मी खरच आनंदी आहे का?

मी खरच आनंदी आहे का?

Table of Contents

स्वतःला एक प्रश्न विचारा – ” मी सर्वात जास्त आनंदी कधी होतो/ होते ?” त्या आठवणीने आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटेल. आनंदचा अनुभव आपण सर्वांनी कधी ना कधी घेतला असेलच. आजच्या लेखात आनंदी राहण्याचे काही सोपे मार्ग मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

कृतज्ञता व्यक्त करणे

जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या वस्तू आणि आपली माणसे यांच्याप्रती कृतज्ञ असतो तेव्हा आपण त्यांची किंमत करू लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आपल्याला आनंद मिळू लागतो. पण हेच जर आपण “माझ्याकडे अमुक एक गोष्ट/ वस्तू/ व्यक्ती असती तर….” असा विचार करू लागलो तर आपण कायम असंतुष्ट राहतो. आहे त्यापेक्षा चांगल्याची अपेक्षा करणे चुकीचे अजिबात नाही पण आहे त्या प्रती कृतज्ञ राहणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

दयाळू स्वभाव अंगीकारणे

निस्वार्थ राहून कुणाचीही मदत केल्याने आपल्या मेंदू मध्ये serotonin ची पातळी वाढते आणि आपल्याला आनंदी वाटू शकते. ही मदत करताना आपण विनम्र असायला हवे आणि आपल्याला मदत करायची संधी मिळाली म्हणून कृतज्ञ देखील, यामुळे आपला अहंकार वाढत नाही. ही मदत चुकूनही लोकाचे लक्ष आपल्याकडे जावे म्हणून करू नये, नाहीतर यातून attention seeking ची सवय लागते.

माफ करणे

दुसऱ्याने केलेल्या चुकांवर चिडून राहणे म्हणजे स्वतःचे नुकसान करून घेणे होय, राग आपल्यालाच दुःखाकडे घेऊन जातो. अती रागामुळे ब्लड प्रेशर, हृदयविकार असे आजार देखील होऊ शकतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला माफ करून टाकणे कधीही उत्तम असते.

आनंदाचा अनुभव घेणे

जिवन खूप गतिमान झाले आहे, एखादी आनंददायी घटना घडली की ती सेलिब्रेट न करता लगेच आपण पुढच्या कामाला लागतो. आनंददायी घटनेचा अनुभव घेणे महत्त्वाचे असते. त्या घटनेने आपल्याला कसा आनंद दिला, आपल्या भावना काय होत्या हे समजून घेतले की मग तो आनंद दीर्घकाळ टिकतो.

आपले अस्तित्व समजून घ्या

या विश्वाचा केंद्रबिंदू आपणच आहोत, सगळे काही आपल्या सोबतच होते. असे समज आपल्याला इगो आणि दुःख देऊन जातात, या उलट आपल्यापेक्षा देखील दुःखी लोक आहेत आणि आनंद – दुःख या ऊन-सावली सारख्या आहेत हे समजून घेतले तर आपल्याला आनंदी राहणे सोपे जाते. जगात आपल्यापेक्षा मोठी एक व्यवस्था/ शक्ती आहे आणि सर्व काही एकमेकांशी कनेक्टेड आहे हे समजून घेतले की मग मनःशांती लाभते.

व्यायाम करणे

मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य यांची सांगड घातली की आनंद हा दीर्घकाळ सोबत राहतो. व्यायामामुळे आपल्या शरीरातील endorohins ची पातळी वाढू लागते. सातत्याने व्यायाम करणारे लोक हे डिप्रेशन पासून देखील लांब राहतात.

मी खरंच आनंदी आहे हे कसे ओळखावे ?

आनंदी आहोत की नाही हे समजून घेण्यासाठी आधी दुःख म्हणजे काय ? हे समजून घेणे महत्वाचे आहे.

सतत दुःखी किंवा नाखूष असणाऱ्या लोकांच्या काही सवयी.

  • दुसऱ्यांना judge करणे.
  • Jealousy ची भावना.
  • एखादी परिस्थिती आहे तशी न स्वीकारणे.
  • भविष्याविषयी नकारात्मक विचार.
  • सतत कारणे देणे.
  • विश्वास नसणे.
  • सतत तक्रार करणे.
  • “असे झाले तर काय होईल ” हा विचार करणे.

आनंदी आणि दुःखी लोकांमध्ये एकच फरक असतो तो म्हणजे वाईट घटना किंवा परिस्थिती मध्ये ते किती वेळ गुंतून राहतात. दुःख पचवायला वेळ नक्कीच लागतो पण ते जितके सहज digest करू तितके लवकर आपण आनंदी होतो.

अनेकदा पैसा आणि आनंद यांचा संबंध देखील जोडला जातो पण आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होतील एवढा पैसा असणे पुरेसे असते, पैसे आणि आनंद यांचा थेट संबंध शून्य आहे.

आनंदी लोक आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघतात, प्रत्येक गोष्टीला चॅलेंज म्हणून घेतात. त्यामुळे त्यांची प्रगती लवकर होते.

दुःखी अवस्थेतून बाहेर कसे यावे ?

सगळं काही ठीक होईल हा विचार आपल्या मेंदूच्या आवडत्या विचारांपैकी एक आहे. शरीराला जसे अन्न हवे असते तसेच आनंद देखील हवा असतो. दुःखातून बाहेर येण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते दुःख स्वीकारणे आणि भावना समजून घेणे. एकदा भावना समजल्या की मग त्या बदलणे सोपे जाते.

उदा. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा राग आला आहे, त्यामुळे आपली चिडचिड सुरू आहे. तर सर्वप्रथम आपण रागावलो आहोत ही भावना समजून घ्यावी. मग तो राग कसा शांत करायचा हे ठरवणे सोपे जाते. अनेकदा रागाचे मूळ भीती मध्ये असते. थोडे शांत होऊन मनाला प्रश्न करावा मी मला कोणती भीती त्रास देत आहे. त्यामुळे आत्मपरीक्षण देखील होते आणि आपण त्या वाईट घटनेतून बाहेर येतो.

आयुष्यात अनेकदा मोठ्या घटना होतात, त्यानंतर आपले पूर्ण आयुष्य बदलून जाते. बदललेले आयुष्य आणि आधीचे आयुष्य हे कधीच सारखे नसते. त्यामुळे जर आपण दोष देत राहिलो, पश्र्चाताप करत राहिलो तर त्यातून आपल्याला दुःख मिळते त्यामुळे कोणताही नवीन बदल स्वीकारणे देखील महत्वाचे ठरते.

आनंदाकडे वाटचाल ही संथगतीने होणारी असते त्यामुळे आपण जागरूक राहणे आवश्यक असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*