मेंदू आणि हृदयाच्या रेशीमगाठी

मेंदू आणि हृदयाच्या रेशीमगाठी 

Table of Contents

प्रिय हृदय,
डावी बाजू,
छातीचा पिंजरा
माझे शरीर

विषय – आपल्या कामाशी काम ठेवणे बाबत.

माननीय अवयव,

आपले काम रक्ताभिसरण असून कृपया आपण फक्त तेव्हढेच करावे, उगाचच भावना आणि प्रेम वगैरे प्रकारात नाक खुपसून स्वतःला आणि पर्यायी मला त्रास देऊ नये.

ही विनंती वजा धमकी आपण मान्य कराल हि आशा.

आपला नम्र
अकब

✳️✳️✳️

हृदय आपल्या शरीरातील एक मुख्य अवयव आहे, रक्ताभिसरण करणे हे त्याचे मुख्य काम पण आपण नेहमीच या अवयवाला भावनांशी जोडतो. राग आला की ब्लड प्रेशर वाढणे, चिंता वाटू लागली की हृदयाचे ठोके वाढणे, कुणाच्या प्रेमात पडलो की ” हृदयात वाजे समथिंग” विरह असेल तर ” ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं” अशी अनेक गाणी आपल्याला ऐकू येतात. प्रिय व्यक्तीचे निधन झाले मी छातीत कळ येणे अशा अनेक गोष्टी आपण ऐकून असतो. अती चिंता किंवा निराशा असेल तर हृदयाचे ठोके देखील वाढतात.

चला जाणून घेऊ मेंदू आणि हृदयाच्या रेशीमगाठी बद्दल

आपल्यापैकी अनेक लोकांचा समज असतो की मेंदू आणि हृदय हे शरीराच्या वेगवेगळ्या भागात आहेत, त्यांची कामे वेगवेगळी आहेत आणि हृदयाचे काम हे involuntary असते त्यामुळे दोघांचे काही घनिष्ठ नाते नाही, पण मेंदू आणि हृदय यांचे नाते फारच गुंतागुंतीचे आहे. जेव्हा आपल्या नकारात्मक भावना मेंदू वर विपरीत परिणाम करतात तेव्हा त्यांच्या परिमाण हृदयावर देखील होतो.

मी पूर्वीच्या लेखात सांगितले की स्ट्रेस चे दोन प्रकार असतात एक helpful stress आणि एक unhelpful stress, helpful stress आपल्याकडून अनेक कामे योग्य वेळी करून घेतो, आपल्याला फोकस करायला मदत करतो पण unhelpful stress किंवा distress थकवा, निराशा आणि हृदयरोग अशा धोकादायक आजारांना आमंत्रण देतो.

स्ट्रेस मुळे आपल्या शरीरात नकारात्मक प्रक्रिया सुरू होतात. राग, चिंता, भीती, डिप्रेशन, निराशा अशा भावना आपल्या शरीरातील parasympathetic nervous system ला जागृत करतात, आणि शरीर त्या वेळी स्ट्रेस हार्मोन ची निर्मिती करते. परिणामी cortisol आणि adrenaline ची निर्मिती होऊन ते रक्तात मिसळले जाते. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्त दाब/ ब्लड प्रेशर वाढते. आपल्या शरीराची फाईट or फ्लाईट मोड सुरू होतो आणि त्यानुसार शरीर काम करते.

अती प्रमाणात स्ट्रेस, चिंता, grief, अती राग आणि मानसिक धक्क्यामुळे Broken Heart Syndrome नावाचा आजार होऊ शकतो. कारण या भावनांमुळे अती प्रमाणात adrenaline आणि noradrenaline निर्माण होतात, यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होतात, हे हार्मोन हृदयाच्या पेशींना चिकटून कॅल्शियम deposit करतात त्यामुळे हृदयाचे ठोके नीट होत नाहीत. परंतु हो स्थिती नियंत्रणात आणता येते आणि हृदय पुन्हा व्यवस्थित काम करू लागते. या आजारासाठी अनेक शारीरिक घटक देखील जबाबदार असू शकतात.

प्रेम आणि हृदय यांचा संबंध देखील फार जवळचा आहे कारण प्रेमाची भावना ही आपला स्ट्रेस कमी करत असते. प्रियकर/ प्रेयसी, मैत्री इतकेच नव्हे तर आपल्या पाळीव प्राणी यांसोबत वेळ घालवला की आपली स्ट्रेस लेवल कमी होते कारण मेंदू oxytocin आणि dopamine हे दोन स्ट्रेस कमी करणारे hormone निर्माण करतो. आपल्यासोबत कुणीतरी आहे या विचाराने आपले मन खंबीर होते आणि anxiety देखील कमी होते. प्रेमात आपण पार्टनर ची आणि स्वतःची काळजी घेतो त्यामुळे स्वास्थ्य उत्तम राहते. स्ट्रेस कमी झाल्याने हृदयाचे स्वास्थ चांगले राहते.

थोडक्यात आपल्या भावनांमुळे शरीरात वेगवेगळे hormone स्त्रवतात आणि त्यानुसार बाकीचे अवयव काम करतात, पण पूर्वी हार्मोन आणि मेंदू यांच्यात होणारा बदल बाहेरून समजून येत नसे आणि त्यावर संशोधन देखील झाले नव्हते तेव्हा शरीरात होणारे बदल हे रक्त दाब आणि हृदयाचे ठोके यावरून सहज समजले जायचे, त्यामुळे हृदय आपल्या भावना नियंत्रित करते असा समज झाला असावा.

आपल्या मेंदू मध्ये होणारे बदल सर्वात आधी हृदय परावर्तित करते त्यामुळे यांचे नाते किती खोल असेल हा अंदाज सर्वांना आला असेलच.

आपल्या हृदयाचे स्वास्थ ठीक राहण्यासाठी मानसिक स्वास्थ्य संतुलित असणे गरजेचे आहे याच शोधामुळे Cardiac Psychology ही उपशाखा निर्माण झाली असून, संमिश्र उपचाराने अनेक रुग्ण हृदयरोगावर मात करीत आहेत. भारतात देखील या बद्दल awareness वाढत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*