आयुष्यात चढ उतार येतच असतात, प्रत्येक व्यक्ती सोबत चांगले आणि वाईट होत असते, पण काही लोक कोणतीही वाईट घटना घडली की ते परिस्थिती किंवा बाहेरील गोष्टींना दोष देत असतात, त्यांच्या मते त्यांची कधीच चूक नसते. प्रत्येक वेळी आपणच कशात ना कशात सापडतो असा त्यांचा समज असतो, याच समाजाला victim mentality म्हणतात, अनेकांना victimhood हा व्यक्तिमत्त्वाचा भाग वाटत असतो पण मुळात तो आपल्या विचाराने निर्माण होणारा एक पैलू आहे जो आपली बचाव प्रणाली (defense mechanism) म्हणून काम करत असतो.
Victim mentality म्हणजे नेमके काय ?
ही माझी चूक अजिबात नाही
Victim mentality असणारे लोकांच्या मते त्यांच्या आयुष्यात होणारी प्रत्येक गोष्टीत दुसऱ्या कुणाची चूक असते, मग ती त्यांच्या आई वडिलांची, भाऊ, बहिणीची, पार्टनर किंवा अगदी समोर असलेल्या कोणत्याही व्यक्ती / ideology ची असू शकते. ते सतत त्यांच्यासोबत होणाऱ्या वाईट गोष्टी विषयी तक्रार करत असतात. ये कोणतीही जबाबदारी घेताना पाठी होतात आणि कारण देतात की परिस्थिती आपल्या हातात नसते.
Martyr कॉम्प्लेक्स आणि Victim mentality मधील फरक
अनेकदा Victim mentality आणि Martyr कॉम्प्लेक्स मध्ये लोक कन्फ्युज होतात, दोघांची अनेक लक्षणे सारखीच आहेत पण Victim mentality असणारे लोक हे कोणतेही जनरल स्टेटमेंट हे आपल्यासाठी च आहे असा समज करून घेतात, मी असे काय केले होते जे हे सर्व माझ्या वाटेला आले असा प्रश्न त्यांना सतत पडत असतो.
या उलट martyr कॉम्प्लेक्स असणारे लोक हे इतरांसाठी काहीही करायचा तयार होतात, अगदी त्यांची ईच्छा नसली तरीही ते दुसऱ्यांच्या नजरेत hero होण्यासाठी त्याग करायला तयार होतात.
एक अपायकारक coping mechanism
लोक ट्रॉमा किंवा वाईट घटना suffer केल्या नंतर त्यातून बाहेर पाडण्यासाठी स्वतःची प्रणाली निर्माण करतात, त्यात जर कुणी व्यवस्थित अवलोकन न करता आपल्या सोबत जे वाईट झाले त्याला परिस्थिती किंवा दुसऱ्या व्यक्तीवर ढकलून देत असेल तर त्या व्यक्ती मध्ये Victim mentality निर्माण होते. त्यामुळे आपली काहीच चूक नाही असे समाधान त्यांना मिळते. याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यांची जबाबदारीची जाणीव कमी होत जाते.
अशा लोकांना आपण काही सल्ले द्यायला गेलो असता ते सल्ले कसे कामाचे नाहीत, किंवा त्यातून पुढे काय होईल याचे वेगवेगळे तर्क ते सांगत जातात, अशा व्यक्तींना मदत करणे हे प्रचंड त्रासदायक ठरते.
Victim होऊन होणारा फायदा
जबाबदारी शून्य होता येते
समजा तुम्ही गाडी चालवत आहात आणि accident होतो तर तुम्ही त्याची जबाबदारी घ्यायला हवी पण तुम्ही जर तिथे चूक असताना देखील ती न स्वीकारता बाकीच्या गोष्टींना दोष देऊ लागतात तर ???
Victimhood मुळे लोक जबाबदारी नाकारतात, त्यामुळे त्यांना अनेक प्रश्नांकडे सहज पाठ फिरवता येते.
पण आयुष्यात आपण केलेल्या गोष्टीची जबाबदारी आपल्याला घेता येणे हे एक महत्वाचे स्किल आहे, त्यामुळे जबाबदारीची जाणिव निर्माण करणे महत्त्वाचे ठरते.
