ट्रॉमा म्हणजे काय?

Table of Contents

हल्ली आपण “ट्रॉमा” हा शब्द खूपदा ऐकतो.

  • कुणी म्हणतो, “माझं बालपण खूप ट्रॉमॅटिक होतं.”
  • कुणी सांगतो, “नोकरीत बॉसने ओरडलं, मला ट्रॉमा झाला.”
  • सोशल मीडियावरही लोक आपले अनुभव “ट्रॉमा” या शब्दात मांडतात.

पण खरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक वाईट प्रसंग = ट्रॉमा असं नसतं. ट्रॉमा हा खूपच गंभीर आणि सखोल मानसिक अनुभव आहे. याचा नीट उलगडा झाला तर लोक चुकीचा वापर करणार नाहीत, तसेच खरी मदत गरजेच्या ठिकाणी पोहोचेल.

ट्रॉमा ची शास्त्रीय व्याख्या

American Psychological Association (APA) नुसार:

Trauma is an emotional response to a terrible event like an accident, rape or natural disaster.
(अपघात, नैसर्गिक आपत्ती, लैंगिक हिंसा अशा भयानक प्रसंगानंतर येणारी आणि आपल्यावर दीर्घकाळ परिणाम करणारी भावनिक प्रतिक्रिया म्हणजे ट्रॉमा.)

DSM-5 (Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders, 2013) मध्ये:

  • ट्रॉमा म्हणजे – जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, स्वतःला किंवा जवळच्या व्यक्तीला झालेली गंभीर दुखापत किंवा लैंगिक अत्याचार प्रत्यक्ष पाहणे किंवा जवळच्या व्यक्तीला होताना कळणे.
  • या घटनांनंतर व्यक्तीला झोपेचे विकार, भयानक स्वप्नं, भीती, टाळण्याची प्रवृत्ती, फ्लॅशबॅक असे लक्षणं दिसतात.

घटना आणि अनुभव यातला फरक

  • दोन लोक एकाच प्रसंगाला सामोरे गेले तरी त्यांची मानसिक प्रतिक्रिया वेगळी असू शकते. म्हणून ट्रॉमा हा Subjective अनुभव ठरतो.

👉 वाईट घटना स्वतः ट्रॉमा नसते; त्या घटनेवर व्यक्तीची प्रतिक्रिया म्हणजे ट्रॉमा असतो.

उदाहरण १:

  • एका वर्गात शिक्षकांनी दोन विद्यार्थ्यांना ओरडलं.
  • पहिल्याला वाटलं: “मी चुका सुधारून आणखी चांगलं करेन.”
  • दुसऱ्याला वाटलं: “मी नालायक आहे, माझ्यात काहीच नाही.”
    👉 एकाच घटनेचा एका मुलावर सकारात्मक परिणाम, तर दुसऱ्यावर ट्रॉमा.

उदाहरण २:

  • दोन प्रवासी रेल्वे अपघातातून वाचले.
  • एकाने ठरवलं: “माझं जीवन नव्याने मिळालं, आता ते चांगल्या कामाला देईन.”
  • दुसऱ्याला मात्र सतत अपघाताचे फ्लॅशबॅक येऊ लागले, झोप गायब झाली.
    👉 दोघांनी तीच घटना अनुभवली, पण फक्त एकासाठी ती ट्रॉमा ठरली.

दुःख आणि ट्रॉमा यात फरक

  • दुःख (Sadness): सामान्य भावनिक प्रतिक्रिया, जी काळानुसार कमी होते.
  • ट्रॉमा (Trauma): दीर्घकाळ टिकणारी, मेंदू-शरीरावर परिणाम करणारी आणि व्यक्तिमत्त्वात बदल घडवणारी प्रतिक्रिया.

उदाहरण:

  • प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुःख वाटणे स्वाभाविक आहे, कालांतराने ते कमी होत जाते, पण एखाद्याला महिनोन्‌महिने झोप लागत नाही, फ्लॅशबॅक येतात, भीती सतत जाणवते – तर तो ट्रॉमा आहे.

