भावनिक संसर्ग

भावनिक संसर्ग 

Table of Contents

मित्रांसोबत छान भुताचा चित्रपट बघायला गेलो आहोत, खूपच भीतीदायक सीन सुरू आहे, अश्यावेळी अनेकदा आपले लक्ष स्क्रीन कडे कमी आणि आपल्या मित्रांकडे जास्त असते. त्यांचे हावभाव कसे आहेत हे टिपण्यात आपण व्यस्त असतो. असे का होत असेल ? चित्रपट बघण्यापेक्षा आपले लक्ष दुसऱ्यांच्या एक्स्प्रेशन कडे का असते ? या प्रक्रियेला भावनिक संसर्ग असे म्हणतात.

आपला चेहरा, आवाजाचा टोन आणि शरीर हे कोणत्याही शब्दाविना आपल्या भावना व्यक्त करत असतात, चेहऱ्यावरील स्मित हास्य हे आपण खुश असल्याचे दर्शवत असते. अनेक शारीरिक हालचाली जसे खांदे डाऊन करणे हे निराश असल्याचे तर शांतपणे आणि हळू हळू बोलणे हे दुःखाचे दर्शक असतात. याच शारीरिक हालचालींना आपण बॉडी लँग्वेज म्हणतो.

गेल्या वर्षी काही लोकांना घेऊन एक प्रयोग करण्यात आला होता, समाजातील अनेक लोकांना एका ठिकाणी बोलवून त्यांचे मानसिक अवलोकन करण्यात आले.

पहिल्या दिवशी सगळ्यांचे अवलोकन त्यांच्या भावना एक्स्प्रेस करण्याच्या पद्धतीवर करण्यात आले, ते कोणतेही शब्द न वापरता फक्त बॉडी लँग्वेज वापरून भावना कशा व्यक्त करतात हे नीट पाहिले गेले, सगळ्यांचे वर्गीकरण 3 ग्रुप मध्ये केले आणि प्रत्येक ग्रुप मध्ये 1 खूप जास्त भावना एक्स्प्रेस करणारा, 1 मध्यम आणि 1 अतिशय कमी व्यक्त होणारा असे सदस्य नेमले गेले.

नंतर प्रत्येक टीम ला 10 मिनिट एका शांत रूम मध्ये बसायला सांगितले आणि तिथे कुणालाच बोलायची परवानगी नव्हती, मग जे आपल्या भावना व्यक्त करण्यात अग्रेसर होते ते त्यांच्या हावभावाने आणि चेहऱ्यावरील भावनेने बाकी लोकांचे लक्ष वेधून घेत होते ते खुश होते. बाकी दोघे जे तुलनेत कमी व्यक्त होणारे आहेत ते एकदम शांत बसून होते आणि त्यांचे लक्ष जास्त भावना व्यक्त करणाऱ्या व्यक्ती कडे जात होते, थोड्याच वेळात खूप जास्त भावना एक्स्प्रेस करणारा व्यक्ती आकर्षणाचा केंद्र बिंदू झाला आणि थोड्याच वेळात बाकी दोघं पण त्याच्या भावनांशी जुळवून घेऊ लागले आणि त्यांचा मूड देखील चंगला  झाला. अशा प्रकारे ज्याची बॉडी लँग्वेज जास्त व्यक्त होणारी होती त्याने दुसऱ्यांना देखील infect केले.

वरील प्रयोग होण्यापूर्वी देखील आपल्याला अनेक उदाहरणे आढळतात, गर्दी मध्ये कुणी साप साप असे ओरडुन एकदम भीती ने व्यक्त झाला तर सगळे कोणतीही शहानिशा न करता तिथे गोंधळ करतात आणि जीव वाचवायला पाळायला लागतात. हा shared emotion चा भाग आहे.

आपण देखील जर आपल्या बाजूला बघितले तर सहज कळेल की ज्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज खूपच expressive असते तेव्हा तिच्या मूड चा प्रभाव अन्य लोकांवर होत असतो. जसे आपण मीटिंग मध्ये आहोत आणि कुणी छान motivation देत असेल तर आपल्याला तात्पुरते खूपच motivated वाटते.

उत्तम वक्ते किंवा हल्लीचे motivational स्पीकर हे त्यांची बॉडी लँग्वेज इतक्या प्रभावी प्रकारे वापरतात की समोरचा लगेच प्रभावित होतो. उत्तम राजकारणी देखील याचाच वापर करून आपल्याला त्यांचे मत योग्य आहे हे पटवून देतात.

त्यामुळे जेव्हा आपल्याला खूप उदास किंवा नाराज वाटत असेल तेव्हा ज्यांची बॉडी लँग्वेज खूप जास्त expressive आहे आणि जे सतत खुश असतात अशांच्या सहवासात राहणे किंवा खूप जास्त expressive चित्रपट बघणे फायद्याचे ठरते.

पण भावनिक संसर्ग ही गोष्ट नेहमीच सकारात्मक असेल असे नाही, अतिशय उदास असणारी व्यक्ती जर highly expressive असेल वेळ आपल्याला देखील त्या भावनेचा संसर्ग होऊ शकतो अशावेळी आपण स्वतःला समजावणे गरजेचे असते. ज्यांच्या मनात अतीव सहानुभूती असते, अशा लोकांनी खूपच सांभाळून असे प्रसंग हाताळावे म्हणजे त्यांना त्रास होणार नाही.

सोशल मीडियावर सतत लोकांचे नकारात्मक विचार वाचून देखील भावनिक संसर्ग होऊ शकतो त्यामुळे अशा घटना जर तुम्हाला त्रास देत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सोयीचे असते.
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*