Overthinking चे स्रोत

Table of Contents

Overthinking किंवा अतिविचार ही फारच त्रासदायक बाब असते, अनेकदा आपल्या आयुष्यातील अनेक तास, अनेक दिवस overthinking मध्ये वाया जात असतात. Overthinking कमी करायची असेल तर तिचा उगम नेमका कसा होतो हे आपल्याला समजणे गरजेचे आहे. आजच्या लेखात overthinking च्या उगमाचे 3 मुख्य स्रोत समजून घेऊ.

आपल्या जवळच्या / प्रिय व्यक्तीसोबत बोलताना त्यांना काय वाटेल ?, आपल्या बोलण्या/ वागण्यामुळे त्यांना त्रास होईल का ? हा विचार सतत मनात येत असेल आणि त्यामुळे overthinking होत असेल तर तुमच्या overthinking चा स्रोत interpersonal relationship असू शकतो, दुसरा स्रोत म्हणजे sense of self. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता, स्वतःला किती सक्षम समजता आणि नकारात्मक विचारांना कसे परतवून लावता यावर तुमचा sense of self अवलंबून असतो. अनेकदा आयुष्याला कलाटणी देणारे निर्णय घेताना होणाऱ्या overthinking साठी sense of self कारणीभूत असतो, तिसरा स्रोत म्हणजे विचित्र शंका आणि विचार, हे विचार किंवा शंका ह्या कोणतेही ठोस कारण नसताना येतात आणि डोक्यात घर करून बसतात. अनेकदा या रात्री किंवा आपण एकांतात असताना येतात.

Interpersonal relationship

आपल्या वागण्याचा आणि बोलण्याचा प्रभाव आपल्या जवळच्या/ प्रिय व्यक्तींवर कसा होतो याचा फार विचार करणारे जर तुम्ही असाल तर तुम्ही सतत तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या बाजूने विचार करत असता, त्यांना नेमके काय हवे आहे, त्यांना आता काय वाटत असेल एकूणच त्यांचा एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असेल हा विचार सतत तुमच्या डोक्यात सुरू असतो, चुकून तुमच्या कडून त्यांना दुखावणारे वर्तन झाले तर तुम्ही लगेच damage control करण्याचा प्रयत्न करता, आपले वागणे कसे चुकले आणि आपला मूळ हेतू काय होता हे समोरच्याला समजावून सांगत असता पण हे करत असताना समोरील व्यक्ती देखील तितकीच भावनिकदृष्ट्या प्रगत (emotionally intelligent) हवी, जर तुम्ही भावनिकदृष्ट्या अनुपलब्ध (emotinally unavailable) व्यक्ती सोबत असे वर्तन केले तर त्यांना ते अयोग्य वाटू लागते आणि तुमची overthinking अजून वाढीस लागते.

भावनिकदृष्ट्या अनुपलब्ध व्यक्ती या अनेकदा अहंभाव घेऊन वावरत असताना, समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याची क्षमता नसल्याने त्यांना आपलाच दृष्टिकोन योग्य वाटत असतो त्यामुळे ते defensive होऊन जातात, त्यामुळे ते एकाच साच्यातून परिस्थिती कडे पाहतात हाच त्यांच्या defensive स्वभाव त्यांना स्वतःच्या चुका समजून घेण्यापासून थांबवत असतो आणि त्यांना आपण victim आहोत आणि समोरची व्यक्ती आपल्याला दाबत आहे असा गैरसमज करून घेण्यास भाग पाडत असतो.

यामुळे जर तुमची प्रिय व्यक्ती भावनिकदृष्ट्या अनुपलब्ध (emotinally unavailable) असेल आणि तुम्ही interpersonal relationship dominant असाल तर तुमच्यात confusion तयार होते. एखाद्या घटनेच्या बाबतीत तुमचे मत आणि तुमच्या प्रिय व्यक्ती चे मत वेगळे ठरते आणि तुम्ही नेमके आपले काय चुकले हा विचार करू लागता. यातूनच कुठेतरी overthinking चा जन्म होतो आणि तुम्ही अनावश्यक त्रासात ओढले जाता. जर तुम्ही देखील अशा परिस्थितीतून जात असाल तर समोरच्या व्यक्ती सोबत चर्चा करून मार्ग काढा किंवा सरळ boundaries ठेवायला सुरुवात करा.

