डोर कोई खींचे : social media pull force.

डोर कोई खींचे : social media pull force.

Table of Contents

सकाळी उठून नोटीफिकेशन पाहत बसलो होतो, ये शाम मस्तानी हे गाणं सुरू होत आणि तितक्यात डोर कोई खींचे…. हे शब्द कानी पडले आणि मग मनाला एक विचार सतावून गेला तो म्हणजे social media मध्ये अशी कोणती जादू आहे की आपण एवढे आकर्षित होतो ? आजच्या लेखात याच विषयावर मी माझे analysis मांडले आहे.

2021 हे वर्ष जवळजवळ संपत आले आहे, बऱ्याच जणांनी त्यांचे नवीन वर्षाचे संकल्प केले असतील त्यात एक संकल्प हा ही असेल की मला माझा मोबाईल आणि social media चा वापर कमी करायचा आहे, ही काही पहिलीच वेळ अजिबात नाही असे संकल्प आपण अनेकदा करून झालेले असतात त्यावर काम पण सुरू होते पण मग सारखा फोन चेक करायची इच्छा होते किंवा नोटिफिकेशन आले आहे/ फोन vibrate झाला आहे असे भास देखील होतात.

सोशल मीडिया एवढी addictive असण्याची कारणे आपण neuroscience आणि psychological अशा दोन्ही दृष्टिकोनातून समजून घेऊ. मुळात सर्व सोशल मीडिया ॲप्स/ वेबसाईट कंपन्या यांनी याच बाबींचा विचार करून स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचे प्लॅटफॉर्म खूपच addictive बनवले आहे.

Neuroscience –

माझ्या सुरुवातीच्या लेखात मी dopamine म्हणजेच आपल्या reward hormone बद्दल सविस्तर लिहिले आहे, सोशल मीडियावर काही पोस्ट केल्यानंतर किंवा आपल्या कॉमेंट ला जास्त लाईक्स आले की मेंदू मधील dopamine ची पातळी वाढू लागते आणि आपला मूड देखील चांगला होतो. एवढच नाही तर dopamine चा संबंध आपल्या मेमोरी आणि motivation सोबत सुद्धा असल्याने आपल्या पोस्ट ला जास्त लोकांचे attention मिळावे असे आपल्याला वाटते. जेवढे reaction जास्त तेवढे dopamine जास्त अशाच पद्धतीने मग मेंदू ला त्या गोष्टीची सवय होऊन जाते.

एक मजेशीर प्रयोग आवर्जून सांगेन, एका उंदराला रोज वेगवेगळ्या वेळी जेवण देण्यात आले, कोणतेही schedule न ठेवता अनपेक्षित वेळी त्याला मिळणाऱ्या reward मुळे त्याची dopamine ची पातळी वाढत असे, त्याच प्रमाणे आपण पण जेव्हा सोशल ॲप्स उघडतो तेव्हा अचानक मिळालेले लाईक्स आणि कॉमेंट पाहून आपले देखील dopamine वाढते. असेच अनपेक्षित सरप्राइज मिळतील या आशेने आपण सतत फोन चेक करत असतो.

Psychological –

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, त्याच्या आयुष्यात सामाजिक संबंध जपण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्यासोबत एखादी चांगली घटना झाली की ती सर्वांना सांगणे आपल्याला चांगले वाटते. म्हणूनच आपण सोशल मीडियावर वर पोस्ट करत असतो. पण तिथे देखील शो ऑफ करणारे किंवा चांगले पोस्ट/ फोटो/ व्हिडिओ पाहून आपल्यावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो.

याचबरोबर एक संकल्पना खूप महत्वाची आहे ती म्हणजे sociometer. जे कुणी मानसशास्त्राचे अभ्यासक असतील त्यांना ही संकल्पना माहीत असेलच. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर sociometer म्हणजे आपल्या शरीरातील एक ट्रॅकिंग सिस्टीम जी सतत आपल्याला सांगत असते की समोरचा आपल्या बद्दल काय विचार करतो किंवा तो आपल्याला काय समजतो. उदा. आपण खूप घडी पडलेले कपडे घालून बाहेर गेलो तर बाकी कुणी बोलण्या आधीच आपण स्वतःला judge करत असतो की अरे मी असा गबाळा बाहेर आलो आहे, लोकांना वाटेल की मी कसा बेशिस्त आहे इत्यादी.

सोशल मीडियावर आपल्याला आपले बेस्ट व्हर्जन दाखवायची संधी मिळते त्यामुळे आपली प्रतिमा जपण्यासाठी आपण तिकडे पोस्ट करणे सुरू ठेवतो आणि हळू हळू addict होऊन जातो.

Design –

या क्षेत्राचा अभ्यास मी नुकताच सुरू केला असून हे क्षेत्र आपल्या मानसशास्त्र आणि विचार पद्धतीला खूपच influence करणारे आहे. कोणत्याही सोशल मीडिया ॲप किंवा साईट ची निर्मिती करताना त्यात असे algorithm वापरण्यात येतात ज्याने आपली dopamine पातळी नियंत्रित होते. सतत नवीन कंटेंट आणि आणि असंख्य नवनवीन फिचर्स यामुळे देखील यांचे नावीन्य टिकून राहते आणि आपण स्क्रोल करत राहतो.

मेसेजिंग ॲप्स बद्दल देखील हाच नियम लागू होतो, समजा तुम्ही व्हॉट्सॲप chat करत आहात तर समोरची व्यक्ती टाईप करत आहे हे दिसताच आपण excite होतो, त्याचा मेसेज कधी येणार याची वाट बघतो आणि नकळत आपण तिथे जास्त वेळ देऊ लागतो.

एकूणच कोणतेही ॲप किंवा वेबसाईट बनवताना त्याचे रंग, फिचर्स आणि अल्गोरीथम यांचा विचार देखील मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून देखील केला जातो.

मग यातून बाहेर कसे यावे ?

जसं मी खूपदा सांगतो की यातून बाहेर येणे हे कठीण आहे पण अशक्य अजिबात नाही. काही छोटे छोटे बदल करून आणि यांना देणारा वेळ कमी करून आपण यातून बाहेर पडणे सुखकर करू शकतो. यासाठी पुढील काही पर्याय उपायकारक ठरू शकतात.
✳️ Notification बंद करणे/ do not disturb mode वापरणे.
✳️ Digital wellbeing ॲप वापरणे ज्याने app टाईम ठरवता येईल.
✳️ रात्री झोपताना फोन न वापरणे.

याचसोबत मी digital detox यावर लिहिलेले लेख आपण रिफर करू शकता ज्यात काही मार्ग मी सोप्या पद्धतीने मांडले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*