Boundaries – selfish or self care ?

Table of Contents

सीमा आपल्या संरक्षणासाठी असतात. वैयक्तिक आयुष्यात देखील कुणी आपले मानसिक स्वास्थ्य खराब करू नये आणि आपल्या मूल्यांच्या (values) चा आदर व्हावा या हेतूने आपण काही सीमा (Boundaries) ठरवत असतो. अनेकदा या सीमांमुळे समोरील व्यक्ती रागवते किंवा नाराज होते, त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की आपण स्वार्थी आहोत का ? आजच्या लेखात याच शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे.

Boundaries ची आवश्यकता

आपण लहान असताना आपली आई रस्त्यावर खेळायला जाऊ नको असे वारंवार सांगत असे, अशी Boundary ठरवल्या मुळे आपण सुरक्षित राहू अशी तिची निष्ठा होती. त्याच प्रमाणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी देखील आपण काही सीमा रेषा आखणे गरजेचे असते. नाहीतर आपण फक्त समोरच्या व्यक्तीला ला हवे म्हणून आपले प्लॅन आणि आयुष्य बदलत राहतो. परिणामी आपल्याला अनेकदा regret वाटत असतो.

याच Boundaries मुळे आपण पार्टनर, कुटुंब, कामाच्या ठिकाणचे मित्र यांच्याशी एक healthy relationship ठेऊ शकतो.

कोणत्याही नात्यात काही Boundaries या अलिखित असतात, पण काही ठिकाणी पुरेशी स्पष्टता (Clarity) नसल्याने Boundaries वर ठाम राहणे कठीण होऊन जाते, आपण समोरच्या व्यक्तीला नकार देऊन स्वार्थीपणा करत आहोत का ? असा भाव निर्माण होतो.
उदा.

  1. तुम्ही थकून घरी आले आहात आणि मित्र बाहेर फिरायला जाऊ असे म्हणत आहे
  2. तुमच्या नातेवाईकांनी किंवा मित्राने पैसे उधार मागितले आणि तुम्हाला द्यायचे नाहीत.
  3. तुम्हाला एका कार्यक्रमाला बोलवले आहे पण तुम्हाला जायचे नाहीये.

वरील तिन्ही उदाहरणात तुम्ही नाही म्हणणे/ नकार देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण तिन्ही ठिकाणी तुमची त्यामागे असलेली भावना महत्त्वाची आहे.

  1. तुम्ही मित्रांसोबत जबरदस्तीने जात आहात म्हणून चिडचिड होईल.
  2. पैसे – व्यवहारामुळे नाती खराब होऊ शकतात.
  3. तुम्ही त्या कार्यक्रमात कंटाळून जाल आणि avoid करायला सुरुवात कराल.

मनाविरुद्ध केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला regret देत असते त्यामुळे आपल्या सीमा निर्धारित करणे फारच महत्त्वाचे ठरते.

Boundary pushing

जेव्हा कोणतीही व्यक्ती आपल्या Boundaries चा आदर करत नाही, सतत आपल्याला push करण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपण लगेच रागावतो किंवा उगाचच defensive होऊन जातो. अनेकदा खोटी कारणे देतो जसे माझे पैसे मी अमुक ठिकाणी दिले आहेत किंवा मला अमुक ठिकाणी जायचे आहे म्हणून मी तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही. यामुळे आपण उगाचच स्वार्थी विचार करत आहोत असे मनाला सतत वाटत राहते, आणि आपण समोरच्याला थोड्या वेळाने होकार देऊन boundary ओलांडतो.

समोरील व्यक्ती मुळे नाहीतर आपल्या मनातील विचारामुळे आपण स्वतच्या boundary push करत असतो, यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती आपल्या संभाषण कौशल्याची. अनेकदा अशा परिस्थिती सोबत कसे deal करावे जेणेकरून आपली boundary पण राहील आणि नाते पण हे आपल्याला सुचत नाही. याच संभ्रमात अनेकदा आपण मनाविरुद्ध अनेक गोष्टी करत राहतो आणि त्याचा त्रास भोगत असतो.

समोरच्याला न दुखवता आपल्या Boundaries ची जपणूक कशी करावी ?

वाक्यरचना बदला.

