काल सहज एका मित्राच्या पोस्ट वर मैत्रिणीने केलेली एक कॉमेंट पहिली, “Sympathy should be added in negative emotions. Encourage people to be empathetic .” हे वाचून आजच्या लेखाचा विषय सुचला. Sympathy आणि Empathy म्हणजे नेमके काय ? करुणा / compassion म्हणजे काय ? हे थोडक्यात मांडायचा प्रयत्न लेखातून केला आहे.
आपला एखादा मित्र कोणत्याही कारणाने दुःखात असेल तेव्हा एक मित्र म्हणून त्यावर थोडी दया येते आणि आपण त्याला कशाप्रकारे मदत आणि सपोर्ट करू शकतो असे विचार आपल्या डोक्यात येतात. मित्राचा अपघात, परिवारात कुणाचे निधन किंवा ब्रेकअप अशा घटनांमध्ये आपण नेमके कसे व्यक्त होतो ? sympathy देतो की Empathy ?
Empathy म्हणजे काय ?
Empathy आणि Sympathy मध्ये बरेच लोक गल्लत करतात, वरपांगी हे दोन्ही सारखेच वाटत असेल तरीही त्यांमध्ये एक मोठा फरक आहे तो म्हणजे दोन्ही भावनांचा दुःखी व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे अनुभव येतो. Empathy म्हणजे तुम्ही एखाद्याचे दुःख समजून घेत आहात आणि ते अनुभवत देखील आहात. दुःख वाटून घेण्याची भावना दुःखी व्यक्तीला खूप जास्त आधार देते. त्याचे दुःख त्याच्याच नजरेतू पाहिले की आपल्याला ते चांगल्या प्रकारे समजते.
उदा. समजा जर तुमच्या मित्राचे वडील नुकतेच कॅन्सर मुळे वारले, आणि तुमचे देखील जवळचे कुणी कॅन्सर ने वारले असेल तर तुम्हाला मित्राचे दुःख प्रकर्षाने जाणवते, कारण तुम्ही सुद्धा त्या दुःखाचा अनुभव फार जवळून घेतलेला असतो. त्या व्यक्तीच्या निधनाने नेमकी काय पोकळी निर्माण झाली आणि तुम्हाला काय वाटले होते हे तुम्हाला माहीत असते म्हणून मित्राचे दुःख समजून घेणे सोपे जाते. परंतु एखाद्याचे दुःख समजून घेताना ती घटना आपल्या सोबत झालीच पाहिजे असे आवश्यक नाही. कारण Empathy ही भावनाच अशी आहे जी आपल्याला दुसऱ्याचा चष्म्यातून जग बघायला लावते / त्यांच्या ठिकाणी जाऊन विचार करायला भाग पाडते.
Empathy मध्ये आपले imagination खूप महत्वाचे ठरते कारण आपण दुःखी व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला इमॅजिन करत असतो. त्यामुळे आपण दुःखी व्यक्तीला किंवा त्याच्या वागण्याला Judge करत नाही. इथे जजमेंट नसतात म्हणून दुःखी व्यक्ती लवकर recover होते. अनेकदा दुःखी व्यक्तीला फक्त त्यांचे मन मोकळे करायचे असते, त्यांना कोणतेही सल्ले नको असतात अशा वेळी empathatic व्यक्ती एक उत्तम मित्र सिद्ध होतात कारण ते ऐकून घेतात आणि यांचे आवडते वाक्य असते ” मी तुझे देख समजून घेऊ शकतो / शकते, हे नक्कीच खूप कठीण असेल. ” empathy व्यक्तीच्या भावना समजून घेते त्यामुळे ती खूप मनाचा वेध घेते आणि मानसिक आधार देते.
Sympathy म्हणजे काय ?
Sympathy म्हणजे एखाद्याचे दुःख आपल्या दृष्टिकोनातून समजून घेणे, एखाद्या बद्दल दया किंवा दुःख वाटणे हे Sympathy चे लक्षण आहे. sympathy ही व्यक्तिच्या दृष्टिकोनावर अवलंबून असल्यामुळे त्यात जजमेंट देखील येतात.
उदा. एखाद्याचे लाख रुपयाचे नुकसान झाले त्यामुळे त्याने आत्महत्या केली तर sympathatic लोकांना वाटते की लाख रुपये मोठी रक्कम नव्हती , हा व्यक्ती मूर्ख आहे. कारण त्यांच्यासाठी लाख रुपये जास्त मोठी रक्कम नसते. पण कदाचित आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती साठी ती खूप मोठी असेल हा विचार ते करू शकत नाहीत.
जेव्हा आपण एखाद्याला Sympathy देतो तेव्हा त्याबद्दल बोलताना आणि वागताना दया दाखवतो त्यामुळे त्या नात्यात परकेपणा येतो. दुःखी व्यक्ती आपले मन मोकळे करताना sympathetic व्यक्ती त्याला अनावश्यक त्याच्या चुका दाखवतात आणि तुझ्या सोबत झाले ती तुझीच चूक आहे असा समज करून देतात त्यामुळे दुःखी व्यक्ती अजून जास्त दुःखी होते.
Sympathy देणारे लोक “बिचारा ” हा शब्द अनेकदा वापरतात, त्यामुळे व्यक्तीला आपल्यावर कुणीतरी उपकार किंवा दया करत आहे असा अनुभव येतो. Sympathy व्यक्तीच्या बोलण्यावर सगळी मते बनवते त्यामुळे ती उथळ असते आणि अनेकदा व्यक्तीचे Self esteem यांवर नकारात्मक इफेक्ट करते.
Compassion म्हणजे काय ?
करुणा किंवा compassion ही भावना नसून एक वृत्ती आहे, वरील दोन्ही प्रकारात आपण परिचित किंवा मित्रांची स्थिती समजून त्यावर प्रतिक्रिया देत असतो पण Compassionate लोक हे अनोळखी लोकांची देखील काळजी करतात, Compassion ही वृत्ती एक क्वालिटी आहे हा माझा वैयक्तिक समज आहे कारण त्यामुळे समाजाला मदत होते परंतु प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात त्या प्रमाणे नर्सेस, डॉक्टर्स, पोलीस हे लोक अनेकदा compassion fatigue अनुभवतात. दुसऱ्याची काळजी स्वतःपेक्षा जास्त केल्याने होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास म्हणजेच compassion fatigue. याचा शिकार अती empathatic असणारे सामान्य लोक देखील होऊ शकतात. त्यामुळे इतरांचा विचार करताना स्वतःला विसरून अजिबात जायचे नाही.
आजच्या डिजिटल युगात empathy कमी होत चालली आहे आणि व्यक्ती narcissistic होत आहेत त्यामुळे empathy वाढण्यासाठी लोकांशी संपर्क ठेवणे, एखाद्या NGO सोबत काम करणे, लॉजिक सोबत एमोशन समजून घेणे आणि आपल्यापेक्षा under privilege लोकांचे आयुष्य जवळून पाहणे गरजेचे आहे.




1 thought on “Sympathy or Empathy”
Pingback: Art of moving on - Divya Abhivyakti