ट्रॉमा चे आपल्यावर होणारे परिणाम

  1. भावनिक परिणाम
    • भीती वाटणे, सतत असुरक्षित वाटणे.
    • राग अनावर होणे, अपराधीपणा जाणवणे.
    • नैराश्य वाढणे, आत्महानीचे विचार बळावणे.
  2. शारीरिक परिणाम
    • डोकेदुखी, थकवा जाणवणे.
    • झोपेचे विकार निर्माण होणे.
    • हृदयविकार, मधुमेह यांचा धोका वाढणे.
  3. सामाजिक परिणाम
    • नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणे.
    • समाजात मिसळण्याची भीती वाटणे .
    • कामात लक्ष न लागणे, अपयशाची भीती वाटणे.

संशोधन: Yehuda et al. (2015) यांच्या Neurobiology of PTSD मध्ये सांगितले आहे की ट्रॉमा मेंदूतील amygdala, hippocampus आणि prefrontal cortex या भागांच्या कार्यावर थेट परिणाम करतो.

“ट्रॉमा नेहमी समोरच्याची चूक असेलच असं नाही”

लोक समजतात की ट्रॉमा = इतरांची चूक. पण ते नेहमीच खरे नसते.

  • एखादा अपघात कुणाच्या चुकीशिवाय देखील होऊ शकतो, तरीही तो काही व्यक्तींसाठी ट्रॉमा ठरू शकतो.
  • कधी कधी एखाद्या व्यक्तीने केलेलं वर्तन “अपमान” म्हणून न घेता “सूचना” म्हणून स्वीकारलं तर ट्रॉमा टाळता येऊ शकतो.
  • घडलेल्या घटनेपेक्षा जास्त त्या घटनेकडे पाहण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन (perception) हा घटक ट्रॉमा समजून घेण्यात महत्वाचा ठरतो.

उदाहरण:

  • वडिल मुलाला कठोर शब्दात बोलले.
    • एक मुलगा म्हणतो: “बाबा माझ्यावर प्रेम करत नाहीत.” → भावनिक ट्रॉमा.
    • दुसरा मुलगा म्हणतो: “बाबा मला सुधारायला सांगत आहेत.” → शिकण्याचा अनुभव.

ट्रॉमा शब्दाचा चुकीचा वापर

आजकाल लोक लहानसहान गोष्टींनाही “ट्रॉमा” म्हणतात.

  • “मित्राने फोन उचलला नाही = मला ट्रॉमा झाला.”
  • “परीक्षेत कमी मार्क्स मिळाले = ट्रॉमा.”

👉 हे चुकीचं आहे.
कारण अशा वापरामुळे खऱ्या ट्रॉमा चं गांभीर्य कमी होतं आणि ज्यांना खरी मदत हवी आहे त्यांचं महत्त्व दुर्लक्षित राहतं.

निष्कर्ष

  • ट्रॉमा म्हणजे केवळ वाईट घटना नव्हे, तर त्या घटनेवरची व्यक्तीची मानसिक प्रतिक्रिया.
  • तो नेहमी समोरच्याची चूक असतोच असं नाही; दृष्टिकोन, coping skills आणि आधारव्यवस्था ठरवतात की एखादी घटना ट्रॉमा ठरेल की नाही.
  • प्रत्येक दुःखद अनुभव ट्रॉमा होत नाही, पण जेव्हा तो दीर्घकाळ मानसिक आरोग्यावर परिणाम करतो तेव्हा त्याकडे गांभीर्याने बघणं गरजेचे ठरते.

संदर्भ (References)

  1. American Psychiatric Association. (2013). Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders (5th ed.).
  2. Herman, J. (1992). Trauma and Recovery. Basic Books.
  3. Felitti, V. J., et al. (1998). Relationship of Childhood Abuse and Household Dysfunction to Many of the Leading Causes of Death in Adults. American Journal of Preventive Medicine.
  4. Yehuda, R., et al. (2015). Neurobiology of Post-Traumatic Stress Disorder. Nature Reviews Neuroscience.
  5. Bonanno, G. A. (2004). Loss, trauma, and human resilience. American Psychologist.

2 thoughts on “ट्रॉमा म्हणजे काय?”

  1. BHAGYAWAN DADASO GHADGE

    That was beautifully presented thank you for your efforts and make society aware…

  2. Gayatri Arun Shinde

    Thank you for this insightful information. It helps in correcting my misconceptions about this topic…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*