जर तुम्हाला एखादी व्यक्ती एखाद्या कार्यक्रमात बोलवत आहे आणि तुम्हाला जाता येणार नाहीये तर सरळ नाही न म्हणता पुढील वाक्य वापरून पहा.

“तुम्ही मला आमंत्रण दिले हीच मोठी गोष्ट आहे/ हाच माझा सन्मान आहे पण सॉरी मी येऊ शकत नाही.” हे वाक्य थोडे भावनिक होऊन गंभीरतेने बोलावे म्हणजे आपण अगदी मनापासून ते बोलत आहोत असे वाटते.

आपण समोरच्याला आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद देत आहोत म्हणून ते थोडे सौम्य होतात आणि आपल्या नकाराने त्यांना वाईट देखील वाटत नाही.

तुम्ही स्पष्ट पणे नाही बोलल्याने ते पुन्हा जास्त आग्रह देखील करत नाहीत आणि तुमची boundy देखील सुरक्षित राहते.

वाक्यात “पण” / “but” ऐवजी “आणि” / “and” चा वापर करा

समजा तुम्हाला कुणी म्हणाले ” स्वयंपाक छान झाला होता पण भाजीत मीठ कमी होते” या वाक्यातील भाजीत मीठ कमी होते हे आपल्याला जास्त लक्षात राहते, “पण” च्या अधील वाक्य हे आपल्याला लक्षात राहत नाही त्या ऐवजी ” स्वयंपाक छान झाला होता आणि भाजीत फक्त थोड मीठ कमी होत” असे वाक्य असेल तर ते मनाला जास्त लागत नाही. त्याच प्रकारे जेव्हा नाही म्हणायचे असेल तेव्हा वाक्यात “पण” ऐवजी “आणि” वापरायला शिका.

स्पष्टता ठेवा

अनेकदा आपण बोलताना बोलून जातो “मला जमणार नाही” , याचा अर्थ तुम्हाला करायची इच्छा आहे पण काही कारणांनी तुम्ही ते करू शकत नाही असा अर्थ होतो, त्यामुळे समोरील व्यक्ती अनेक प्रश्न विचारू लागते या उलट “मी येणार/ करणार नाही” असे स्पष्ट बोलल्याने पुढे आग्रह करता येत नाही आणि तुमची इच्छा नाही हे स्पष्ट होते.

तुम्हाला जे करायचे आहे ते सकारात्मक शब्दात सांगा

अनेकदा आपण नाही असे उत्तर दिले तर समोरचा व्यक्ती त्याची कारणे विचारात असतो, अश्या वेळी आपल्याला जे करायचे आहे ते सरळ सांगावे. उदा. समोरची व्यक्ती म्हणत असेल की हिंदी चित्रपट पाहायला जाऊ तर मला मराठी चित्रपट पाहायचा आहे आहे सांगावे. त्यांनी पुन्हा तोच प्रश्न केला तर आपण हेच उत्तर देत रहावे. त्यामुळे समोरच्या व्यक्ती सोबत argument होत नाही आणि तुमचे मत देखील त्यांना कळते.

त्वरित उत्तर देणे थांबवा

सर्वच परिस्थितीत लगेच उत्तर देण्याची गरज नसते जर तुम्हाला थोडा वेळ हवा असेल तर तो मागुन घ्या, सर्व बाबींचा सखोल विचार करा आणि मग तुमचा निकाल द्या, तो निकाल सांगताना जर अधिक चर्चा होईल असे वाटत असेल तर उत्तर मेसेज द्वारे कळवा म्हणजे पुढील चर्चा होणार नाही.

जास्त explanation देत बसू नका

नकार देताना जर आपण जास्तीची माहिती देत बसलो तर त्यामुळे गैरसमज होण्याची आणि manipulation ची देखील शक्यता वाढते, त्यामुळे थोडक्या शब्दात आपले मत मांडायला शिका.

वरील काही आयडिया या परिस्थिती पाहून वापरायला शिका. चांगल्या प्रकारे communication हा आपल्या Boundaries जपण्याचा राजमार्ग आहे. सुरुवातीला थोडा संकोच वाटेल पण एकदा सवय झाली की आत्मशांती मिळू लागेल.

आपल्या boundary मुळे आपण कधीच समोरच्यावर अन्याय करत नाही उलट नाती, आपल्या values आणि मेंटल हेल्थ जपत असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*