करियर समुपदेशन आणि स्व ओळख

Table of Contents

द्विधा मनस्थिती आणि आपण

जीवनाच्या प्रवासात अनेकदा आपण द्विधा मनःस्थितीचा सामना करत असतो, आपण निवडलेला मार्ग आपल्या आयुष्याला दिशा देणारा असल्याने नेमका कोणता मार्ग स्वीकारावा हा प्रश्न आपल्याला बेचैन करणारा असतो. अशाच एका द्विधा मनःस्थितीचा सामना आपण आपले करियर निवडताना करत असतो. नेमके कोणते क्षेत्र निवडावे?, करियर म्हणजे काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे एक समुपदेशक म्हणून देत असताना विद्यार्थ्यांना त्यांचे निर्णय योग्य प्रकारे घेता यावे म्हणून मी कायम प्रयत्नशील असतो.

बहुविध बुद्धिमत्ता (multiple intelligence) सिद्धान्त ओळख

डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांचा बहुविध बुद्धिमत्ता (multiple intelligence) सिद्धान्त हा माझ्या करियर समुपदेशनाचा गाभा असून, गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्ता एक नसून ती विविध क्षमतांचा एक संच असते, याच क्षमता एकाच व्यक्तीत वेगवेगळ्या प्रमाणात आढळून येतात. या विविध बुद्धिमत्ता म्हणजे भाषिक (linguistic) , तार्किक (logical) , दृश्यात्मक (Visual), शारीरिक/ कायिक (kinaesthetic) , सांगीतिक (musical), आंतरवैयक्तिक (interpersonal) , व्यक्तिअंतर्गत (intrapersonal) , निसर्गवादी (naturalist) आणि अस्तित्ववादी (existential) होत. प्रत्येक बुद्धिमत्ता अद्वितीय क्षमता आणि संभाव्यता दर्शवत असल्याने हा सिद्धांत परिपूर्ण ठरतो.

करियर – सुक्ष्म दृष्टिकोन

आपल्या passion ला किंवा छंदाला (hobbies) आपले करियर बनवा हे विधान आपण अनेकदा ऐकतो परंतु सूक्ष्म दृष्टिकोनातून पाहिल्यास असे लक्षात येते की passion मुळे आपल्या करियरच्या प्रवासाला इंधन मिळत असले तरीही त्यासोबत आपले intelligence देखील त्या करियर पर्यायाला पूरक असावे लागतात. दोघांची जोड असेल तरच आपण ठरवलेल्या क्षेत्रात योग्य शिक्षण प्राप्त करून करियर घडवू शकतो. मेंढ्याच्या कळपाप्रमाणे आपला मित्र-मैत्रिणी अमुक एक पर्याय निवडतात म्हणून आपण तेच केले पाहिजे असा विचार न करता किंवा ठराविक मार्ग न निवडता आपण आपल्या क्षमता समजून घेऊन त्याला साजेसा मार्ग निवडायला हवा असे माझे प्रामाणिक मत आहे.

करियर म्हणजे काय?

एक चांगली डिग्री/ नोकरी म्हणजे करियर असा अनेकांचा समज असतो, परंतु करियर म्हणजे तुम्ही करत असलेली नोकरी किंवा तुमचे designation अजिबात नसते. आपल्या क्षमता, कौशल्ये आणि महत्त्वाकांक्षा यांचा एकात्मिक संगम म्हणजे आपले करियर. 9 ते 5 असा जॉब असो की स्वतःचा व्यवसाय असो आपल्या करियर निवडीतून आपली तत्त्वे, व्यक्तिमत्त्व आणि ध्येय यांची प्रचिती येत असते.

करियर निवडीचे महत्व

पैसे कमावणे हे आपल्या जीवनाचे एकमेव उद्दिष्ट कधीच होऊ शकत नाही, करियर मुळे आपले जीवनमान सुधारायला हवे. चांगल्या करियर मुळे आपल्याला मानसिक शांती, समाधान, आर्थिक स्थैर्य, व्यावसायिक प्रगती, सामाजिक स्थान अनुभवायला मिळते इतकेच नव्हे तर अनेक करियर पर्याय आपल्याला समाजासाठी काहीतरी सकारात्मक बदल करण्याची संधी उपलब्ध करून देतात ज्यामुळे आपली सामाजिक बांधिलकी देखील वृद्धिंगत होते. एकूणच आपण एक परिपूर्ण आयुष्य जगू लागतो.

स्व-ओळख आणि करियर

आपण कसे आहोत? आपल्यात नेमक्या कोणत्या क्षमता आहेत? हे समजणे अनेकदा कठीण असते. परंतु स्व-ओळख ही परिपूर्ण आयुष्याच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाची असते. आपण आपले मूल्यमापन केल्याने आपल्या क्षमता, कमतरता, आवड, तत्त्व आणि ध्येय यांची ओळख आपल्याला होते. त्यामुळे त्याला साजेसा करियर पर्याय आपल्याला सहज निवडता येतो. आपल्या क्षमतांची योग्य ओळख झाल्याने कोणत्या शाखेत शिक्षण घ्यायचे हे ठरवता येते. ज्यामुळे पुढे जाऊन भ्रमनिरास होत नाही आणि आपण चुकीचा निर्णय घेतला अशी खंत राहत नाही. मानसिक स्वास्थ्य देखील चांगले रहायला मदत होते. स्व ओळख झाल्याने आपल्या कमतरता देखील कळतात ज्यावर काम करून आपण आपली प्रगती करू शकतो.

करियर समुपदेशन – योग्य वेळ

करियर निवडीचा प्रवास हा अनेकदा आपल्याला लक्षात येण्याआधीच सुरू झालेला असतो. इयत्ता दहावी/ बारावी मध्ये विद्यार्थ्यांना करियर दृष्टिकोनातून शैक्षणिक प्रवास सुरू करावा लागतो. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांना आठवी इयत्ते पासून पुढील शिक्षणासाठी विषय निवडायचे आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील तयारीसाठी आजच आपली ओळख असणे फारच आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अगदी सहावी – सातवीत असतानाच समुपदेशन पर्याय निवडणे हिताचे ठरते.

परिपूर्ण विकास

करियर आणि स्व ओळख चाचणी मधून विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक मार्गदर्शन मिळते असे नाही, तर या उलट त्यांना जिवन कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासाची देखील दिशा मिळते. स्वताची ओळख आणि झाल्याने आत्मविश्वास आणि जाणीवा देखील विकसित होतात. त्यांचा बुद्धय़ांक आणि सोबत भावनांक (emotional quotient) देखील वाढीस लागतो.

स्व ओळख सुयोग्य निकषांवर आणि योग्य पद्धतीने व्हावी या हेतूने मी 2022 पासून “प्रतिबिंब” चाचणी ऑनलाईन माध्यामातून घेत आहे, ज्यात आपल्या आवडी-निवडी आणि दैनंदिन वर्तन यांवर आधारित प्रश्नांतून आपण 10 वर्षे आणि पुढील कोणत्याही व्यक्तीचे डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांचा बहुविध बुद्धिमत्ता (multiple intelligence) सिद्धान्त आधारित मूल्यमापन करतो.

करियर मार्गदर्शन आणि स्व-ओळख संबंधित माहितीसाठी आजच संपर्क करा.

7588399338 WhatsApp Now

Read More about: Pratibimba – See Yourself ! Test

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*