Antisocial personality disorder (ASPD)

Antisocial personality disorder (ASPD)

Table of Contents

प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. त्यांची विचार करण्याची क्षमता आणि पद्धत यात फरक असतो. पण काही लोकांचे विचार आणि वागण्याची पद्धत ही विनाशकारी असते. Antisocial personality disorder (ASPD) असणाऱ्या व्यक्ती चे वागणे हे दुसऱ्यांना manipulate करणारे आणि त्यांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे असते. या डिसऑर्डर मुळे व्यक्तीचे मूळ व्यक्तिमत्व बदलून जाते आणि ती सतत destructive विचार करते.

ASPD साधारण लहानपणी किंवा किशोर अवस्थेत असताना निदर्शनास येतो. ASPD असणारे लोक पुढील गोष्टी फार सहज करत असतात.
❤️ कायदा तोडणे.
❤️ दुसऱ्यांच्या हक्कांचे उल्लंघन करणे.
❤️ दुसऱ्यांच्या विचारात फेरफार करणे किंवा त्यांचे शोषण करणे.

हा डिसऑर्डर असलेले लोक कोणताही कायदा तोडताना अजिबात विचार करत नाहीत. ते अनेक वेळा सहज खोटे बोलतात आणि दुसऱ्यांना सहज अडकवतात. याचा त्यांना अजिबात पश्र्चाताप नसतो.

Antisocial personality disorder (ASPD) कशामुळे निर्माण होऊ शकतो ?

ASPD चे मूळ कारण अजूनही अज्ञात आहे. जनुकीय संरचना, आजूबाजूची परिस्थिती हे घटक या डिसऑर्डर साठी कारणीभूत असू शकतात. जर एखाद्या व्यक्तीचे बालपण कठीण गेले असेल आणि त्याने पुढील गोष्टी पाहिल्या असतील तर त्यांच्यात ASPD विकसित होऊ शकतो.

✳️ लहानपणी हिंसेचा शिकार झाले असल्यास (child abuse).
✳️ जर पालकांना ASPD असेल तर.
✳️ अती मद्यसेवन / अल्कोहोल सेवन करणारे पालक असतील तर.

एका रिसर्च नुसार पुरुषांमध्ये ASPD होण्याचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत जास्त आहे. प्रत्येक 3 पुरुषामागे 1 स्त्री असे याचे गुणोत्तर आहे.

Antisocial personality disorder (ASPD) ची लक्षणे

लहान मुलांमध्ये कोणत्याही प्रणांविषयी क्रूर पणा असणे आणि उगाच कोणत्याही वस्तूंना आग लावणे, तोडून टाकणे अशी लक्षणे आढळून येतात.

✳️ सतत चिडचिड करणे.
✳️ अती गर्विष्ठ असणे.
✳️ दुसऱ्यांना manipulate करणे.
✳️ उगाच विनोदी वागणे म्हणजे सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे राहील.
✳️ सतत खोटे बोलणे.
✳️ चोरी करणे.
✳️ नियम तोडणे.
✳️ चुकीचा पश्र्चाताप नसणे.
✳️ स्वतःची किंवा दुसऱ्याची काळजी नसणे.
✳️ सतत भांडणे आणि आक्रमक होते.

एका रिसर्च नुसार ASPD असणारे लोक हे सहज व्यसनाधीन होतात.

Antisocial personality disorder (ASPD) चे निदान कसे केले जाते ?

18 वर्षाखालील व्यक्ती मध्ये जर वरील लक्षणे दिसत असतील तर त्याला conduct disorder समजले जाते, 15 वर्ष वयात conduct disorder असलेल्या व्यक्ती मध्ये ASPD ची लक्षणे दिसू शकतात. 18 वर्षांवरील व्यक्तींमध्ये काही प्रश्न विचारून आणि निरिक्षणातून निदान केले जाते.

Antisocial personality disorder (ASPD) साठी औषधे आणि psychotherapy दोन्ही सोबत वापरले जातात. यातून येणारे रिझल्ट सहज समजून येत नाहीत त्यामुळे अनेकदा डॉक्टर मेंटल हेल्थ सेंटर मध्ये राहण्याच्या सल्ला देतात.

या लोकांसाठी नियम तोडणे आणि गुन्हा करणे अगदी सहज असते त्यामुळे ते स्वतःहून इलाज करत नाहीत. अनेकदा कोर्ट म्हणजेच न्यायव्यवस्था त्यांना ट्रीटमेंट ची गरज असल्यास तसे recommend करते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*