नात्यातील कॉमन चॅलेंजेस

नात्यातील कॉमन चॅलेंजेस

Table of Contents

व्हॅलेंटाईन विक सुरू झाला आणि डोक्यात विचार आला की आजपासून पुढील 7 दिवस लेख हे प्रेम, विशेषतः नातेसंबंध या विषयी लिहावेत. आपण सर्वजण कधी ना कधी प्रेम करतो, एखादे relationship हे आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाणारे असते. आपले आयुष्य हे चॅलेंज चे दुसरे नाव समजले जाते, तर आजच्या लेखात नात्यात येणारे चॅलेंज आणि त्याची संभाव्य कारणे मांडायचा प्रयत्न केला आहे.

एखादी व्यक्ती नाते कसे जोपासेल याचा पाया त्या व्यक्तीच्या बालपणात घातला जातो, पालकांनी दिलेली वागणूक, घेतलेली काळजी, घरचे वातावरण आणि भावनिक तसेच सामाजिक विकास आणि त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम त्याचसोबत व्यक्तीची मानसिकता यावरून व्यक्ती नाते कसे सांभाळेल हे ठरते. यात व्यक्तीला आलेले अनुभव देखील मोठा भाग असतो.

Committed नात्यात असताना खालील प्रश्न / घटक अनेकदा आपल्याला स्पष्ट होत नाहीत, त्यामुळे अशाच काही घटकांवर आज आपण विचार करणार आहोत.

✳️ नात्यातील लवचिकता

बदल हा जगाचा नियम आहे, काळानुरूप व्यक्तींमध्ये बदल होत जातात पण नात्यात एक व्यक्ती मध्ये बदल झाला तर दुसऱ्या व्यक्तीला पहिल्या सोबत adopt व्हावे लागते. जर हे adoption सहज आणि चांगल्या पद्धतीने झाले आणि व्यक्ती मध्ये बदल होऊ शकतो हे स्वीकारले तर लवचिकता हा गुण वापरून नाते सहज टिकते.

✳️ नात्यात अंतर कोणत्या घटकांमुळे येऊ शकते ?

नात्यावर भाष्य करणारी एक थिअरी – Relationship turbulence theory नुसार सतत होणारी jealousy, एकमेकांच्या ध्येयात सपोर्ट न करणे, बंद झालेला संवाद, खोटे बोलणे/ लपवणे, कठीण विषय वारंवार टाळणे आणि प्रत्येक गोष्टीचे आरोप वैयक्तिक घेणे हे घटक नात्यात अंतर निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतात.

✳️ अनेक चॅलेंज येऊन पण काही नाती का टिकतात ?

नाते टिकण्यासाठी सर्वात आधी आवश्यकता असते ती इच्छाशक्ती ची. कोणतीही परिस्थिती आली तरी आपल्याला वेगळे व्हायचे नाहीये तर अडचणीवर मात करायची आहे असा विचार करून पाऊले पुढे टाकली की आपोआप नाते दृढ होते. आपल्या चुका स्वीकारून त्यावर काम केले की मग नाते टिकते.

✳️ नात्यात एक व्यक्ती जास्त कमावणारा / हुशार असेल तर नाते कमकुवत होते का ?

नाते हे आपल्याला पूर्ण करणारे असते, त्यामुळे वेळोवेळी एकमेकांची मदत घेऊन स्वतःचा विकास करायचे ठरवले की मग संवाद सुरू राहतो आणि नाते अजून घट्ट होऊ लागते. मग त्यात दोंघांमध्ये असणारे वेगळे घटक अजिबात महत्वाचे ठरत नाहीत.

✳️ jealousy कमी करता येते का ?

हो, नक्कीच jealousy एक चुकीची आणि अतिशय वाईट भावना आहे, तिच्यामुळे राग, संताप, स्वतःवर आणि पार्टनर वर अविश्वास असे अनेक चुकीचे परिणाम होतात. पण ही भावना प्रत्येक नात्यात आढळते त्यामुळे जेव्हा jealousy ची भावना निर्माण होईल तेव्हा नात्याला नेमका कशा पासून धोका आहे किंवा कमिटमेंट इश्यू आहेत का यावर लक्ष केंद्रित करावे.

कोणतेही नाते टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी समान मेहनत घ्यावी लागते, नाहीतर एक व्यक्ती कायम प्रयत्न करते आणि एक फक्त स्वतःला किंवा दुसऱ्याला दोष देते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*