माझ्या लेखनात किंवा सत्रात अनेकदा CBT चा उल्लेख तुम्ही पहिला/ ऐकला असेल. कदाचित तुम्ही थेरपी घेण्याचा विचार करत असाल किंवा थेरपी घेत असाल किंवा CBT बद्दल जाणून घेण्यास उत्सुक असाल तर आजचा लेख तुमच्यासाठीच आहे. माझ्यामते थेरपी ही गूढ विद्या अजिबात नाही. नेमके काय प्रॉब्लेम आहेत आणि त्यांवर कसे काम करावे हे अगदी सहज, सोप्या शब्दात मांडणे हे थेरपिस्ट चे काम असते.
आपल्या क्लाएंट च्या समस्या ऐकून घेऊन त्यावर उपाय सुचवणे आणि त्यांना त्यांचे ध्येय गाठता यावे म्हणून प्रोत्साहित करणे, त्यासाठी लागणारे स्किल आणि techniques सुगम शब्दात सांगणे हाच CBT (Cognitive Behaviour Therapy) चा हेतू आहे. CBT अगदी mild स्ट्रेस पासून ते क्लिनिकल डिप्रेशन या मानसिक आणि मायग्रेन, जुनाट दुखणे अशा शारीरिक दुखण्यावर देखील उपयुक्त सिद्ध झाली आहे.
“आपण जसा विचार करतो तसे आपण घडत जातो.” या विचारावर CBT आधारित आहे पण CBT म्हणजे सध्या बाजारात असलेली सकारात्मक विचारसरणीची पोकळ उपज नव्हे. आपली परिस्थिती आणि समस्या यांचे सुयोग्य आकलन करणे, प्रॉब्लेम ला मोठे न करता solution वर काम करणे, संयम निर्माण करणे, आपल्या प्रोग्रेस/ प्रगतीचा आढावा घेणे आणि समस्येतून निर्माण झालेल्या भावना योग्य प्रकारे हाताळणे. आपल्याला असलेले आजार/ समस्या स्वीकारणे. ( Denial phase – मला अमुक आजार होऊच शकत नाही किंवा हे माझ्या सोबत कसे झाले म्हणून नशिबाला दोष न देता सत्य स्वीकारणे.) अशा अनेक वास्तववादी विचारातून आपले विचार सकारात्मक करून समस्या सोडविण्याचे काम CBT मार्फत केले जाते.
CBT फक्त शारीरिक किंवा मानसिक आजारासाठी उपयुक्त आहे असे नाही. अनेकदा ही थेरपी वैयक्तिक आयुष्यात येणारे प्रॉब्लेम solve करण्यात देखील मदत करते. माझ्या अनुभवानुसार CBT द्वारे आपण टाईम management, रेलेशनशिप प्रॉब्लेम, स्ट्रेस, anxiety, निद्रानाश, procrastination असे अनेक प्रॉब्लेम देखील सहज हाताळू शकतो.
CBT तेव्हाच यशस्वी होते जेव्हा थेरपिस्ट हे आपल्या क्लाएंट ला योग्य वेळ देतात आणि त्यांचे प्रॉब्लेम नीट ऐकून घेतात. थेरपिस्ट ची योग्यता हा CBT चा पाया आहे. एक चांगला थेरपिस्ट हा क्लाएंट ना प्रॉब्लेम कडे पाहण्याची नवीन दृष्टी देतो आणि त्यांना स्वतःचे solution शोधण्याचे मार्ग दाखवतो.
CBT मुळात आपला सस्म्येकडे पाहण्याच्या दृष्टीकोन बदलते. त्यामुळे एक प्रोसेस सुरू होते. आपले विचार (thoughts) हे प्रॉब्लेम solving च्या दृष्टीकोनाने होऊ लागले की मग आपली वागणूक (behaviour) देखील बदलते. त्यामुळे आपल्या समस्या solve होऊ लागतात, आपले प्रॉब्लेम सुटत आहेत त्यामुळे आपल्या भावना (emotion) देखील सुखद होतात त्याने आपल्याला पुन्हा सकारात्मक विचार येऊ लागतात. ही साखळी एकमेकांवर आधारित असलेल्या THOUGHT – BEHAVIOUR – EMOTION या घटकांना प्रभावित करणारी असल्याने यातून येणारे रिझल्ट हे दीर्घकाळ टिकणारे असतात.
CBT ही प्रत्येक व्यक्ती साठी वेगळी असते त्यामुळे तिला साचेबद्ध करणे कठीण असते. पण योग्य थेरपिस्ट आणि सातत्याने केलेले प्रयत्न यांनी उत्तम रिझल्ट मिळू शकतात.



