतात तर कधी त्याला पूर्ण इग्नोर करतात. पालकांना वाईट वाटले तर त्यासाठी ते मुलांना दोष देतात अशा सतत होणाऱ्या बदलांमुळे मुले कन्फ्युज होतात. आपल्या पालकांच्या अश्या वागण्याने त्यांना कधीच सुरक्षित वाटत नाही, त्यामुळे ते सतत चिंताग्रस्त राहतात, पालकांना सांगू की नको ते कसे react करतील हा संभ्रम यांना त्रास देत असतो.
आपण सर्व गोष्टींना जबाबदार आहोत, आणि त्यामुळे आपण सर्वात आधी समोरील व्यक्तीच्या भावनांना किंमत दिली पाहिजे असे यांना वाटू लागते.
Anxious – चिंताग्रस्त attachment style ची लक्षणे
- सलगी करणे (चीपकु वृत्ती)
- कोणत्याही गोष्टीने सहज ऑफेंड होणे
- Critisism (खरी किंवा percive केलेली) अजिबात हलती न शकणे
- Jealousy ची भावना
- सेल्फ esteem कमी असणे
- आपण प्रेम deserve करत नाही असे वाटणे
- रेजेक्शन ची भीती वाटणे
- आपल्याला सगळे सोडुन जाणार अशी भीती वाटणे
- दुसऱ्यावर विश्वास न ठेवता येणे
Anxious – चिंताग्रस्त attachment style चा नात्यावर होणारा प्रभाव
आपण कोणाचेच प्रेम deserve करत नाही असे सतत वाटतं राहिल्याने यांना पार्टनर कडून पुन्हा पुन्हा assurity हवी असते. नात्यात कोणतेही चॅलेंज आले तरीही ते स्वतःला दोष देत असतात तसेच सतत jealousy मुळे नाते खराब करून घेतात.
Disorganized – अस्ताव्यस्त attachment style
लहानपणी एखाद्या ट्रॉमा मुळे किंवा sexual abuse मुळे ही insecure attachment style विकसित होते. या attachment style मध्ये मुले पालकांना घाबरून असतात आणि त्यांना इतरांवर विश्वास ठेवणे देखील अवघड जाते.
Disorganized – अस्ताव्यस्त attachment style ची लक्षणे
- Rejection ची भीती
- आपल्या भावना नियंत्रित करता न येणे
- विरोधाभासी वागणूक
- सतत चिंताग्रस्त असणे
- दुसऱ्यावर विश्वास नसणे
- Avoidant आणि anxious attachment style ची सर्व लक्षणे
या attachment style मधील मुलांना नंतर mood disorders, personality disorders, सेल्फ harm, व्यसन असे अनेक मानसिक त्रास भोगावे लागू शकतात.
Disorganized – अस्ताव्यस्त attachment style चा नात्यावर होणारा प्रभाव
हे लोक कधी कधी अती चीपकू तर कधी कधी अगदीच avoid करणारे होऊन जातात. यांच्या वागण्यात अनेकदा दोन टोकांची भूमिका असते. त्यांना प्रेमाची गरज असते पण आपल्याला समोरचा reject करेल किंवा सोडुन जाईल या भीतीने ते प्रेम स्वीकारत नाहीत किंवा नाते तोडून टाकतात. त्यांना commitmemt ची देखील खूप भीती असते.
हे आपल्या पार्टनर ला unpredictable समजत असतात, जेव्हा यांचेच वागणे हे unpredictable असते. आपल्याला काय हवे आहे हे यांना सहज स्पष्ट होत नाही.
आपली attachment style समजली की मग नाते सुदृढ करणे सोपे जाते, आपण नेमके कुठे चुकत आहोत आणि कुठे बदल करावा हे सहज ठरवता येते.
आपली attachment style बदलण्यासाठी कधी कधी समुपदेशनाची देखील गरज पडू शकते. हा प्रवास सोपा नाही परंतु शक्य जरूर आहे.