Sense of self संदर्भातील इश्यू

बदल या सृष्टीचा नियम आहे, अनेकदा या बदलांमुळे आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात, नोकरी किंवा शिक्षणानिमित्त शहर बदलणे असेल किंवा लग्न, घटस्फोट असे महत्वाचे निर्णय असतील तेव्हा अचानक आपल्याला भीती वाटू लागते. अनेक वर्ष साचेबद्ध असलेले आयुष्य क्षणात बदलेल आणि तो बदल चांगलाच असेल का? आपण घेतोय तो निर्णय योग्य असेल ना ? असे विचार आपल्या मनात येतात. या आपल्याला विचलित करणाऱ्या विचारात अनेक छोटे छोटे विचार आपल्याला त्रास देऊ लागतात जसे.

  1. मी बरोबर निर्णय घेत आहे ना ?
  2. मी घेतलेला निर्णय पूर्णत्वाला नेण्यास समर्थ आहे ना ?
  3. मला खरंच हे सर्व शक्य आहे का ?
  4. मी जर अपयशी ठरलो/ ठरले तर लोक काय म्हणतील ?

अशा अनेक विचारात आपण स्वतःवर शंका घेऊ लागतो, आपल्या डोक्यात विचारांचे काहूर माजते. पण यावर जास्त विचार करू नये, अनेकदा हे विचार temporary असतात. तुम्ही जसजसे बदल स्वीकारत जाता तसतसे हे विचार कमी होत जातात. निश्चितच याला वेळ द्यावा लागतो पण आपले goal योग्य प्रकारे set केले आणि त्यांचे छोट्या goals मध्ये विभाजन केले तर overthinking सहज कमी होते.

विचित्र शंका आणि विचार

एकांतात असताना किंवा रात्री शांततेत डोक्यात अनेक विचार विचार येत असतात. तुमचा एखादा मोठा अपघात झाला आहे किंवा घरातील पंखा तुमच्या डोक्यात पडला आहे असे वास्तवाशी काहीच संबंध नसलेले विचार तुम्हाला त्रास देऊ लागतात. हे विचार का येत आहेत किंवा हा आपला sixth sense आहे का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि तिथे पुन्हा overthinking सुरू होते.

अनेकदा हे विचार तुमच्या सोबत आधी घडलेल्या घटना (past trauma), तुम्ही पाहिलेले चित्रपट/ वेब सिरीज आणि त्यांच्या तुमच्यावर झालेल्या प्रभाव यावरून येत असतात पण आपण त्यांचा mindfully विचार न केल्याने त्यांचा स्रोत आपल्याला सहज कळून येत नाही. आपण आपल्या trauma किंवा अन्य भीतीदायक घटना कितीही विसरलो असू तरीही आपला मेंदू पूर्णपणे त्या विसरत नाही, आयुष्यात कधीही काहीही होऊ शकते असा अलर्ट देण्यासाठी अनेकदा असे विचार किंवा शंका आपल्याला येत असतात.

यावर उपाय एकच तो म्हणजे आपले विचार switch करणे, जेव्हा असे विचित्र विचार येऊ लागतील तेव्हा दुसरे काहीही काम करायला सुरुवात करा, गाणी ऐका किंवा तुमची आवडती मूव्ही पहा. अनेकदा distraction मुळे देखील हे विचार कमी होऊ लागतात. अश्या वेळी तुमचे छंद तुमची मदत करतात. त्यामुळे आपला छंद जोपासणे कधीही सोडू नका. जर तुम्हाला असे विचार सतत येत असतील तर तुम्ही रोज झोपण्याआधी 15 मिनिट मंडला आर्ट करू शकता, या कला प्रकारात आपले लक्ष केंद्रित करावे लागल्याने बाकीचे विचार थोड्या वेळासाठी बाजूला होतात.

Overthinking ची कारणे ही खूपच वैयक्तिक असतात, परंतु बहुतांश वेळा वरील पैकी कोणतेही एक कारण त्याच्या मुळाशी असते. त्यामुळे आपले कारण समजून घ्या आणि त्यावर योग्य त्या उपाययोजना करायला सुरुवात करा. स्वतःला सतत समजावत राहा की All is well !

2 thoughts on “Overthinking चे स्रोत”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*