दुय्यम फायदे
Victimize व्यक्ती ने स्वतःची शोकांतिका सांगितली की मग त्याला मित्र/ समाजाकडून sympathy मिळते, attention आणि validation देखील त्याच सोबत येतात त्यामुळे अनेकदा अशांना पैसे/ मदत अगदी सहज मिळून जाते. प्रत्येक Victim mentality असणाऱ्या व्यक्तीला हे दुय्यम फायदे आपल्याला मिळत आहेत याची जाणीव देखील नसते, त्यांना मनापासून त्यांच्यासोबत काहीतरी चूक झाले आहे असेच वाटतं असते.
सुप्त मानसिक आधार
आपल्यासोबत भूतकाळात झालेल्या वाईट घटना यांचा ट्रॉमा इतरांना सांगताना ते मी कसा निर्दोष होतो हेच सांगत असतात त्यामुळे त्यांना इतरांकडून मानसिक आधार देखील मिळतो.
कोणतीही रिस्क घ्यायची गरज नसते
अश्या व्यक्ती आधीच त्रासलेल्या आहेत म्हणून कुणी त्यांना जास्त रिस्क असलेली कामे देत नाहीत, उलट त्यांना देखील आपण रिस्क घेऊ नये म्हणजे कोणतीच वाईट घटना आपल्या सोबत होणार काही असे सतत वाटत असते.
Victim mentality ची काही लक्षणे
तुमच्यात जर पुढीलपैकी काही लक्षणे असतील तर तुम्ही देखील victim mentality चे शिकार असू शकता.
- तुमचे आयुष्य किंवा आयुष्यातील घटना यासाठी दुसऱ्यांना दोष देणे
- नशीब / जग आपल्या विरोधात आहे असे वाटणे
- कोणत्याही प्रॉब्लेम समोर सहज हार मानणे, शक्तिहीन वाटणे
- आयुष्याविषयी नकारात्मक विचार असणे
- तुमच्यात सुधारणा / प्रगती व्हावी म्हणून कुणी काही सुचवले तर तुम्हाला ते दोष देत आहेत असे वाटणे
- तुम्ही बिचारे आहात असे समजून थोडे रिलॅक्स वाटणे
- तुमच्या सारखे लोकांना दोष देणारे/ सतत तक्रार करणारे मित्र जवळ असावे असे वाटणे
- स्वतःचे निरीक्षण करून त्यात बदल करणे अवघड वाटणे
Victim mentality मधून बाहेर कसे यावे ?
कुणीही जन्माला येताना Victim mentality घेऊन येत नसते, ती त्यांच्या coping mechanism मधून तयार होत असते, त्यामुळे त्यावर काम करून यातून बाहेर नक्कीच पडता येते.
जबाबदारी स्वीकारा
तुम्ही समोरच्याला कंट्रोल नाही करू शकत पण तुम्ही कसे वागायचे/ कसे react व्हायचे हे तुमच्याच हातात असते त्यामुळे आपल्या कृती आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारायला सुरुवात करा.
स्वतःची काळजी घ्या
अनेकदा भूतकाळात झालेल्या घटनांनी victim mentality निर्माण झालेली असते, अश्यावेळी झालेल्या घटना योग्य प्रकारे समजून त्यावर विचार करणे गरजेचे असते ज्यामुळे आपण आपली चूक समजून घेतो. चूक समजली की स्वतःचा द्वेष न करता क्षमा करावी आणि त्यातून योग्य तो बोध घ्यायला सुरुवात करावी.
स्वतःचे मत मांडायला शिका
तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल किंवा करायची नसेल/ वेगळ्या पद्धतीने करायची असेल तर तसे स्पष्ट सांगा म्हणजे परिणामाची जबाबदारी तुम्हाला सहज घेता येईल.
Victim mentality कधी कधी उपेक्षित/ वंचित भावना आणि स्वतःची कमी असलेली सेल्फ esteem तसेच आपल्या मनात लपून असलेल्या इन्सेक्युरिट मुळे देखील येते त्यामुळे त्याचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करत रहा.
उदा. तुम्ही काळे / सावळे आहात आणि interview मध्ये reject झालात तर कारण जाणून न घेता त्याचा आरोप स्वतःच्या वर्ण/ रंगावर लावणे.
जर अजूनही शंका असतील तर सेल्फ हेल्प पुस्तके वाचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.




2 thoughts on “Victim mentality – Self Victimization”
अतिशय समर्पक आणि सडेतोड विश्लेषण/स्पष्टीकरण l
आवडले.
धन्यवाद !