विजयाच्या पलिकडले मानसशास्त्र: महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल

Table of Contents

🏆 विजयी वीरांगनांचे अभिनंदन 🏅

  • दिव्या देशमुख – FIDE Women’s World Cup 2025 विजेतेपद मिळवून rapid tiebreak मध्ये कोनेरू हम्पी यांच्यावर मात करत भारताची पहिली महिला विजेता आणि चौथी भारतीय महिला Grandmaster बनली.
  • कोनेरू हम्पी – FIDE Women’s World Cup 2025 World Cup मध्ये रनर‑अप
  • हरिका द्रोणावली व आर. वैषाली – FIDE Women’s World Cup 2025 मध्ये टॉप ८ मध्ये स्थान प्राप्त केले.
  • हर्मनप्रीत कौर – इंग्लंड दौऱ्यात शतकीय कामगिरीने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
  • श्रेयसी जोशी – रोलर स्केटिंग (Classic Slalom) मध्ये आशियाई सुवर्णपदक विजेती
  • रंजीता कोरेटी – Asian Cadet Judo Championship 2025 मध्ये 52 kg वर्गात सुवर्ण मिळवून छत्तीसगड व भारताचा अभिमान वाढविला.

या सर्व वीरांगनांनी केवळ विजय मिळवले नाहीत, तर त्यांनी संपूर्ण देशातील मुलींना, महिलांना आणि समाजालाही एक संदेश दिला — ‘जेव्हा संधी आणि मानसिक बळ एकत्र येतात, तेव्हा कोणतीही मर्यादा यशाच्या वाटेत येत नाही.’“”

या सर्व यशस्वी महिला खेळाडूंना ‘अभिव्यक्ति’ परिवाराकडून मनःपूर्वक सलाम आणि अभिनंदन.

या गौरवशाली पार्श्वभूमीवर आता आपण समजून घेऊया की हे क्रीडा क्षेत्रातील विजय केवळ पदकांपुरते मर्यादित न राहता ते महिलांच्या मानसिक सक्षमीकरणाला कसे बळकटी देतात

आत्मसन्मान आणि आत्ममूल्याची वृद्धी (Self-Esteem and Self-Worth)

Albert Bandura च्या Self-Efficacy सिद्धांतानुसार व्यक्तीच्या आत्मविश्वासाचा संबंध तिच्या कृतीच्या यशाशी असतो. खेळात मिळणाऱ्या संधी, प्रशिक्षण, आणि यश यामुळे महिलांमध्ये “मी देखील हे करू शकते” ही भावना निर्माण होते. यामुळे:

  • आत्मसन्मान वाढतो
  • आत्ममूल्याची जाणीव होते
  • Decision-making skills मध्ये सुधारणा होते

खेळातील सहभाग हे केवळ शारीरिक फिटनेस नव्हे तर मानसिक बळही देतो.

सामाजिक ओळख व भूमिकांची पुनर्रचना (Social Identity & Role Redefinition)

Tajfel आणि Turner च्या Social Identity Theory नुसार, व्यक्तीची ओळख तिच्या गटांशी निगडित असते. खेळामध्ये महिलांनी मिळवलेल्या विजयामुळे “महिला = समर्थ खेळाडू” ही नवीन सामाजिक प्रतिमा तयार होते.

हे परिवर्तन तीन पातळ्यांवर होते:

  • व्यक्तिगत स्तरावर: ‘मी क्रीडापटू आहे’ ही सकारात्मक ओळख
  • कौटुंबिक स्तरावर: पालकांच्या आणि कुटुंबियांच्या अपेक्षांमध्ये बदल
  • सामाजिक स्तरावर: मीडिया, संस्था, सरकार यांच्याकडून अधिक संधी

ग्रोथ माइंडसेट आणि ध्येयकेंद्री व्यक्तिमत्त्व (Growth Mindset & Goal-Orientation)

Dr. Carol Dweck च्या Growth Mindset सिद्धांतानुसार, प्रयत्नांमुळे क्षमता वाढते असा विश्वास असलेली व्यक्ती सातत्याने प्रगती करते. खेळात महिला प्रयत्न करतात, शिकतात आणि पुन्हा उभ्या राहतात. हा प्रक्रियात्मक अनुभव:

  • त्यांच्या मानसिक लवचिकतेला (Resilience) बळ देतो
  • संघर्षांना सामोरे जाण्याची तयारी करतो
  • यशाच्या व्याख्येत बदल घडवतो

रोल मॉडेलिंग व सामाजिक प्रेरणा (Role Modeling & Social Motivation)

Albert Bandura च्या Observational Learning नुसार, लोक इतरांच्या वर्तनाचे अनुकरण करतात. जेव्हा महिला खेळाडू मोठ्या व्यासपीठांवर यश मिळवतात, तेव्हा इतर महिला,तरुण व शाळकरी मुलींना:

  • प्रेरणा मिळते
  • स्वप्न पाहण्याची हिंमत मिळते
  • कौशल्ये विकसित करण्याची दिशा सापडते

उदाहरणार्थ, पी.व्ही. सिंधू किंवा मिताली राज या खेळाडूंनी अनेकांना बॅडमिंटन व क्रिकेटमध्ये प्रवृत्त केले आहे.

समूहभावना आणि सामूहिक सशक्तीकरण (Collective Empowerment)

Women’s sports success creates a sense of collective pride and shared identity. हे सशक्तीकरण केवळ वैयक्तिक नाही तर सामूहिक आहे. यामुळे:

  • महिला संघटना बळकट होतात
  • धोरणात्मक निर्णयात महिलांचा आवाज वाढतो
  • मुलींना बालपणापासून खेळातील संधी मिळू लागतात

अंतर्गत व बाह्य प्रेरणा (Intrinsic vs Extrinsic Motivation)

Deci आणि Ryan यांच्या Self-Determination Theory नुसार, खेळात महिलांची प्रेरणा दोन गोष्टींमुळे वाढते:

  • अंतर्गत प्रेरणा – विजय, कौशल्य, आनंद
  • बाह्य प्रेरणा – सामाजिक प्रतिष्ठा, पुरस्कार, मान्यता

जेव्हा अंतर्गत प्रेरणा प्रबळ असते तेव्हा महिलांचा आत्मविश्वास अधिक टिकाऊ बनतो.

मानसिक आरोग्य सुधारणा (Mental Health Benefits)

क्रीडा क्षेत्रातील महिलांना स्ट्रेस, चिंता, आणि सामाजिक दबाव यावर मात करण्याची एक नवी वाट सापडते.

नियमित खेळामुळे:

  • Dopamineserotonin चा स्त्राव होतो
  • Depressionanxiety कमी होते
  • जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो

महिलांचा क्रीडा क्षेत्रातला प्रवेश हा केवळ पदकांचा खेळ नाही, तर मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बंध तोडण्याचा प्रवास आहे. मानसिक दृष्टिकोनातून पाहता, खेळ ही महिला सक्षमीकरणाची मूळ प्रेरणा ठरू शकते.

या यशाच्या कहाण्या फक्त वर्तमानपत्रात छापून न राहता, समाजाच्या मानसिकतेत खोलवर रुजायला हव्यात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*