मानसिक स्वास्थ्य – काळाची गरज

Table of Contents

ताप, सर्दी, खोकला असे शारीरिक स्वास्थ्य विषयक आजार जास्त दिवस असतील तर आपण डॉक्टर कडे जातो पण असेच महत्व मानसिक स्वास्थ्य आणि त्यासंबंधित समस्यांना दिले जाते का ? मानसिक आजार अनेकदा तीव्र होई पर्यंत त्याकडे कुणीच लक्ष देत नाही, मानसिक स्वास्थ्य सांभाळणे का गरजेचे आहे हे आज आपण समजून घेऊ.

संपूर्ण स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य चांगले असेल तर आपण उत्साही आणि आनंदी राहू लागतो त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य देखील संतुलित होऊ लागते. स्वस्थ मन कोणत्याही संकटाशी सहज सामना करू शकते इतकेच नव्हे तर विपरीत परिस्थिती मध्ये आपल्यात लवचिकता आणि मार्ग शोधण्याची सकारात्मक विचारसरणी देखील याच मुळे निर्माण होते.

Productivity मध्ये वाढ

आपले मानसिक स्वास्थ्य चांगले असेल तर कोणत्याही कामावर आपण अगदी सहज लक्ष केंद्रित करू शकतो, परिणामी आपली एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढीस लागते. आपण आपले काम आनंदाने करू लागल्याने आपली उत्पादनक्षमता म्हणजेच प्रॉडक्टिविटी वाढते.

ताण तणावाचे योग्य नियोजन

मानसिक स्वास्थ्य ही आपली प्राथमिकता असेल तर आपण आपल्या भावना आणि विचार योग्य प्रकारे समजून घेऊ लागतो, स्वस्थ मन तणावाचे सुयोग्य नियोजन करते त्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले होते.

भावनिक संतुलन

स्वस्थ मन सर्व भावना योग्य प्रकारे समजून घेते आणि भावनांचा उद्रेक न होऊन देता प्रत्येक परिस्थिती मध्ये शांत आणि संयमी मार्ग निवडून संतुलित प्रतिक्रिया देते ज्यामुळे वाद कमी होऊन संवाद होतात, संवेदना आणि सहवेदना जागृत होतात परिणामी नातेसंबंध चांगले राहतात.

स्वतःची ओळख

मानसिक स्वास्थ्य जर प्राथमिकता असेल तर स्वतःच्या क्षमता, भावना, विचार या सर्वांना व्यक्ती स्वीकारते आणि त्यामुळे स्वतःची खरी ओळख होते. सेल्फ esteem आणि आत्मविश्वास वाढीस लागतो. भावना आणि विचार यांची सुयोग्य ओळख झाल्याने लवचिकता वाढते, परिस्थितीचा सामना करताना योग्य मार्ग निवडणे सोपे होते.

निर्णय क्षमता विकास

मानसिक आरोग्य ठीक असेल तर निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करणे सहज शक्य होते, सर्व शक्यता पडताळून सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घेतल्याने यश मिळण्याची शक्यता वाढते, अपयश आल्यास त्याची जबाबदारी देखील सहज स्वीकारता येते, त्यामुळे नैराश्य येण्याची शक्यता कमी होत जाते.

झोपेची गुणवत्ता सुधारते

मानसिक स्वास्थ्य ही प्राथमिकता ठेवल्यास आपल्या झोपेवर देखील त्याचा सकारात्मक परिणाम होतो, मनाला योग्य आराम मिळाल्याने त्याची कार्यक्षमता सुधारते आणि शारीरिक स्वास्थ्य देखील चांगले राहते.

एकूणच आपले मानसिक स्वास्थ्य चांगले असेल तर आपल्या जीवनाची सर्वांगीण प्रगती होते, आणि जीवनाची गुणवत्ता देखील सुधारते. एक समाधानी आयुष्य जगण्यासाठी आपण मानसिक स्वास्थ सुदृढ ठेवणे फारच गरजेचे ठरते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*