कुणालाही माफ करणे हे सोपे नसते, पण आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की माफ करणे हे पुण्याचे काम आहे, सुखी आयुष्य जगण्यासाठी दुसऱ्यांना माफ करणे नेहमीच चांगले असते. समाजात माफी बद्दल अनेक गैरसमज आढळून येतात. माफ कुणाला करावे ? कोणत्या परिस्थिती मध्ये करावे आणि कधी करावे ? हे आजच्या लेखात पाहू.
✳️ माफ करणे ही बहुस्तरिय प्रक्रिया आहे.
आपण अगदी सहज कुणालाच माफ करत नाही, कधी कधी माफी साठी वर्ष देखील लागू शकते. समोरच्याने आपल्याला किती प्रमाणात दुखावले आहे यावर त्याला आपण कधी माफ करणार हे ठरत असते. असेच पुढे जाताना जेव्हा दुःख हळू हळू कमी होते आणि एक दिवशी जेव्हा त्या दुःखाचे ओझे आपल्याला वाटत नाही तेव्हा आपण समोरच्याला मनापासून माफ करतो. ती घटना आपल्यासोबत झालीच नाही असे आपल्याला वाटू लागते.
✳️ माफ करावे की नाही हा वैयक्तिक निर्णय आहे.
तुम्ही एखाद्याला माफ केलेच पाहिजे असे कुणी म्हणा असेल, शिकवत असेल तर तर ते चुकीचे आहे असे ग्राह्य धरावे. कुणीतरी सांगत आहे म्हणून दुसऱ्याला अजिबात माफ करू नका. किती वेळ घ्यायचा आणि कधी माफ करायचे हे पूर्णपणे आपल्या मनावर ठरवावे. त्यासाठी आपण ठाम असणे गरजेचे असते.
✳️ व्यक्तीला माफ करणे म्हणजे त्याची चूक स्वीकारणे नसते.
जेव्हा आपण कुणाला माफ करतो तेव्हा आपण त्याची चूक माफ करत नाही, चूक ती चूकच असते. त्यामुळे माफ केले तरी त्यांनी केलेली चुकीची गोष्ट योग्य होत नाही. माफ करणे म्हणजे भविष्यात ही चूक पुन्हा होणार नाही अशी आशा करणे असते.
✳️ नेहमीच माफ केले पाहिजे असे नाही.
अनेकदा लोक धर्माचे किंवा देवाचे दाखले देऊन माफ करणे कसे योग्य आहे ते पटवून सांगतात. पण वर सांगितल्या प्रमाणे माफ करण्यासाठी कुणीच प्रेशर देऊ शकत नाही. खूप वेळ प्रयत्न करून पण माफ करावे वाटत नसेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला माफ नाही केले तरी चालेल. त्यामुळे तुम्हाला कुणी judge करत असेल, नाव ठेवत असेल तर तो तुमचा प्रोब्लेम नाही.
✳️ माफ करून जर तुम्हाला वाईट वाटणार असेल तर तिथेच थांबणे योग्य असते.
जर कुणाच्या प्रेशर मुळे आपण एखाद्या व्यक्तीला माफ करायचा निर्णय घेतला असेल आणि त्यामुळे आपल्याला सतत दडपण येत असेल किंवा चुकीचे वाटत असेल तर तेव्हाच माफ करण्याच्या निर्णय रद्द करावा. जर कुणाला माफ करून आपला self respect कमी होणार असेल तर तसे अजिबात करू नये. पण ego मुळे माफ करणे टाळू देखील नये.
✳️ थर्ड पार्टी ची मते विचारात घ्या.
एखाद्या पेच प्रसंगात असताना किंवा जवळच्या व्यक्तीच्या चुका माफ करताना अनेकदा confusion असते. आपले नातेवाईक किंवा मित्र हे कुणा एकाची बाजू घेत असतात अश्यावेळी तिसऱ्या व्यक्तीला (जो कुणाला ओळखत नाही) सर्व माहिती द्यावी आणि त्याचा सल्ला देखील घ्यावा. पण तिसरी व्यक्ती देखील योग्य असायला हवी.
✳️ माफ केले की झालेली चूक सतत बोलून दाखवणे टाळा.
तुम्ही कुणाला माफ केले की त्याची चूक पुन्हा पुन्हा उरकून काढणे टाळा. जर तुम्हाला त्याची चूक अजूनही त्रास देत आहे तर तुम्ही पूर्णपणे त्या व्यक्तीला माफ केले नाही हे लक्षात घ्यावे. अश्यावेळी लागल्यास माफ करण्यासाठी पुरेसा वेळ घ्या.
✳️ माफी साठी ब्लॅकमेल करत असतील तर ते सहन करू नका.
जर कुणी माफी मागताना तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल. उदा. तू माफ केले नाही तर मी स्वतःला संपवून घेईन वगैरे तर तिथे त्या व्यक्तीला योग्य प्रकारे सांगा पण त्या प्रेशर मध्ये माफ केले असे बोलून जाऊ नका.
✳️ सॉरी आणि it’s ok यांचा योग्य वापर करा.
सॉरी किंवा it’s ओके हे शब्द नसून भावना आहेत. सॉरी बोलणे हे सोपे आहे पण मनापासून सॉरी फील करणे कठीण आहे त्यामुळे चूक समजली नाही तोवर सॉरी बोलू नका आणि पूर्ण माफ करता येत नाही तोवर it’s ओके बोलू नका. शब्दामुळे समोरच्याचा गैरसमज होऊ शकतो.
माफ करणे हे केव्हाही चांगले पण ते मनापासून असेल तरच त्रास होत नाही. अन्यथा माफ केले तरी मनात अनेक गोष्टी सलत राहतात.



