Ideal age to have a baby.

Ideal age to have a baby.

Table of Contents

Post marriage counseling मध्ये अनेकदा स्त्रियांकडून हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आम्ही बाळासाठी प्लॅन कधी करावा ? खरेतर हा खूपच खाजगी विषय आहे आणि या बाबतीत अनेक लोकांचे वेगवेगळे विचार आहेत. उदा. स्त्री आई होण्यासाठी शारीरिक आणि मानसकदृष्ट्या तयार असेल तेव्हा, आई वडील दोघे बाळाची काळजी घ्यायला financially stable असतील तेव्हा किंवा दोन्ही पालकांचे करियर सेट होईल तेव्हा. त्यामुळे गेल्या दशकात स्त्रिया साधारण 28 – 35 या कालावधीत अपत्याचे नियोजन करतात असे दिसून आले आहे. आजच्या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊ.

बाळ होण्यासाठी कोणतेही फिक्स वय नाही, स्त्रिया साधारण पौगंड अवस्थेपासून म्हणजेच मासिक पाळी सुरू झाल्यापासून ते menopause पर्यंत बाळाला जन्म देऊ शकतात, तर पुरुषांमध्ये शुक्राणू हे वयाच्या 60 ते 65 वर्षांपर्यंत तयार होत असतात. पण शिक्षण आणि करियर, financial growth / stability आणि वैयक्तिक निर्णय अशा अनेक गोष्टींचा या निर्णयावर प्रभाव असतो.

आज ह्या लेखात आपण पुढील दृष्टिकोनातून हा विषय समजावून घेऊ :
✳️ शारीरिक
✳️ मानसिक
✳️ आर्थिक

शारीरिक

स्त्री आणि पुरुष दोन्ही पौगंड अवस्थेत ( teen age) असताना त्यांच्या शरीरात सेक्स हार्मोन तयार होऊ लागतात आणि साधारण 20- 21 या वयात ते प्रजनन योग्य होतात.

अर्भक अवस्थेत असताना स्त्री मध्ये साधारण 60 ते 70 लक्ष बीजांडे असतात, जन्माच्या वेळी ती 10 लक्ष होतात तर पौडांग अवस्थेत येई पर्यंत तोच आकडा 3 लक्ष होतो, त्यातील साधारण 300 ते 400 ovulation प्रोसेस मधून जातात . मासिक पाळी सुरू झाल्या पासून प्रत्येक सायकल मध्ये 1 बीजांड असे ovulation होते. परंतु जसे जसे वय वाढते तसे बीजांडांची संख्या घटते आणि क्वालिटी देखील कमी होते त्यामुळे वय वाढलेल्या स्त्रियांमध्ये fertility कमी होते.

पुरुषांमध्ये fertility साठी निश्चित वय नसले तरीही वयानुसार शुक्राणू ची क्वालिटी कमी होते, साधारण 55 नंतर स्पर्म/ शुक्राणू यांची क्वालिटी कमी झाल्याने त्यांचा fertility दर कमी होतो.

वय हा एकच घटक यासाठी कारणीभूत नसून अनेक आजार देखील यासाठी कारणीभूत असतात.

स्वतःची योग्य काळजी न घेणे, कमी वजन, व्यसन, मद्यपान असे घटक तसेच polycystic ovary syndrome (PCOS) आणि endometriosis हे आजार देखील स्त्रियांमधील प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात.

आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम आहोत की नाही हे समजण्यासाठी स्वतःला विचारायचे प्रश्न
1. माझ्या वयात गर्भधारणेत काय अडचणी येऊ शकतात ?
2. एक दोन वर्ष थांबून बाळाचा विचार केल्यास काय अडचणी येऊ शकतात ?
3. माझ्या कोणत्या सवयी किंवा आजार प्रेगनेन्सी साठी हानिकारक आहेत, आणि त्यासाठी मी काय करायला हवे ?

साधारण वयाच्या 30 नंतर बाळ झाल्यास स्त्रियांना पुढील गोष्टी होण्याचे चान्स जास्त असतात.
✳️ ब्रेस्ट कॅन्सर
✳️ Abnormal child
✳️ गर्भपात / miscarriage
✳️ जनुकीय आजार

मानसिक

मानसिकदृष्ट्या आपण बाळासाठी तयार आहोत की नाही हे वाटण्याचे वय वेगवेगळे असते, काही जोडप्यांना ते 20- 22 या वयात वाटू शकते तर काहींना 28- 30 या वयात.

परिवारात बाळ आल्यानंतर आपल्यात भावनात्मक आणि मानसिक बदल होतात जसे
✳️ संयम
✳️ नियोजन (Planning)
✳️ सहानुभूती
✳️ मदत मागण्याची भावना
✳️ लवचिकता

हे सर्व बदल आपण आनंदाने स्वीकारू शकतो असा आपला निश्चय हवा.

अनेक रिसर्च नुसार व्यक्तीचा मेंदू 25व्या वर्षांपर्यंत पूर्ण विकसित होतो, त्यामुळे अनेक लोक 25 नंतर बाळाचे नियोजन करतात.

आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम आहोत की नाही हे समजण्यासाठी स्वतःला विचारायचे प्रश्न
1. मी बाळाची योग्य काळजी घेऊ शकेन की नाही ?
2. मी माझी लाईफस्टाईल बदलायला तयार आहे का ?
3. मी माझ्यासाठी ठरवलेले गोल थोडे compromise करू शकतो का ?
4. बाळ मोठे होताना मला माझे आयुष्य कसे हवे आहे ?
5. बाळाचे नियोजन करण्यापूर्वी मी कोणत्या गोष्टी पूर्ण करायला हव्या ?

आर्थिक

आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो म्हणजेच सामान्य भाषेत financially stable / set झालो की मग आपण बाळाचा विचार करू असे अनेकांचे मत असते. यात एक छान नोकरी, स्वतःचे घर किंवा प्रॉपर्टी यांचा अंतर्भाव असतो.

घराच्या वाढत्या किमती आणि मनासारखी नोकरी न मिळणे यांमुळे अनेक लोक struggle करत असतात. आपल्या अनेक महत्वाकांक्षा पूर्ण करून मग आपण अपत्याचा विचार करू असे मत असल्यामुळे हा विचार अधिक लांबणीवर जातो.

आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत की नाही हे समजण्यासाठी स्वतःला विचारायचे प्रश्न
1. बाळा मुळे माझ्या नोकरीवर किंवा शिक्षणावर काय परिमाण होईल ?
2. बाळाचे संगोपन करण्यासाठी लागणारा मासिक खर्च अंदाजे किती असेल ? आपण तो manage करू शकतो का ?
3. आपण आता सक्षम नसलो तर साधारण किती वेळ आपल्याला सक्षम होण्यासाठी हवा आहे ?

याचसोबत एक घटक जो एक समुपदेशक म्हणून मुद्दाम आज इथे मांडतो.

स्त्रियांनी हा विषय खूप विचारपूर्वक समजून घेणे गरचेचे आहे. बाळाचा विचार करताना तुमची menopause ची वेळ देखील लक्षात घ्या. साधारण 45 – 50 याकाळात पाळी येण्याची थांबते त्या वेळात मूड स्विंग खूप जास्त प्रमाणांत असतात, खूप जास्त राग येणे किंवा चिडचिड होणे हे रोजचे झालेले असते. जर या काळात तुमचे अपत्य पौडांग अवस्थेत असेल तर तो सॉफ्ट टार्गेट होतो, सगळा राग आणि चिडचिड कारण नसताना त्यावर काढली जाते. त्यामुळे अचानक ती मुले शांत होतात, त्यांनाही समजत नाही की त्यांच्यासोबत काय आणि का होत आहे. त्यामुळे तुमचे आणि तुमच्या मुलांचे नाते खराब होऊ शकते.

हल्ली चुकीची जीवनपद्धती मुळे early menopause चे प्रमाण वाढत चालले आहे, 38 ते 40 वयात देखील पाळी बंद होते त्यामुळे तुम्हाला आणि परिणामी मुलांना देखील खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा देखील मुद्दा लक्षात घ्यावा.

Early menopause साठी जबाबदार काही घटक –
✳️ ज्या स्त्रियांना मासिक पाळी लवकर सुरू होते, त्यांच्यात ती लवकर थांबायची शक्यता जास्त असते.
✳️ जास्त प्रमाणत स्मोकींग / धूम्रपान केल्यामुळे estrogen ची पातळी कमी होणे.
✳️ योग्य वजन नसणे – BMI नुसार योग्य इंडेक्स असणे आवश्यक आहे.
✳️ Turner सिंड्रोम हा एक क्रोमोसोम संबंधित विकार आहे ज्याने ओवरिज नीट काम करत नाहीत.
✳️ थायरॉईड सारखे ऑटो इम्यून आजार.
✳️ फिट येणे इत्यादी
असे काही आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळासाठी नियोजन करावे.

बाळाचा निर्णय हा नेहमीच त्याचा आई आणि वडिलांचा असावा. फॅमिली किंवा peer प्रेशर मुळे तो घेतला जाऊ नये, तसेच निर्णय घेताना वरील तिन्ही घटकांचा योग्य विचार करून तो घेण्यात यावा. कधीही तुम्ही तिन्ही घटकात परिपूर्ण असणार नाही, परंतु 70% हून जास्त सकारात्मक गोष्टी असल्यास तुम्ही सहज हा विचार करू शकता.

परिवारात कलह असतील तर अनेकदा असे बोलले जाते की एखादे मुल झाले की मग भांडण संपतील तर असे गैरसमज करून घेऊन कोणतेही निर्णय घेऊ नयेत. जर लग्नाआधी HIV टेस्ट केली नसेल तर ती नियोजनाच्या आधी करून घ्यावी. कुठेही अडचण आल्यास किंवा कन्फुजन असल्यास समुपदेशकांना भेटावे.

माझ्या वैयक्तिक मता प्रमाणे साधारण 25 ते 28 हे वय स्त्रियांसाठी तर 25 – 30 हे पुरुषांसाठी योग्य वय आहे. परंतु हे दोघांच्या संमतीने व्हावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*